छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. आपल्या कारकीर्दीत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी आदी परकीय शक्तींशी दोन हात करत मराठा साम्राज्याला अबाधित ठेवले. महाराजांचे कर्तृत्व तर आभाळालाही झुकवेल असे होते. त्यांचे कार्य, त्यांचा त्याग आजच्या आणि येणाऱ्या पिढीला कळावा यासाठी महाराजांवर आधारित अनेक कलाकृती तयार होतात. (Marathi News)
आजवर हिंदी, मराठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व सांगणारे अनेक सिनेमे तयार झाल्याचे आपण पाहिले आहे. प्रत्येक सिनेमातून महाराजांच्या आयुष्यातील एक वेगळी घटना, त्यांच्या व्यक्तिमत्वाची वेगळी बाजू आपल्याला पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना महाराज भेटायला येणार आहे. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ या सिनेमाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात तो स्वतः महाराजच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (Social News / Updates )
मागील अनेक वर्षांपासून रितेश देशमुखच्या या ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाची चर्चा सुरू होती. शिवाय या सिनेमावर काम देखील सुरु होते. मात्र आता या सिनेमाची प्रतीक्षा संपली असून, सिनेमाचा पहिला लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच शेअर करण्यात आले आहे. या सिनेमामध्ये चार मराठी अभिनेते मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते हे दिग्गज मराठी कलाकार सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिकेत दिसणार आहेत. यांच्यासोबतच अभिषेक बच्चन, संजय दत्त, भाग्यश्री, फरदीन खान आणि जिनिलिया देशमुख या हिंदी कलाकारांच्या देखील सिनेमात मुख्य भूमिका आहेत. (Celebrity News)
रितेश देशमुख साकारणार मुख्य भूमिका
रितेश देशमुखसह सिनेमातील सर्वच कलाकारांनी नुकतेच आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘राजा शिवाजी’ सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. सिनेमामध्ये रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमा पुढच्यावर्षी महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे २०२६ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमातील रितेश देशमुखचा पहिला लुक रिलीज करण्यात आला आहे. (Latest Entertainment News)
मागील अनेक दिवसांपासून सर्वच प्रेक्षकांना या सिनेमाची कमालीची उत्सुकता होती. रितेशने कायमच त्याच्या मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांना वेगळे काहीतरी देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्याकडून सगळ्यांनाच चांगल्या कलाकृतीची अपेक्षा असते. यावेळी देखील रितेश प्रेक्षकांच्या कसोटीवर खडा उतरेल यात शंका नाही. राजा शिवाजी सिनेमा मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. (Marathi Latest News)
“राजा शिवाजी” हा सिनेमा शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित आहे. यामध्ये शिवाजी महाराजांचे लहानपणापासून ते हिंदवी स्वराज्य स्थापनेपर्यंतचे संपूर्ण आयुष्य दाखवले जाणार आहे. महाराजांचा संघर्ष, कर्तृत्व, शौर्य, दूरदृष्टी आणि लोकशाही मूल्यांची उभारणी हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे, हा सिनेमा महाराजांच्या युद्धावर किंवा शौर्यगाथेवर आधारित नसून, शिवाजी महाराजांचा प्रशासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन सिनेमात अधोरेखित करण्यात येणार आहे. (Marathi Today’s Headline)
=======
हे देखील वाचा : Ashok Saraf : ‘अशोक-रंजना बाहेर या….’ जेव्हा नाशिकला हॉस्पिटल बाहेर चाहत्यांनी घातला गोंधळ
=======
दरम्यान रितेश देशमुखच्या ‘वेड’ सिनेमाने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले होते. या सिनेमाने कोट्यवधींची कमाई करताना अनेक रेकॉर्ड ब्रेक करत सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा हे बिरुद पटकावले. या सिनेमांनंतर सगळ्यांनाच त्याच्या पुढच्या सिनेमाची प्रतीक्षा होती. या सिनेमाच्या घोषणेनंतर आता सगळ्यांनाच सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराजच्या आयुष्यातील एक वेगळा पैलू सिनेमात पाहायला मिळणार असून, अनेक बड्या बॉलिवूड कलाकारांचे देखील सिनेमाच्या निमित्ताने मराठीमध्ये पदार्पण होणार आहे. (Top Stories)