मराठी चित्रपटांच्या इतिहासात आजवर अनेक अशा जोड्या होऊन गेल्या, ज्यांची चर्चा, ज्यांची लोकप्रियता, जायची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. अशीच मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडी म्हणजे अशोक सराफ आणि रंजना. या जोडीने आपल्या अभिनयाने आणि चार्मने अनेक मराठी चित्रपट गाजवले. प्रेक्षक अक्षरशः या जोडीला आणि त्यांच्या चित्रपटांसाठी वेडे होते. अशोक सराफ आणि रंजना यांचा सिनेमा म्हटल्यावर तो हिट होणार हे आधीच सर्वांना माहित असायचे. (Ashok Saraf)
रंजना आणि अशोक सराफ या जोडीचे संपूर्ण महाराष्ट्रात लाखो चाहते होते. कलाकार आणि त्यांचे फॅन्स हे समीकरणच वेगळे असते. कलाकारांशिवाय फॅन्स नाही आणि फॅन्सशिवाय कलाकार नाही. दोघेही एकमेकांना पूरक आहे. कलाकरांना अनेकदा फॅन्सचे विविध स्मरणीय अनुभव येत असतात. काही अनुभव कायम कलाकारांच्या मनात कोरले जातात. असाच एक अनुभव अशोक सराफ यांनी त्यांचा आणि रंजना यांचा सांगितला आहे. पद्मश्री, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांनी ‘मी बहुरुपी’ या त्यांच्या आत्मचरित्रात हा किस्सा लिहिला आहे. (Marathi Movie News)
झाले असे की, अशोक सराफ आणि रंजना हे ‘दैवत’ सिनेमाचं शूटिंग करत होते. या सिनेमाचं नाशिक मध्ये शूटिंग सुरू होतं. हे दोघं एका हॉस्पिटलचा सीन शूट करत होते. अचानक नाशिक मधल्या लोकांना एका हॉस्पिटलमध्ये अशोक सराफ आणि रंजना यांचं शूटिंग होत असल्याची बातमी मिळाली. त्यावेळी अशोक आणि रंजना यांची कमालीची क्रेझ होती. त्यामुळे जेव्हा त्यांना या दोघांबद्दल समजले तेव्हा ते हळूहळू हॉस्पिटल बाहेर जमायला लागले. हे सर्व लोकं आरडा ओरडा करू लागले, त्यामुळे शूटिंगमध्ये देखील अडथळा निर्माण होऊ लागला. लोकं अशोक सराफ आणि रंजना यांच्या नावाने जोरात ओरडत होते. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची अफाट गर्दी झाली होती. (Marathi News)
त्यातल्या एकाने- ए अशोक बाहेर ये…., अशोक आणि रंजना बाहेर पडा…. अशा धमकी वजा विनंत्या देखील ऐकू येऊ लागल्या. लोकं खिडक्यांवर दगड मारू लागले. त्यामुळे सेटवरही थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं. सगळेच टेन्शनमध्ये होते. काय करावे कोणालाच सुचेना शेवटी दिग्दर्शकांनी लोकांची विनंती मान्य केली आणि अशोक सराफ आणि रंजना यांना बाहेर आणलं. त्यांना बघूनच मग चाहते शांत झाले. (Marathi Top News)
=========
हे देखील वाचा : Temple : नरेंद्र मोदींनी भेट दिलेल्या करणी माता मंदिराची वैशिष्ट्ये
=========
दरम्यान रंजना देशमुख आणि अशोक सराफ यांनी अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे, ज्यात “सुशीला”, “एक डाव भूताचा”, “सासूरवाशीण”, “जखमी वाघीण” आणि “हळदी कुंकू” यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. “बिनकामाचा नवरा”, “गूपचूप गूपचूप”, “दैवत”, “सासुरवाशीण”, “सासू वरचढ जावई” आणि “दुनिया करे सलाम” यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या दोघांची केमेस्ट्री बघून दोघं एकमेकांच्या आकंठ प्रेमात असल्याचे देखील बोलले जायचे. त्यांच्या लग्नाच्या बातम्या देखील मीडियामध्ये कमालीच्या गाजल्या. (Social News)