Home » Mukul Dev : पायलटचे प्रशिक्षण घेऊनही अभिनयात सक्रिय झालेल्या मुकुल देवचा सिनेप्रवास

Mukul Dev : पायलटचे प्रशिक्षण घेऊनही अभिनयात सक्रिय झालेल्या मुकुल देवचा सिनेप्रवास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mukul Dev | Bollywood Life
Share

मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. टीव्ही आणि चित्रपट अभिनेता मुकुल देव यांचे निधन झाले आहे. २३ मे रोजी, वयाच्या ५४व्या वर्षी मुकुल यांनी अखेरचा श्वास घेतला. मुकूलच्या अचानक झालेल्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याने ‘आर… राजकुमार’, ‘यमला पगला दीवाना’, ‘सन ऑफ सरदार’ आणि ‘जय हो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मुकुल यांच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. मनोज बाजपेयी, सोनू सूद, विंदू दारा सिंह आणि दीपशिखा नागपाल आदी अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपलं दुःख व्यक्त केलं आहे. (Mukul Dev)

मुकुल देव हिंदी, पंजाबी आणि दक्षिण चित्रपटांमध्ये तसेच टेलिव्हिजन जगतात सक्रिय होते. त्यांनी अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. यात त्यांनी ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटात त्यांनी टोनी सिंग संधूची भूमिका खूपच गाजली होती. या भूमिकेतून त्यांना विशेष ओळख मिळाली. ‘यमला पगला दीवाना’, ‘आर… राजकुमार’ आणि ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. (Marathi News)

Mukul Dev

मुकुल देव हे अभिनेते आणि मॉडेल राहुल देव यांचे धाकटे भाऊ होते. राहुलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली की, काल रात्री मुकुल देव यांनी नवी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. मुकुलला सिया देव नावाची एक मुलगी आहे. मुकुल देव यांचे अंतिम संस्कार शनिवार, २४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता दयानंद मुक्ती धाम येथे केले जातील. मुकुल यांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र काही काळापासून ते आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, इतकी माहिती समोर आली आहे. (Bollywood Life)

मुकुल देव यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९७० रोजी दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील हरि देव हे दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त होते. त्यांचे २०१९ मध्ये वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. मुकुलचा भाऊ राहुल देव हा देखील एक हिंदी आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये सुप्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आहे. मुकुल यांनी दिल्लीतील सेंट कोलंबस स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकादमीतून वैमानिक प्रशिक्षण घेतले होते. मुकुल एक प्रशिक्षित पायलट होते. (Latest Entertainment News )

मुकुल यांनी १९९६ मध्ये ‘मुमकिन’ या दूरदर्शन मालिकेत काम करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्याच वर्षी त्याने ‘दस्तक’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सुष्मिता सेन दिसली होती. त्याच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये ‘वजूद’ (१९९८), ‘कोहराम’ (१९९९), ‘मुझे मेरी बीवी से बचाओ’ (२००१), ‘यमला पगला दीवाना’ (२०११), ‘सन ऑफ सरदार’ (२०१२), ‘आर… राजकुमार’ (२०१३) आणि ‘जय हो’ (२०१४) यांचा समावेश आहे. त्याने हिंदी, पंजाबी, बंगाली, मल्याळम, कन्नड आणि तेलुगु चित्रपटांमध्येही (Celebrity News )

मुकुल देव यांचे मित्र विंदू दारा सिंह यांनी सांगितलं की, “आई-वडिलांच्या निधनानंतर मुकुल एकाकी झाले होते. ते घराबाहेर कमी जात होते आणि लोकांनाही फार कमी भेटत होते. त्यामुळं ते एकटे होते.” तर मुकुलची मैत्रीण दीपशिखा नागपालने सांगितलं की, “त्यांनी त्यांच्या आजाराबद्दल कोणालाही काहीच सांगितलं नाही. ते मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर उपलब्ध होते, जिथे ते नेहमी बोलत असायचे. पण त्यांनी कधीही त्यांची समस्या सांगितली नाही.” (Social News/Update)

Mukul Dev

मुकूल यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत सिने सृष्टीत पदार्पण केले होते. एक बडे स्टार म्हणू ते नावारुपास आले होते. ‘दस्तक’ या सिनेमातून मुकुंद यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. या सिनेमामध्ये त्यांनी एसीपी रोहित मल्होत्राची भूमिका साकारली होती. मुकुल यांनी फियर फॅक्टर इंडिया सिझन 1 देखील होस्ट केला होता. त्यांच्या निधनाचे बाॅलीवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अनेक टिव्ही आणि सिनेकलाकारांना त्यांच्या निधनाने अतीव दुःख झाले आहे. (Todays Marathi News)

अभिनेते मुकुल देव यांनी सलमान खानपासून अजय देवगणपर्यंत मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. मुकुल लहानपणापासूनच हुशार होते. ते आठवीमध्ये असताना दूरदर्शनमध्ये काम करत होते. १९९६ च्या दस्तक चित्रपटातून त्यांच्या अभिनयाची चुणूक रसिकांना दिसली आणि तेथूनच ते प्रसिद्धीस आले, दुरदर्शनने त्यांना ओळख दिली. (Top Marathi Headlines )

मुकुलने ‘कहीं दिया जले कहीं जिया’ (२००१), ‘कहानी घर घर की’ (२००३), ‘प्यार जिंदगी है’ (२००३) यांसारख्या मालिकांमधून छोट्या पडद्यावरही आपली छाप पाडली. याशिवाय, त्याने ‘फिअर फॅक्टर इंडिया’च्या पहिल्या सीझनचे सूत्रसंचालन केले आणि ‘कभी कभी प्यार कभी कभी यार’ (२००८) या डान्स रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता. २०१८ मध्ये त्याने ‘ओमेर्ता’ या चित्रपटासाठी लेखक म्हणूनही योगदान दिले. मुकुल देवला ‘यमला पगला दीवाना’ चित्रपटातील अभिनयासाठी ७वा अमरीश पुरी पुरस्कार मिळाला होता. त्याच्या खलनायकी आणि सहाय्यक भूमिकांनी प्रेक्षक, समीक्षकांची पसंती मिळवली होती. (Top Trending News)

Mukul Dev

मुकुल यांना अफगाण संस्कृतीची ओळख त्यांच्या वडिलांनी करून दिली होती. त्यांचे वडील पश्तो आणि पर्शियन भाषा बोलायचे. जेव्हा मुकुल यांनी दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात मायकल जॅक्सन यांच्या डान्सची नक्कल करत सादरीकरण केलं, तेव्हा त्यांना मनोरंजनविश्वाबद्दल समजले. तेव्हा मुकुल आठवीत होते. या सादरीकरणासाठी त्यांना पहिल्यांदा मानधन देखील मिळाले होते. त्यानंतर मुकुल यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीमधून पायलटचं प्रशिक्षण घेतलं. ते जवळपास एक वर्ष व्यवसायाने पायलट होते आणि त्यांनी अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी एक वैमानिक प्रशिक्षण संस्था देखील चालवली. मुकुल यांनी ‘दस्तक’ सिनेमासाठी त्यांची पायलटची नोकरी सोडली आणि त्यानंतर पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही. (Top Stories)

मुकुल हे शेवटचे २०२२ मध्ये ‘अँट द एंड’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसले होते. टीव्हीवर ते २०१८ मध्ये आलेल्या ‘२१ सरफरोश’ या मालिकेत गुल बादशाहच्या भूमिकेत दिसले होते. तर २०२० मध्ये ते ओटीटीवरील ‘स्टेट ऑफ सीज: २६/११’ या वेब सिरीजमध्ये दिसले होते. मुकुल देव हे २९ वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये बराच काळ काम केले आहे. अनेक अहवालांनुसार, मुकुल देव यांची एकूण संपत्ती सुमारे ४२ कोटी रुपये आहे. मुकूल देव हे अलिशान जीवन जगले. एका माहितीनुसार मुकूल देव यांचे मुंबईत घर असून, या घरात ते एकटेच राहत होते. मुकुल देव यांना घोडेस्वारीचीही आवड होती. दरम्यान मुकुल यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या मित्र परिवाराने, फॅन्सने त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे. (Latest Marathi Headline)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.