Home » सलमान खानला हत्येची धमकी… सुरक्षिततेत केली वाढ

सलमान खानला हत्येची धमकी… सुरक्षिततेत केली वाढ

by Team Gajawaja
0 comment
Salman Khan Threat Mail
Share

बॉलिवूड मधील अभिनेता सलमान खान याला गँगस्टर लॉरेंन्स बिश्नोई याच्याकडून धमक्या मिळाल्या आहेत. त्यानंतर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. त्याचसोबत अभिनेत्याच्या परिवाराने त्याला आउटडोर शुटिंग पासून दूर रहावे असा सल्ला दिला आहे. पोलिसांच्या एका जवळच्या सुत्रानुसार धमकीचा फोन आल्यानंतर अभिनेत्याच्या घराच्या आजूबाजूची स्थिती खुप तणावपूर्ण आहे.(Salman Khan Threat Mail)

ETimes यांनी एका सुत्राच्या हवाल्याने असे म्हटले की, सलमान खान याचा परिवार आणि त्याची टीम ही त्याच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत आहे. या नव्या धमक्यांच्या गोष्टींनी हादरवुन टाकले आहे. मात्र त्यांना हे सुद्धा माहिती आहे की, पोलिसांनी योग्य ती प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्याच्या सुरक्षिततेची पुरेपुर काळजी घेण्यात येत आहे. त्यांनी असे म्हटले की, त्याच्या टीमला गेल्या काही दिवसांसाठी कोणत्याही प्रकारच्या ऑन-ग्राउंड इवेंटपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याचा एका सिनेमा सुद्धा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रमोशनमध्ये सहभागी होऊ नये.

रिपोर्ट मध्ये असे म्हटले आहे की, अभिनेता मुंबईत नाही आणि हे सुद्धा माहिती नाही तो कधी परत येईल. याच दरम्यान, गँगस्टर लॉरेंन्स बिश्नोई, गोल्डी बराड आणि रोहित बराड याच्या विरोधात सलमान खानला ईमेलच्य माध्यमातून धमकी दिल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. धमकीचा ईमेल आल्यानंतर वांद्रे पोलीस स्थानकत आयपीसी कलम ५०६ (२), १२० (बी) आणि ३४ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे.(Salman Khan Threat Mail)

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार धमकी दिल्याच्या स्थितीत तिहार तुरुंगातून लॉरेंन्स बिश्नोई द्वारे दिल्या गेलेल्या एका इंटरव्यूशी संबंधित आहे. जेथे लॉरेंन्स बिश्नोई याने दावा केला आहे की, त्याच्या आयुष्याचे एकच लक्ष्य आहे की, सलमान खानची हत्या. एफआयआरनुसार ईमेल मोहित गर्ग याच्या आयडीवरुन पाठवण्यात आला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, गोल्डी बराडला सलमान खानशी बातचीत करायची आहे. इंटरव्यूचा उल्लेख करत मेलमध्ये असे म्हटले की, जर अभिनेत्याला हे प्रकरण बंद करायचे असेल तर त्याने त्याच्याशी बातचीत करावी.

हे देखील वाचा- अँन्टेलिया विस्फोटक कांड आधारित लवकरच येणार वेबसीरिज

एबीपी न्यूजसोबतच्या नुकत्याच दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये बिश्नोई याने असे म्हटले की, त्याचे एकच लक्ष्य आहे की सलमान खानची हत्या. तसेच हे प्रकरण तो पर्यंत बंद होणार नाही जो पर्यंत अभिनेता बिश्नोई समुदायाची काळवीटच्या शिकारप्रकरणी माफी मागत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.