Home » Panki Hanuman : या मंदिरात दिवसातून तीन वेळा बदलतो हनुमानाचा चेहरा !

Panki Hanuman : या मंदिरात दिवसातून तीन वेळा बदलतो हनुमानाचा चेहरा !

by Team Gajawaja
0 comment
Panki Hanuman
Share

उत्तरप्रदेशमधील अनेक मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. यात हजारो वर्ष जुन्या असलेल्या मंदिरांचे रुप बदलत आहे. यामुळे या मंदिरांमध्ये येणा-या भाविकांची संख्याही वाढली आहे. अशाच मंदिरामध्ये कानपूरच्या पंकी हनुमान मंदिराचा समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूरच्या दौ-यावर असतांना त्यांनी या मंदिराच्या नुतनीकरणासाठी मोठी आर्थिक मदत केली असून या पौराणिक मंदिराला आता नवं रुप मिळणार आहे. कानपूरपासून 13 किमी अंतरावर असलेल्या पंकी रेल्वे स्टेशनजवळ हे मंदिर आहे. 1000 वर्ष जुने असलेले हे हनुमान मंदिर पंकी मंदिर म्हणून ओळखले जाते. (Panki Hanuman)

या मंदिरातील रामभक्त हनुमानजींचा चेहरा दिवसातून तीन वेळा बदलतो. हा चमत्कार बघण्यासाठी येथे रोज हजारो भाविक गर्दी करतात. या मंदिरात ज्येष्ठ महिन्यात येणा-या मंगळवारी मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवाला देशभरातील हनुमान भक्त उपस्थित रहातात. याला बडा मंगल असेही म्हणतात, या मंगळवारच्या पुजेनिमित्त मोठा भंडाराही या मंदिरात होतो. या भंडा-याबाबतही अनेक चमत्कार होत असल्याचे भाविक सांगतात. हनुमानभक्त नीमकरोरी बाबा यांचाही आशीर्वाद येथील भंडा-याला असल्याची भावना भाविकांमध्ये आहे. कानपूरच्या पंकी हनुमान मंदिरात वर्षभर हनुमान भक्तांची गर्दी असते. 1000 वर्ष जुन्या असलेल्या या मंदिरामध्ये अनेक चमत्कार होत असल्याचे भाविक सांगतात. कलियुगातील देवता म्हणून या मंदिरातील हनुमानाची पूजा करण्यात येते. या मंदिराची स्थापना श्री 1008 महंत गंगा दास जी यांनी केली होती. यासंदर्भात एक कथा सांगण्यात येते, त्याप्रमाणे, महंत गंगा दास जी हे चित्रकूट धामहून येत असताना त्यांना पंकीमध्ये एक दगड दिसला. या दगडामध्ये त्यांना बजरंगबलीचे रूप असल्याचा भास झाला. (Social News)

त्यांनी हा दगड जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांना हनुमानजींनी प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यानंतर महंत गंगा दास यांनी याच जागेवर या दगडरुपी हनुमानांची विधीवत स्थापना केली आणि मंदिर उभारले. या पंचमुखी हनुमान मंदिराची ख्याती लवकरच परिसरात झाली. या मंदिरात भक्तींची गर्दी वाढली, तेव्हा भाविकांना मंदिरात रामभक्त हनुमान यांचे दर्शन झालेच शिवाय माता सीता यांचेही दर्शन झाल्याचे अनेकांनी सांगितले आहे. या मंदिरात भगवान हनुमानांची मुर्ती दिवसभरात तीन रुपात बदलते. सकाळी भाविक येतात, तेव्हा या मुर्तीवर बालरुप आरुढ असते. दुपारी ही मुर्ती कुमार वयातील हनुमानासारखी दिसते, तर सायंकाळच्या आरतीच्यावेळी ही हनुमानांची मुर्ती थोडी मोठी होत असल्याचे भाविक सांगतात. याच मंदिरातील सकाळी बाल हनुमानाचे रुप बघण्यासाठी प्रत्यक्ष माता सीताही येत असल्याचे भाविक सांगतात. अशा अनेक चमत्कारांमुळे या मंदिरात भाविकांची अहोरात्र गर्दी असते. (Panki Hanuman)

या मंदिराचे सध्याचे महंत कृष्णदास महाराज आहेत. महंत गंगा दासजी यांनी ज्याप्रमाणे हनुमानांची पूजा केली, तशीच परंपरा आजही राखली जाते. महंत कृष्णदास सांगतात की, या मंदिरातील हनुमानजींच्या दर्शनानं प्रत्येक भाविकांची इच्छा पूर्ण होते. यातही जेष्ठ महिन्यातील मंगळवारी या मंदिरात देशभरातून भाविक येतात. या मंगळवारांना बुधवा मंगलवार म्हणतात. यावेळी पहाटे 1 वाजल्यापासून मंदिरात आरती आणि पूजाविधी कऱण्यात येतात. हनुमानासमोर यावेळी लाडवांचा डोंगर ठेवला जातो. त्यानंतर भाविकांना हे लाडू प्रसाद म्हणून वाटण्यात येतात. (Social News)

=========== 

हे देखील वाचा : Ayodhya : राम दरबार प्राणप्रतिष्ठेचा शाही सोहळा !

Rajasthan : “या” मंदिरात भरतो भूतांचा दरबार !

===========

या पंकी मंदिरात होणारा भंडाराही विशेष आहे. 1964 मध्ये या मंदिरात झालेल्या भंड-याची कथाही अद्भूत आहे. यावेळी लाखो भाविक या भंडा-याला आले होते. प्रत्यक्ष भंडा-या प्रसाद हा खूप कमी होता, मात्र लाखो भाविकांनी पोटभरुन हा प्रसाद ग्रहण केल्यावरही बराच प्रसाद बाकी राहिला होता. यामागे बाबा नीमकरोरी यांचा आशीर्वाद असल्याचे भाविक सांगतात. बाबा नीमकरोरी हे सुद्धा पंकी हनुमानाचे भक्त होते. त्यांच्याच कृपेनं येथे दरवर्षी होणा-या भंडा-यात लाखो भाविक येतात, आणि भरपेट भोजन करतात. आता याच मंदिराला नवे रुप देण्यात येणार आहे. (Panki Hanuman)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.