आपल्या भारतीय लोकांची एक खूपच साधी आणि सोपी सवय आहे. आपण कमवायला लागलो की, सर्वात आधी काढतो ती एलआयसीची पॉलिसी. ही पॉलिसी काढताना आपल्याला नफा कमी झाला तरी चालेल, मात्र तोटा होत नाही ना याकडे आपले लक्ष असते. घरातील प्रत्येक व्यक्तीची किमान एक तर एलआयसी पॉलिसी असतेच. आपल्याला माहिती आहे की, आजच्या घडीला एलआयसी काढण्यात काहीच अर्थ नाहीये. जरी आपण एलआयसी काढली तरी नक्कीच आपल्याला जास्त फायदा होणार नाही. शिवाय एलआयसीपेक्षा देखील इतर अनेक अशा गुंतवणुकी आहेत ज्या आपल्याला काढणे फायदेशीर ठरते. मात्र तरीसुद्धा आपले एलआयसीवरील प्रेम आणि विश्वास आजही कायम आहे. याच एलआयसीने एक मोठं विक्रम करत थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. (LIC)
भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात LIC ने एक मोठा विश्वविक्रम केला आहे. LIC ने २४ तासात सर्वाधिक विमा पॉलिसी विकून आपल्या नावे एक नवा विक्रम केला आहे. या विक्रमासोबतच एलआयसीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. LIC च्या एकूण ४,५२,८३९ एजंट्सनी २० जानेवारी रोजी संपूर्ण भारतात ५ लाख ८८ हजार १०७ जीवन विमा पॉलिसी विकून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. एलआयसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “२४ तासांच्या आत, लाइफ इंश्युरन्स उद्योगात एजंट प्रॉडक्टिव्हिटीसाठी एक नवीन जागतिक बेंचमार्क स्थापित झाला आहे. (Marathi News)
या विश्वविक्रमाबद्दल LIC ने एक निवेदन जारी करत याबाबतची सर्व माहिती दिली आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, “हे यश आमच्या एजंट्सच्या समर्पणाचे, कौशल्याचे आणि अथक परिश्रमाच्या नीतिमत्तेचे एक शक्तिशाली प्रमाण आहे. ही कामगिरी आमच्या ग्राहकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना महत्त्वाची आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या आमच्या ध्येयाप्रती आमची वचनबद्धता दर्शवते. हा विक्रमी प्रयत्न एलआयसीचे एमडी आणि सीईओ सिद्धार्थ मोहंती यांच्या पुढाकाराचा परिणाम आहे. ज्यामध्ये त्यांनी प्रत्येक एजंटला २० जानेवारी २०२५ रोजी अर्थात ‘मॅड मिलियन डे’ रोजी किमान एक पॉलिसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते.” मोहंती यांनी ‘मॅड मिलियन डे’ ऐतिहासिक बनवल्याबद्दल सर्व ग्राहक, एजंट आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. (Top Stories)
दरम्यान LIC ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असून, एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे. १८१८ मध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी ही भारतात जीवनविमा व्यवसाय सुरू करणारी पहिली विमा कंपनी होती. १९५६ मध्ये विमा सेवा आणि निधी सेवा पुरविणाऱ्या सुमारे २४५ भारतीय तसेच परकीय कंपन्या भारत सरकारने ताब्यात घेऊन त्यांचे राष्ट्रीयकरण केले. १९ जून १९५६ ला संसदेत एल आय सी कायदा संमत करून वरील कंपन्यांच्या एकत्रीकरणातून १ सप्टेंबर १९५६ ला एल आय सीची स्थापना करण्यात आली. (Marathi Latest News)
===========
हे देखील वाचा : Jonas Masetti : कोण आहेत, पद्मश्री जोनास मासेट्टी !
Kim Jong Un : किमची युद्धनौका फुस्स !
===========
एलआयसीचे जीवनविम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे. मुंबईमध्ये एलआयसीचे मुख्यालय असून तिची ८ क्षेत्रीय कार्यालये, ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा, ५४ ग्राहक सेवा केंद्रे व २५ महानगर सेवा केंद्रे आहेत. गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. सध्या १३,३७,०६४ इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत. ही संस्था भारतातील करोडो लोकांच्या विश्वासाचा आधार बनली आहे. (Social Updates)