Home » सोशल मीडियाचा अत्याधिक वापर करणाऱ्या व्यक्ती राहतात नैराश्यात, अभ्यासातून खुलासा

सोशल मीडियाचा अत्याधिक वापर करणाऱ्या व्यक्ती राहतात नैराश्यात, अभ्यासातून खुलासा

सोशल मीडियाचा अत्याधिक वापर करणाऱ्या व्यक्ती नैराश्यात राहत असल्याचा खुलासा एका अभ्यासातून झाला आहे. याचा सामान्य व्यक्तीच्या आयुष्यावर फार मोठा परिणामही होतो.

by Team Gajawaja
0 comment
Social Media Hashtags
Share

Social Media and Health : सध्या इंटरनेटचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. वेब क्रांतीच्या जगात एका लहानश्या स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक नव्या गोष्टी दिवसागणिक कळत राहतात. लोक तास् न तास् इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर आपला वेळ घालवतात. पण तुम्हाला माहितेय का, सोशल मीडियाचा अत्याधिक वापर करणाऱ्या व्यक्ती आयुष्यात नेहमीच आनंदी राहत नाहीत. खरंतर, एका अभ्यासातून याबद्दलचा खुलासा करण्यात आला आहे.

जगातील कितीजण सोशल मीडियाचा करतात वापर?
इंटरनेटच्या वाढत्या वेगासह सोशल मीडिया प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग झाला आहे. सत्य असे आहे की, व्यक्ती फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर आपला दिवसभरातील सर्वाधिक वेळ घालवतो. एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या सध्या सोशल मीडियावर अत्याधिक वेळ घालवतात. म्हणजेच 64.7 टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात.

भारतातील काय स्थिती?
आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात 150 अब्जाधीश लोक सोशल मीडियाशी जोडले गेले आङेत. केवळ भारतातबद्दल बोलायचे झाल्यास प्रत्येक तिसरा व्यक्ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. याशिवाय एखादा व्यक्ती दिवसभरात आपल्या फोनला कमीत कमी 2617 वेळा टच जरूर करतो.

सामान्य व्यक्तींच्या आयुष्यात झालाय बदल
सोशल मीडियाच्या एण्ट्रीमुळे सामान्य व्यक्तींच्या आयुष्यात फार मोठा बदल झाला आहे. त्यांच्यामधील लाइफस्टाइल पूर्णपणे बदलली गेली आहे. ते सोशल मीडियावर एकमेकांना कॉपी करू पाहतात. यामुळे स्पर्धात्मक जगात बहुतांशजण जगत आहेत. (Social Media and Health)

सोशल मीडियामुळे होणारे नुकसान
जनरल ऑफ मेडिकल इंटरनेट रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, सोशल मीडियाच्या अत्याधिक वापर केल्याने शरिरात इंफ्लेमेशनचा स्तर वाढला जातो. जो आरोग्यासाठी अत्याधिक हानिकारक असू शकतो. वयानुसार कंटेट न मिळाल्याने तरुणांमध्ये चिंता आणि नैराश्य वाढले जाऊ शकते. यामुळे व्यक्तींमध्ये सातत्याने आनंदी राहण्याची प्रवृत्ती कमी होत असल्याचेही दिसून येत आहे.


आणखी वाचा :
तुम्हाला कंबरेखाली सातत्याने दुखते? असू शकतात ही कारणे
पोटाला सूज येण्यामागे तुमच्या ‘या’ सवयी तर कारणीभूत नाहीत ना?
महिलांनी प्रत्येक तीन महिन्यांनी ‘या’ वैद्यकीय चाचण्या जरुर कराव्यात

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.