Home » “Hybrid Dating”- प्रेमाच्या नात्यांना लागलेले नवं वळण

“Hybrid Dating”- प्रेमाच्या नात्यांना लागलेले नवं वळण

by Team Gajawaja
0 comment
Hybrid Dating
Share

नेहा ही एका उत्तम कंसल्टेंसीच्या कंपनीत काम करते. तिचे शिक्षण सुद्धा मुंबईतच झाले होते. याच दरम्यान, ती एका मुलाला भेटली. दोन वर्ष पार्टनरसोबत तिचे उठणं-बसणं होतं होत. मात्र जसा लॉकडाउन लागला तेव्हा तिला मुंबई सोडून आपल्या घरी दिल्लीला जावे लागले. परिणामी आपल्या पार्टनरला तिचे भेटणे ही कमी झाले आणि बोलणे ही हळूहळू कमी होऊ लागले. अशातच तिला हायब्रिड डेंटिंगचा ऑप्शन मिळाला. पण नक्की डायब्रिड डेटिंग (Hybrid Dating) हे किती सुरक्षित आहे आणि त्यात आपण समोरच्या व्यक्तीशी कसे वागतो याबद्दलच्या मर्यादा आपल्याला पाळल्या पाहिजेत. हायब्रिट डेटिंग बद्दल मोजक्यात शब्दांत सांगायचे झाले तर ऑनलाईन डेटिंग. जे सध्याच्या तरुणाईत प्रचंड फॅड आहे.

आजकाल विविध प्रकारचे डेटिंगचे अॅप ही सहज आपल्याला उपलब्ध करुन दिले गेले आहेत. त्यात तुम्हाला तुमचा परफेक्ट पार्टनर मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला मदत केली जाते. परंतु हायब्रिड डेटिंग असा ट्रेंन्ड आहे जेथे ऑनलाईन रोमांन्स केला जातो. याबद्दल जाणून घेणे कुतूहलाचे असेल पण सोशल डिस्टेंन्सिंगदरम्यान हायब्रिड डेटिंगच तरुणाईला आकर्षित करतेय. याचे काही वाईट परिणाम ही आहेत बरं का.

हे देखील वाचा-लग्नानंतर महिलांनी करू नयेत ‘या’ पाच चुका, नात्यात येऊ शकतो दुरावा

Hybrid Dating
Hybrid Dating

खरंतर एकटेपणा, तणाव यासारखी प्रकरण ही लॉकडाउनच्या काळात खुप पहायला मिळाली. अशातच व्हिडिओ कॉलिंग, चॅट आणि सोशल मीडियाच्या आधारामुळे प्रत्येकाला एकमेकांचा आधार वाटत होता. येथूनच हायब्रिड डेटिंगची (Hybrid Dating) अधिकच सुरुवात झाली असावी. हा एक वर्च्युअल पद्धतीचा रोमांन्स असल्याचे म्हणण्यास काही हरकत नाही. स्पष्टपणे बोलायचे झाल्यास फिजिकल रोमांन्सपेक्षा वर्च्युअल रोमांन्सला अधिक महत्व दिले जात असल्याने त्याला हायब्रिड रोमांन्स किंवा डेट असे म्हटले जाते.

हायब्रिड डेटिंगचा अधिक वापर कधी सुरु झाला?
कोरोनाने सर्वांना आयुष्य जगण्याचा चांगलाच धडा जरी शिकवला तरीही आयुष्य हे पूर्णपणे बदले गेले. कधी लॉकडाउन जाहीर केला जाईल आणि घरातून बाहेर जाणे बंद होईल याची सुद्धा भीती होतीच. अशातच तरुणांमध्ये आपला अधिकवेळ पार्टनरसोबत व्यतीत न करता येत असल्याने ऑनलाईन पद्धतीने त्यांनी तो घालवण्यास सुरुवात केली. फिजिकली भेटण्याऐवजी वर्च्युअल पद्धतीने भेटणे सुरु झाले.

ऑनलाईन पद्धतीने डेटिंग करताना थोडी भीती सुद्धा असते. कारण तुमचे नाते हे पूर्णपणे ऑनलाईन संपर्कावरच निर्भर अशते. अशातच एकमेकांना भेटणे, एकमेकांच्या सहवासात राहणे या सर्व गोष्टी केल्या जात नाहीत. त्यामुळे हायब्रिड रोमांन्समध्ये एकमेकांच्या भावना फक्त वर्च्युअली कळतात. जसे लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपमध्ये कालांतराने एकमेकांना भेटता किंवा वेळा देता आली नाही तर नाते तुटण्याची अधिक शक्यता असते. आठवड्यातून एकदा-दोनदा पार्टनर भेटला नाही तर चिडचिड होते. अशातच एकमेकांची साथ सोडत नात्याला रामराम केला जातो. त्यामुळे तुम्ही सुद्धा हायब्रिड डेटिंगचा विचार करत असाल तर तुम्हाला काही मर्यादा पाळाव्या लागणार आहेतच. त्याचसोबत तुमच्या खासगी आयुष्याबद्दलच्या गोष्टींची सुरक्षितता कशी ठेवली जाईल याकडे सुद्धा कटाक्षाने लक्ष द्या.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.