जर तुम्ही असा विचार करत असाल टीव्ही सीरियल्स केवळ सासू-सुना यांच्या कथांवरच आधारित असतात तर असे नाही. गेल्या काही वर्षात केवळ टीव्हीवर जुन्या परंपरांबद्दलच्या काही सीरियल्स काढल्या आणि त्या प्रेक्षकांच्या पसंदीस ही पडल्या. याच सीरियल्समुळे समाजाला एक नवी दिशा आणि विचार करण्यास भाग पाडले. अशातच जाणून घेऊयात त्या सीरियल्स बद्दल ज्यांनी समाजाला एक नवी दिशा दाखवली. (TV Serials)
उड़ान
ही सीरियल 90 च्या काळातील दूरदर्शनवर प्रदर्शित केली जायची. मात्र आज सुद्धा महिलांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही सीरियल प्रोत्साहन देते. उडान सीरियल ही आयपीएस अधिकारी कंचन चौधरी भट्टाचार्य यांच्या खऱ्या कथेवर आधारित आहे. हा शो कल्याणी सिंह नावाच्या एका तरुण मुलीची कथा आहे. जी प्रत्येक स्तरावर लैंगिक भेदभावाचा समाना करत आयपीएस अधिकारी होते. तिला कोणतीही सपोर्ट करत नाही. मात्र शो मधील तिला शेखर कपूर मिळतो. जो महिल अधिकारांना आपल्या समान मानतात. त्यावेळी शो ची खास गोष्ट अशी होती की, शो मध्ये अशी एक वेळ येते जेव्हा महिलेला वर्दीत पाहणे असमान्य असते. असे म्हणू शकतो की, या शो मुळे महिलांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यास प्रोत्साहन मिळाले. कविता चौधरीने या सीरियलची कथा लिहिली असून दिग्दर्शनही केले. त्यांनी या सीरियलमध्ये अभिनय सुद्धा केला होता.
बालिका वधू
राजस्थान मधील आजही गावात-जिल्ह्यात बाल विवाह केला जातो. परंतु आता बाल विवाहाबद्दल प्रशासन आणि नागरिक जागृक झाले आहेत. मात्र 2008 मध्ये आलेल्या बालिका वधू सीरियाने या बालविवाहाच्या प्रथेची कथा उत्तम पद्धतीने मांडली. यामध्ये अविका गौढ हिने आनंदीची भुमिका साकारली होती. यामध्ये एका लहान मुलीचा संघर्ष दाखवला गेला होता. जे वय तिचे खेळण्याचे होते त्याच वयात तिचा विवाह करून दिला गेला होता. एकूणच सासरची मंडळी आणि बालविवाहची प्रथा ही या सीरियलमधून मांडली गेली.
न आना इस देस लाडो
समाजात आज काही ठिकाणी मुलगी जन्मला आली की तोंड वाकडी होतात. त्याचसोबत काहीवेळेस तर तिची गर्भातच हत्या केली जाते. चुकून जर ती जन्मला आली तर तिचे आयुष्य जगण्याचे अधिकार काढून घेतले जातात. समाजाच्या याच रुपाची व्यथा न आना इस देस लाडो मध्ये मांडली आहे. या सीरियलमध्ये काही ट्विस्ट आणि टर्न आहे. परंतु याचा शेवट फार सुंदर आहे. (TV Serials)
बानी इश्क दा कलमा
सातासमुद्रापलीकडून आपला राजकुमार येईल आणि आपल्याला मुलीला घेऊन जाईल असे स्वप्न प्रत्येक आई-वडील पाहतात. याच विचारामुळे आपल्या समाजात एनआरआय वराची एक वेगळीच डिमांड आहे. पंजाबमध्ये तर याची अधिकच क्रेज आहे. घरातील मंडळी एनआरआय समोर ऐवढे खुश होतात की, ते कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता आपल्या मुलीचे लग्न लावून देतात. बहुतांशवेळा जर मुलगी विदेशात लग्न करून जरी केली तर दोन-तीन महिन्यांनी तिला आपल्या घरी पुन्हा पाठवले जाते. काहीवेळेस लग्न करतात पण ते सीरियस घेत नाहीत. याच कथेवर आधारित बानी इश्क दा कलमा सीरियलची कथा आहे.
हेही वाचा- डिप्रेशनमध्ये येऊन ‘या’ कलाकारांनी संपवले आपले आयुष्य