Home » पेंटागॉनपेक्षा सरस आहे सुरत डायमंड बाजार

पेंटागॉनपेक्षा सरस आहे सुरत डायमंड बाजार

by Team Gajawaja
0 comment
Surat Diamond Market
Share

अमेरिकेला जगातील सर्वात शक्तिमान देश म्हटले जाते.  या अमेरिकेची सर्व शक्ती एकत्रित कुठे असेल तर ते स्थान म्हणजे पेंटागॉन.  अमेरिकेची सर्व सुरक्षा प्रणाली या इमारतीमधून चालते.  आत्तापर्यंत या पेंटागॉनपेक्षा जगातील कुठलीही इमारत कार्यालयीन वापरासाठी मोठी नव्हती.  मात्र भारतानं हा विक्रम मोडला आहे.  गुजरात राज्यातील सूरत येथील डायमंड बाजारनं पेंटागॉनचा विक्रम मोडला आहे. (Surat Diamond Market)

क्षेत्रफळाच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून या सुरतच्या डायमंड बाजाराची नोंद झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सूरत डायमंड बाजाराचे उद्घाटन केले.  यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीचा हा नवा आयाम असल्याचे स्पष्ट केले आहे.   डायमंड बाजाराची भव्य वास्तू बघितली की, पंतप्रधान मोदी यांचे हे बोल लवकरच वास्तवात येणार याची जाणीव होते.  

जगात वापरले जाणारे 90 टक्के हिरे सूरतमध्ये कापले जातात.  याच हि-यांना पॉलिश करण्याचे कामही सूरतमध्ये होते.  या सर्व कामाची सरासरी उलाढाल सुमारे 3 लाख कोटी रुपये आहे.  सुरतच्या या हिरे उद्योगामुळे साधारण 15 लाख कारागिरांना रोजगार मिळाला आहे. याच सूरतमध्ये आता हा सर्व हिरे उद्योग डायमंड बाजार नावाच्या एका सुरक्षित छताखाली आणला गेला आहे.  आंतरराष्ट्रीय हिरे आणि दागिन्यांच्या व्यवसायासाठी हे जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असणार आहे. (Surat Diamond Market) 

या डायमंड बाजारमध्ये आयात-निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सुरक्षित व्हॉल्ट्सची सुविधा यांचा समावेश असेल.  या डायमंड बाजार इमारतीला डायमंड बोर्स असे नाव आहे.  याचे वैशिष्ट म्हणजे, या इमारतीचे उद्घाटन करण्यापूर्वी ऑगस्टमध्येच, डायमंड बोर्स इमारतीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत म्हणून मान्यता दिली. त्यामुळे अमेरिकेच्या पेंटागॉनचा रेकॉर्ड या इमारतीनं तोडला आहे.  (Surat Diamond Market)

या सूरत डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी कार्यालयीन क्षेत्राची जागा आहे.  येथे 4,200 हून अधिक हिरे व्यापार कार्यालये असतील. आत्तापर्यंत, देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथील बांद्रा कुर्ला कॉम्पेलक्समधून हिरे व्यापाराचे मोठे केंद्र चालवले जात होते.  मात्र डायमंड बोर्स नंतर  सुरत अधिकृतरित्या दागिने आणि हिरे व्यापाराचे एक मोठे केंद्र म्हणून उदयास येणार आहे.  

सूरत हे हिरे पॉलिशिंग आणि कटिंगचे केंद्र आहे.  मात्र या सूरतमधील हा सर्वात महत्त्वाचा व्यवसाय  महिधरपारा डायमंड मार्केट आणि वरछा डायमंड मार्केटमध्ये होत होता. हा सगळा व्यवसाय रस्त्यावर, कोणत्याही सुरक्षेशिवाय होत असे. येथेच लाखो, करोडोंचे व्यवहार होत असे.  यात जोखीम मोठी होती.  यामुळेच हा व्यवहाराचा भाग मुंबईतील कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये करण्यात येत होता.  तेथील अत्याधुनिक सुविधा आंतराष्ट्रीय खरेदीदारांसाठी चांगल्या होत्या.  मात्र आता या सुविधां बरोबरच सर्वच हिरे उद्योग एकाच छताखाली आणल्यानं आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठीही फायद्याचा व्यवहार होणार आहे.   

सूरत डायमंड बोर्स 66 लाख स्क्वेअर फूट परिसरात बांधण्यात आला आहे.  येथे 4,200 पेक्षा जास्त कार्यालये आहेत.  या कार्यालयांसाठीची जागाही प्रशस्त आहे.  ही कार्यालये  300 स्क्वेअर फूट ते 1,15,000 स्क्वेअर फूट परिसरात बांधली गेली आहेत. या बोर्समध्ये एकूण 9 टॉवर्स असून प्रत्येक टॉवरमध्ये 15 मजले बांधण्यात आले आहेत.(Surat Diamond Market)

=============

हे देखील वाचा : पाकिस्तानातील एका धाडसी मुलीची चर्चा

=============

या डायमंड बाजारात हिरे व्यवसायासंबंधी ज्या सर्व सुविधा लागणार आहेत, त्या सुविधांची काळजी घेण्यात आली आहे.  यासोबतच डायमंड पॉलिश, डायमंड मॅन्युफॅक्चरिंग मशिन, सॉफ्टवेअर, डायमंड क्वालिटी सर्टिफिकेट, लॅब डायमंड्स आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खरेदीदारांसाठी 27 डायमंड ज्वेलरी रिटेल आउटलेट्स यांसारख्या सुविधा सूरत डायमंड बोर्समध्ये उपलब्ध आहेत.  हा बाजार पूर्ण रुपात सुरु झाल्यानंतर 1.5 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.  सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांनाही याचा थेट फायदा होणार आहे.  यात सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.  संपूर्ण कॅम्पसमध्ये 4,000 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यासोबतच लोकांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर विशेष सुरक्षा उपकरणेही लावण्यात आली आहेत.(Surat Diamond Market)

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, येथे आयात-निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लीयरन्स हाऊस‘, किरकोळ दागिन्यांच्या व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सुरक्षित व्हॉल्टची सुविधा समाविष्ट असेल.  2015 मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली होती.  सुमारे 3000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प भारताच्या किर्तीमध्ये मानाचा तुरा ठरणार आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.