Home » Maowadi and Naxalwadi Difference : माओवादी आणि नक्षलवाद्यांमध्ये फरक काय?

Maowadi and Naxalwadi Difference : माओवादी आणि नक्षलवाद्यांमध्ये फरक काय?

by Team Gajawaja
0 comment
Maowadi and Naxalwadi Difference, International News
Share

Maowadi and Naxalwadi Difference : छत्तीसगढ येथील नारायणपुर येथे झालेल्या चकमकीत पोलिसांनी 27 माओवाद्यांना ठार केले. यामध्ये माओवाद्यांचा नेता नंबल्ला केशव राव उर्फ बसवराजू याला मारण्यात आल्याचा दावा केला आहे. बस्तर पोलिसांनी असे म्हटले आहे की, छत्तीसगढमध्ये पहिल्यांदाच महासचिवाच्या स्तरावरील एखाद्या माओवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. यामुळे ही कामगिरी आमच्यासाठी मोठी संधी आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी म्हटले की, वर्ष 2024 मध्ये सुरक्षा बलाने नक्षलवाद्यांच्या विरोधात ज्या पद्धतीने अभियान सुरू केले ते 2025 मध्ये देखील सुरुच राहणार आहे. अशातच असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, नक्षलवादी आणि माओवादी यांच्यामध्ये नेमका फरक काय?

नक्षलवादी आणि माओवादी कोठून आले?
नक्षलवाद्यांची एक विचारसरणी आहे, जी पश्चिम बंगालमधील जमिनदारांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाशी जोडली गेली आहे. याची सुरुवात वर्ष 1960 च्या दशकात बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील गाव नक्षलबाडी येथून झाली होती. येथे भारतीय कम्युनिट पक्षाचे नेते चारू मजूमदार यांनी कान्यू सान्यालसोबत मिळून सत्तेवर बसलेल्या लोकांसह जमिनदारांच्या विरोधात शेतकरी उठावाचे नेतृत्व केले.

क्षलबारी बंडामुळे तरुण आणि ग्रामस्थांना फार मोठा फटका बसला गेला. याचे परिणाम असे झाले की, हे आंदोलन बिहार आणि झारखंडपर्यंत पोहोचले गेले. यानंतर ओडिसा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात आले. आंदोलनाचा हिस्सा झालेले गरीब आणि भूमीहिन शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या ठेवल्या. याला नक्षलवादी आंदोलन म्हणून संबोधण्यात आले. यानंतर जे कोणीही यामध्ये सहभागी व्हायचे त्यांना नक्षलवादी म्हटले जाऊ लागले.(Latest News)

Maowadi and Naxalwadi Difference

Maowadi and Naxalwadi Difference

तर माओवादाची सुरुवात आधुनिक चीनचे संस्थापन माओत्से तुंग यांच्या विचारसणीशी संबंधित आहे. जे हिंसाचाराचे समर्थन करते. ही एक अशी विचारसरणी आहे, जी सशस्र उठाव आणि राजकीय युतींच्या माध्यमातून सत्तेवर ताबा मिळवण्याचा उद्देश ठेवतात. भारतात माओवाद कसा विस्तारला गेला हे जाणून घेऊया.(Todays Marathi News)

याची सुरुवात नक्षलवाद्यांच्या आंदोलनापासून सुरू झाली. वर्ष 1967 मध्ये नक्षलबारी बंडानंतर भारतीय कम्युनिट पार्टी (मार्क्सवादी) मध्य विभाजन झाले. यामध्ये एक गटाने माओवादी विचारसरणीचे समर्थन केले. त्याचप्रमाणे, ग्रामीण भागात सरकारविरुद्ध उठाव आणि सशस्त्र संघर्ष झाला.(Maowadi and Naxalwadi Difference)

=========================

हे ही वाचा : 

Dowry Custom : आणि म्हणून भारतात हुंडा प्रथा सुरू झाली!

INS Vikrant : म्हणून INS विक्रांत समोर पाकिस्तानची तंतरते !

==========================

माओवादी आणि नक्षलवाद्यांमधील फरक
माओवाद आणि नक्षलवाद यांच्यामधील आंदोलन भले हिंसाचाराशी संबंधित आहे. पण या दोघांमध्ये फार मोठा फरक आहे. या दोन्ही संघटना कम्युनिस्ट विचारसरणीच्या असल्या तरीही त्यांचे स्वरुप वेगवेगळे आहे. नक्षलवाद्यांच्या जन्म नक्षलबारीमध्ये झाला. तर माओवादाचा जन्म परदेशी राजकीय विचारसरणीशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की, वर्ष 1962 मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धानंतर भारतात माओवादी विचारसरणीला प्रोत्साहन मिळाले. सरकारने याला संपवण्याचा प्रयत्न केला. अभियान चालवले, पण माओवादी विचारसरणी दिसून आली. सशस्र आंदोलन अधिक हिंसक होऊ लागले. तर, छत्तीसगढ दीर्घकाळ या हिंसाचाराचा सामना करत आहे.(Todays Marathi News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.