Home » मोठी बहिण स्टार आणि आईसुद्धा अभिनेत्री, तरीही डांन्सबार मध्ये काम करुन चालवले घर

मोठी बहिण स्टार आणि आईसुद्धा अभिनेत्री, तरीही डांन्सबार मध्ये काम करुन चालवले घर

by Team Gajawaja
0 comment
shagufta rafique
Share

बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखिका शुगफ्ता रफीक (Shagufta Rafique) हिचे आयुष्य एका सिनेमाच्या कथेसारखे आहे. आवारापन, राज, मर्डर-२ सारख्या सिनेमांसाठी डायलॉग्स आणि कथा लिहिणारी शुगफ्ता हिच्या परिवारातील मंडळी सिनेमाक्षेत्रातील होती आणि त्यांच्यामध्ये ती वाढली तरीही तिला आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना करावा लागला आहे. बालपणापासूनच तिला प्रचंड गरीबीचा सामना करावा लागला. त्याचसोबत तिला दत्तक घेतल्याने त्याचे मोल ही चुकते करावे लागले. घरातील मंडळींचे टोमणे ऐकून मोठी झालेली शुगफ्ता दुसऱ्यांनी घातलेले कपडे नेहमी घालायची. लहानपणापासून ते तरुण वयापर्यंत संघर्ष केलेल्या शुगफ्ता हिच्या लेखणीतून असे संवाद आणि कथा लिहिलेल्या गेल्या की, तिची ओळख ही वेगळीच बनली.

मोठी बहिण अभिनेत्री होती
शुगफ्ता हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले की, तिला तिचे खऱ्या आई-बाबा कोण हे माहिती नाही. तिला दत्तक घेतले गेले होते. शुगफ्ताला बॉलिवूड अभिनेत्री सईदा खान हिच्या आईने दत्तक घेतले होते.

सईदा खान यांनी सुद्धा आयुष्यात खुप चढउतार पाहिले. त्यांच्या नवऱ्याला म्हणजेच बृज सदाना यांच्यावर गोळीबार कर ठार केले होते. तर घरात तिच्या आईव्यतिरिक्त बहिण सईदा खान खुप प्रेम करायच्या. सईदा खान अभिनय करुन घर खर्च चालवायी. मी खुप लहान होती. मात्र सईदा खान हिचे लग्न झाल्यानंतर घरात खाण्यापिण्याच्या खुप समस्या येऊ लागल्या. माझी आई आम्हाला खायला मिळावे म्हणून कपडे तर कधी अन्य सामान विक्री करुन पोट भरायची. त्या दरम्यान, कोणीही आमची मदत केली नाही.

दुबईत बारमध्ये डांन्स करायची
शुगफ्ता हिने आर्थिक तंगीमुळे ७ वी मध्येच शिक्षण सोडले. त्याचसोबत गणित समजत नसल्याचे तिने म्हटले. पण माझ्या आजूबाजूला उत्तम इंग्रजी बोलणारी लोक होती. त्यांच्याच परिणाम माझ्यावर झाला. त्यामुळे इंग्रजी सुधारायचे असे तिने ठरवले आणि घराजवळील एका लाइब्रेरीत जाऊन इंग्रजी पुस्तकांचे वाचन ती करायची. मात्र कोणीही लिहण्याची संधी देत नव्हते. दरम्यान, मला डांस करण्यासाठी विचारु लागले होते. त्यानंतर शुगफ्ताला तिच्या एका मित्राने दुबईत नोकरी करण्याचा सल्ला दिला. ती तेथे निघून गेली आणि तेथे तिने एका बियर बारमध्ये डांसरच्या रुपात काम केले. त्यानंतर गाण्याच्या क्षेत्रात आली.(Shagufta Rafique)

हे देखील वाचा- सौंदर्य-आलिशान लाइफस्टाइल असूनही ‘या’ कारणांमुळे ट्रोल होतात हे स्टार किड्स

मुंबईत कामासाठी वणवण करावी लागली
दुबईत काम करतेवेळी गंभीर रुपात आजारी पडली. त्यानंतर पुन्हा मुंबईत यावे लागले. पण आपल्या आजरपणावर मात केली पण तिचा स्ट्रगल सुरुच होता. काही वेळा तिला खुप काही सहन करावे लागले. लोकांनी वाईट नजरेने ही पाहिले. लोकांना मी लिखाण करण्याऐवजी डांन्सरच्या रुपात काम करावे हेच हवे होते. अखेर माझ्या छंदाला एक वेगळी ओळख मिळाली आणि मी आज काही सिनेमांच्या कथा आणि डायलॉग्सची राणी झाल्याचे तिने सांगितले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.