Home » स्वामी केवळ अविस्मरणीय!

स्वामी केवळ अविस्मरणीय!

by Correspondent
0 comment
Ranjit Desai | K Facts
Share

रणजित देसाई यांनी “स्वामी” लिहिली ती वि. स. खांडेकरांच्या आग्रहाखातर. आणि मराठीत ऐतिहासीक कादंबरीला नवे प्रमाण मिळाले. “स्वामी” आधी आणि नंतरही बरंच साहित्य मराठीत आलं. पण स्वामी केवळ अविस्मरणीय!

मांगा करे अबसे दुवा हिजरे यार की
आखिर तो दुष्मनी है, असर को दुवा के साथ
“स्वामी” च्या प्रारंभाची सुरवात या ओळींनी होते.
आज सत्तावीस वर्षे झाली स्वामीकारांना जाऊन, तरी त्यांची लोकप्रियता ओसरली नाही. रणजित देसाईंचा आदर्श प्रत्येक व्रतस्थ लेखकाला सृजनानंदाची दिशा देइल. प्रत्येक आस्वादक वाचकाशी उच्च भावनिक स्तरावर संवाद साधेल, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवेल…..

विशेष म्हणजे स्वामीचं यश हे स्वामीकारांच्या अखेरपर्यंत राहीलं. तरीही प्रामाणिकपणे ते हेच सांगतात की, “कादंबरी उचलली जाते म्हणजे काय होतं ते मला स्वामीमुळे समजलं. वाचकांनी माझ्यावर इतकं भरभरून प्रेम केलं की शेवटी मला “स्वामीकार” व्हावं लागलं. स्वामीसाठी इतिहासाचा अभ्यास करताना मला कित्येकवेळा वाटायचं, की मी या थोर पेशव्यांचे देणे द्यायचे नव्हते, तर त्यांनीच माझे काहीतरी देणे द्यायचे शिल्लक राहिले होते. ते देणे ते आत्ता देताहेत. बोलून चालून राजाचे देणे! त्याचे वजन पेलणे माझ्यासारख्या सामान्यांला कसे शक्य आहे.”

कोण सांगावयास। गेले होते देशोदेश ॥
दिले वा-याहाती माप। माझा समर्थ तो बाप ॥
– रणजित देसाई

स्वामी- रणजित देसाई

कृतज्ञता व्यक्त करताना स्वामीकार पुढे म्हणतात-
“सहा महिन्यांच्या ‘स्वामी’ची पहिली आवृत्ती संपली. तीन वर्षांच्या परिश्रमांचा क्षणात विसर पडला. अहंकार नाहीसा झाला आणि तिव्रतेने जाणीव झाली, ती ह्या वाढत्या ऋणांची. ह्याचा उल्लेख करण्यापलीकडे मी काय करु शकतो! हे वाढते ऋण मी साठवतो आहे, जतन करतो आहे. ऋणमुक्त होण्याचा विचारही माझ्या मनाला शिवत नाही. कारण ते माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे. आज कृतज्ञता व्यक्त करण्यापलीकडे माझ्या हाती काहीही राहीलेले नाही.”

इतिहासाबद्दल सर्वांना प्रेम वाटते. ऐतिहासिक प्रसंगांमुळे, ऐकलेल्या कथांमुळे काही व्यक्तींचा ठसा मनावर उमटतो; पण आपण जेव्हा एखादी विशिष्ट ऐतिहासीक व्यक्ती डोळ्यांसमोर ठेवून इतिहासाचे अवलोकन सूक्ष्मपणे करू लागतो, त्यांवर चिंतन करू लागतो, तेव्हा कल्पना व सत्य यांतील अंतर जाणवू लागते. माधवरावांच्या कालखंडाचा अभ्यास करीत असता रणजित देसाईंना हे जाणवले. हा अभ्यास करण्यासाठी पुस्तकांची, बखरींची गरज लागली. त्यातील काही दुर्मिळ होती; पण ती पुस्तके मिळवून देण्यासाठी त्यांना अनेक इष्टमित्रांनी सहाय्य केले.

ग्रॅंट डफ च्या पंक्तिंचा उल्लेख स्वामीकारांनी केलेला वाचकांना पहायला मिळाला-

या तरून पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव,
त्यापुढे पानीपतचा आघात काहीच नव्हे

……AND THE PLAINS OF PANIPAT WERE NOT MORE FATAL TO THE MARATHA EMPIRE THAN THE EARLY END OF THIS EXCELLENT PRINCE
-Grant duff

शब्दांकन- शामल भंडारे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.