भारतातील खगोलशास्त्रावर आणि विज्ञानावर गारुड असलेली व्यक्ती म्हणजे जयंत नारळीकर. जेव्हा जेव्हा भारतात खोलशास्त्रासंबंधित काही नवीन घडते तेव्हा सगळ्यांनाच जयंत नारळीकरांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, मराठी व्यक्तीने आपल्या हुशारीने खगोलशास्त्रामध्ये अटकेपार झेंडा लावत संपूर्ण जगभर आपली ओळख निर्माण केली. नारळीकरांनी कायम भारतीयांना विज्ञान विषयाकडे नेण्याचा आणि या विषयामध्ये आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या कामाने ज्यांनी सतत नवनवीन शोध लावले आणि जगाला खगोलशास्त्रातील अनेक आश्चर्यचकित गोष्टी सांगितल्या अशा जयंत नारीकरांचे आज दुःखद निधन झाले. (Jayant Narlikar)
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं पुण्यात निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयंत नारळीकर यांनी विज्ञानातील अनेक बदल, नवे शोध जगापुढे मांडले. आंतरराष्ट्रीय किर्तीचे खगोलशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख होती. खगोलशास्त्रामध्ये काम करताना त्यांनी भारताला जागतिक ओळख मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धान्त मांडल्यानंतर जयंत नारळीकरांचं नाव खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले. याच सिद्धान्तानंतर त्यांना घरोघरी ओळख मिळाली. (Marathi News)
स्वतंत्र भारतातील विज्ञानजगताचा खरा चेहरा म्हणून नारळीकरांनी कीर्ती पसरली. पुढे १९६५ साली त्यांनी भारतदर्शन ही मोहीम सुरु केली. या मोहिमेअंतर्गत नारळीकरांनी देशातील विविध ठिकाणी व्याख्यानं दिली. त्यांचे हे कार्य सरकारच्या देखील नजरेस पडले आणि सरकारकडूनही नारळीकरांच्या कार्याची दखल घेतली गेली. त्यांना वयाच्या २७ व्या वर्षी १९६५ साली ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने गौरविण्यात आलं. नारळीकरांनी खगोलशास्त्रासोबतच विज्ञानामध्ये देखील मुबलक काम केले. लहान मुलांना विज्ञान विषयात गोड निर्माण व्हावी या हेतून त्यांनी त्यांच्यासाठी रंजक पुस्तकं देखील लिहिली. जाणून घेऊया जयंत नारळीकरांच्या कारकिर्दीबद्दल अधिक माहिती. (Marathi Top News)
डॉ. जयंत नारळीकर याचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ होते. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे ते प्रमुख होते. तर त्यांच्या आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. बीएससी पदवी प्राप्त केल्यानंतर नारळीकर उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात गेले.(Social News)
जयंत नारळीकर यांनी केंब्रिज विद्यापीठात बी.ए. एम.ए. आणि पी.एचडी.च्या पदव्या मिळवल्या. त्या काळात त्यांनी रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल आणि इतर अनेक बक्षिसे मिळवली. यासोबतच नारळीकरांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी. देखील केली. सर फ्रेड हॉईल डॉ. नारळीकरांच्या हुशारीने अतिशय प्रभावित झाले. त्यामुळे १९६६ जेव्हा हॉईड यांनी केंब्रिज येथे ‘इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरॉटीकल अॅस्ट्रॉनॉमी’ नावाची स्वत:ची संस्था सुरू केली, त्यात डॉ. नारळीकरांचा महत्वाचा वाटा होता.
१९६६ ते १९७२ पर्यंत जयंती नारळीकर या संस्थेशी संलग्न होते. सर हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोल शास्त्रात मिळून विपुल संशोधन केलं. त्यांनी गुरुत्वाकर्षणावर संशोधन करून एक महत्वाचा सिद्धांत मांडला, हा सिद्धांत ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ या नावाने खगोलशास्त्रात खूप प्रसिद्ध आहे. अर्ल्बर्ट आईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांताशी साधर्म्य साधणारा असा हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत असे सांगतो की, वस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते. (Top Marathi Stories)
जयंत नारळीकरांचे काम चालू असतानाच त्यांना १९७२ साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुन्हा भारतात बोलावून घेतले. त्यानंतर जयंत नारळीकर हे टीआयएफआरमध्ये दाखल झाले. त्यांनी पुण्यात इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) ची स्थापना केली. IUCAA हे आज खगोलशास्त्र संशोधनाचं प्रमुख केंद्र आहे. भारताचं आजचं खगोलशास्त्राची जी प्रगती आहे त्याचा पाया जयंत नारळीकर यांनी रचला होता. (Marathi Latest News)
खगोलशास्त्रज्ञ असण्यासोबतच नारळीकर हे उत्तम लेखक होते. विज्ञानाशी आजच्या पिढीची आणि खासकरून लहान मुलांची मैत्री व्हावी यासाठी त्यांनी अतिशय उत्तम पुस्तकं लिहिली. २०२१ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठीच नव्हे, तर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम रचण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. जयंत नारळीकरांनी अनेक पुस्तक लिहिली. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. नारळीकरांनी यक्षांची देणगी, कृष्णविवर, उजव्या सोंडेचा गणपती, गंगाधरपंतांचे पानिपत, धूमकेतू, पुनरागमन, दृष्टीआड सृष्टी, धोंडू, पुत्रवती भव, ट्रॉयचा घोडा, नौलखा हाराचे प्रकरण, अखेरचा पर्याय अशा भुरळ घालणाऱ्या विज्ञान कथा लिहिल्या. (Marathi Trending News)
डॉ. जयंत नारळीकर यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर डॉ. नारळीकरांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६६ साली त्यांचे लग्न मंगला सदाशिराव राजवाडे यांच्याशी झाले. त्यांना गीता, गिरिजा आणि लिलावती या तीन मुली आहेत. मात्र डॉ. मंगला नारळीकर यांचं १७ जुलै २०२३ रोजी निधन झालं होतं. त्या देखील लेखिका होत्या. लहान मुलांना अगदी सोप्या भाषेत गणित समजावून सांगणाऱ्या लेखिका म्हणून त्यांची ओळख होती. (Trending News)
डॉ. जयंत नारळीकर यांची विपुल साहित्य संपदा
अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशिनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस
=======
हे देखील वाचा : Train : रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या का असतात?
=======
डॉ. जयंत नारळीकर यांना मिळालेले पुरस्कार
पद्मभूषण (1965)
पद्मविभूषण (2004)
राष्ट्रीय विज्ञान संस्थेने इंदिरा गांधी पुरस्कार (1990)
युनोस्कोचा ‘कलिंग पुरस्कार’ (1996)
फ्रेंच सरकारचा ‘प्रिक्स जोन्सन’ पुरस्कार (2004)
याशिवाय, डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम. पी. बिर्ला सन्मान, तसेच फ्रेंच अॅस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सन पुरस्कार हे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय सन्मानही त्यांना प्राप्त झाले होते.