Shah Rukh Khan Life : शाहरुख खान, ज्याला संपूर्ण जग “बॉलिवूडचा किंग” किंवा “रोमांसचा बादशाह” म्हणून ओळखतं. आज तो फक्त भारतातच नव्हे, तर जगभर प्रसिद्ध आहे. मात्र, त्याच्या यशाच्या प्रवासामागे काही अनोळखी आणि प्रेरणादायक गोष्टी दडलेल्या आहेत, ज्या अनेकांना माहिती नाहीत. खरंतर, शाहरुख खानच्या लाइफबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्याची पहिली मालिका ते सिनेमा अशा अनेक गोष्टी एसआरकेबद्दल सांगण्यासारख्या आहेत. पण आयुष्यात शाहरुखने केलेला संघर्ष ते किंग खान पर्यंतच्या प्रवासातील काही खास किस्से फार कमी जणांनाच माहिती आहेत. तर या लेखात आपण शाहरुख खानच्या जीवनातील काही अशाच गोष्टी जाणून घेणार आहोत.
1. वडिलांच्या निधनानंतरचा संघर्ष
शाहरुख खान केवळ 15 वर्षांचा असताना त्यांचे वडील मिर्झा ताज खान यांचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या आईचाही मृत्यू झाला. आई-वडिलांच्या निधनाने त्यांचं बालपण दुःखमय झालं. त्यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष केला. दिल्लीहून मुंबईपर्यंतचा प्रवास त्यांनी एकट्याने, स्वप्न आणि जिद्दीच्या जोरावर पूर्ण केला.
2. अभिनयापूर्वीची कारकीर्द
शाहरुखने आपल्या करिअरची सुरुवात दूरदर्शनवरील “फौजी” आणि “सर्कस” या मालिकांमधून केली होती. त्याकाळी त्याला फक्त टीव्ही अभिनेता म्हणूनच ओळखलं जायचं. त्याच्या कलेमध्ये असलेली खोली लक्षात घेता, तो पुढे चित्रपटसृष्टीत उंच भरारी घेईल, हे कोणीही अंदाज केला नव्हता.

shah rukh khan life
3. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’साठी सुरुवातीला नकार
शाहरुख खानने ‘डीडीएलजे’ हा ऐतिहासिक चित्रपट स्वीकारण्याआधी त्याला नकार दिला होता. त्यावेळी तो स्वतःला अँटी-हिरो म्हणून ओळखायला लागला होता (डर, बाजीगर, अंजाम सारख्या चित्रपटांमुळे). त्याला वाटायचं की प्रेमकहाणीतील हिरोची भूमिका त्याला शोभून दिसणार नाही. पण जेव्हा त्याने ती भूमिका केली, तेव्हा त्याने संपूर्ण रोमॅंण्टिक हिरोची व्याख्या बदलून टाकली.
===================
हे ही वाचा :
Jayant Narlikar : तारा निखळला : खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांचे निधन
Yesubai : स्वराज्यातील रणरागिणी : महाराणी येसूबाई
=====================
4. शाहरुखचा ‘फोबिया’
खरं वाटणार नाही, पण शाहरुख खानला घोड्यांची भीती आहे. एका अपघातामुळे त्याला घोड्यावर बसण्याची भीती वाटू लागली आणि आजही त्याने अनेक चित्रपटांमध्ये ही गोष्ट टाळलेली आहे. याशिवाय त्याला समुद्रात पोहण्याची देखील भीती आहे.(Celebrity News)
5. शिक्षणात हुशार आणि क्रीडाप्रेमी
दिल्ली विद्यापीठातील हंसराज कॉलेजमध्ये शाहरुखने इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला. त्यानंतर त्याने जामिया मिलिया इस्लामिया येथे मास कम्युनिकेशनचे शिक्षण सुरू केलं, पण अभिनयाच्या आवडीमुळे ते अर्धवट सोडलं. तो कॉलेजमध्ये उत्तम फुटबॉल आणि हॉकी खेळाडूही होता.(Shah Rukh Khan Life)
शाहरुख खानचा जीवनप्रवास हा केवळ चित्रपटांतून गाजलेला नाही, तर त्यामागील कष्ट, दु:ख आणि मेहनतीचं प्रतीक आहे. त्याचं यश हे नशिबाने नव्हे, तर अपार कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वासाने मिळवलेलं आहे. म्हणूनच शाहरुख खान फक्त स्टार नाही, तर लाखो तरुणांच्या स्वप्नांना उभारी देणारा प्रेरणास्थान आहे.(Bollywood Life)