Home » पिंक टॅक्स म्हणजे नक्की काय? भारतातील महिलांवर असा पडतोय प्रभाव

पिंक टॅक्स म्हणजे नक्की काय? भारतातील महिलांवर असा पडतोय प्रभाव

तुम्ही पिंक टॅक्सबद्दल ऐकले असेल. पण काहींच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की, नक्की पिंक टॅक्स आहे तरी काय? याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
Pink Tax
Share

Pink Tax : भारतात तुम्ही पिंक टॅक्सबद्दल ऐकले असेल. पण तुम्हाला पिंक टॅक्स म्हणजे नक्की काय हे माहितेय का? याशिवाय हा टॅक्स केवळ महिलांकडून वसूल केला जातो का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया सविस्तर…

पिंक टॅक्स म्हणजे काय?
पिंक टॅक्सचा अर्थ म्हणजे गुलाबी कर असा होतो. पिंक रंगाबद्दल ऐकल्यानंतर महिलांचा विचार प्रथम येते. खरंतर, पिंक टॅक्स अधिकृत कर नाही जो सरकार किंवा एखाद्या कंपनीला द्यायचा असतो. हा एक अतिरिक्त शुल्काप्रमाणे आहे. जो महिलांच्या डिझाइनर अथवा महागड्या गोष्टींवर लावला जातो.

पुरुषांच्या तुलनेत महिला महागड्या वस्तूंवर सर्वाधिक पैसे खर्च करतात. अधिक महाग प्रोडक्ट्स महिला खरेदी करताना दिसून येतात. अशातच तुम्हाला कळू शकते की, कोणत्याही महागड्या प्रोडक्ट्सवर पुरुषांच्या तुलनेत महिलांकडून अधिक खर्च केल्यास ते पिंक प्रोडक्ट म्हणून ओखळले जाते.

What is the “Pink Tax” and why is it problematic? - Democratic Naari

भारतात पिंक टॅक्सचा अर्थ काय?
भारतात पिंक टॅक्स हा कायदेशीर नाही. याशिवाय पिंक टॅक्ससाठी सरकारकडून कोणताही नियम तयार करण्यात आलेला नाही. म्हणजेच एखाद्या प्रोडक्टवर किती टॅक्स द्यायचा हे अद्याप ठरवण्यात आलेले नाही. याशिवाय भारतात पिंक टॅक्सबद्दल अधिक रिसर्च करण्यात आलेला नाही. (Pink Tax)

अज्ञातपणे महिला देतात प्रोडक्ट्ससाठी अधिक पैसे
महिलांचे प्रोडक्ट्स पुरुषांच्या तुलनेत अधिक महागडे असतात. बिझनेस ऑफ फॅशन डॉट कॉमच्या एका रिपोर्ट्सनुसार, पुरुषांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या कपड्यांच्या तुलनेत महिलांचे कपडे अधिक महाग असतात. याचा थेट परिणाम महिलांच्या उत्पन्नावर होतो.


आणखी वाचा :
घामामुळे केसांमध्ये खाज येते? करा हे उपाय
चेहऱ्यावरील हायपिग्मेंटेशनच्या समस्येवर करा ‘हा’ उपाय, उजळेल त्वचा
वयाच्या पंन्नाशीत मेकअप करताना करू नका या चुका, बिघडेल लुक

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.