Home » मुग्धा वैशंपायनची पहिली मंगळागौर

मुग्धा वैशंपायनची पहिली मंगळागौर

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mugdha Vaishampayan
Share

 

Mugdha Vaishampayan

सध्या श्रावण महिना सुरु आहे. त्यामुळे विविध सणवार चालू आहेत. श्रावणातला नववधू आणि सवाष्णींसाठीचा एक मोठा आणि महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर. नवीन लग्न झालेल्या वधूंसाठी या सणाचे विशेष महत्व असते.

Mugdha Vaishampayan

श्रावणात सर्वच नवविवाहित महिला ही पूजा करतात. मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका असणाऱ्या मुग्धा वैशंपायनने देखील ही तिची पहिली मंगळागौर साजरी केली आहे.

Mugdha Vaishampayan

मुग्धाने गायक प्रथमेश लघाटेसोबत डिसेंबर २०२३ मध्ये लगीनगाठ बांधली. ‘सारेगमप’ लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील पंचरत्नांमधे प्रथमेश आणि मुग्धा यांची ओळख झाली होती.

Mugdha Vaishampayan

मागच्यावर्षी मुग्धा आणि तिची बहीण मृदुल यांचे लग्न झाले. त्यामुळे दोघींची यावर्षी पहिली मंगळागौर होती. ही मंगळागौर झाल्यानंतर नुकतेच मुग्धाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याचे काही फोटो शेअर केले आहेत.

Mugdha Vaishampayan

हे फोटो पाहिले तर लक्षात येईल, की दोघी बहिणींनी अतिशय पारंपरिक लूक केला आहे. मुग्धाने केशरी रंगाची साडी नेसली असून, तिची बहीण असलेल्या मृदुलने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.

Mugdha Vaishampayan

जे मुग्धा आणि मृदुल यांच्या ज्वेलरीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी मंगळसूत्र, नथ, पाटल्या, बांगड्या घातल्या आहेत. तर केसांचा अंबाडा करत त्यात गजरा माळला आहे.

Mugdha Vaishampayan

सध्या या दोघाचे फोटो चांगलेच व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी त्यांच्या लूकचे आणि त्यांचे आपल्या संस्कृतीवर असलेल्या प्रेमाचे भरभरून कौतुक केले आहे.मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, मंगळागौर


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.