Home » पावसाळ्यात रेड, यल्लो, ऑरेंज अलर्टचा असा होतो अर्थ

पावसाळ्यात रेड, यल्लो, ऑरेंज अलर्टचा असा होतो अर्थ

by Team Gajawaja
0 comment
Monsoon Alert
Share

दिल्लीत पावसामुळे स्थिती अत्यंत वाईट होत चालली आहे. यमुना नदीची पातळी वाढत चालली आहे. यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे आणि सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. दक्षिण पूर्व दिल्ली ते पूर्व दिल्ली, उत्तर दिल्ली पर्यंत काही परिसरात पाणी भरले गेले आहे. रस्तेच नव्हे तर घरात सुद्धा पाणी घुसले गेले आहे. काही मुख्य मार्गांवर पाणी भरल्याने ट्राफिक सुद्धा जाम होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगितले आहे.(Monsoon Alert)

दिल्लीत काही ठिकाणी भूस्ख्खलन सुद्धा झाले आहे.त्यामुळे पर्यटक अडकले गेले आहेत. हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब,हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात झालेल्या पावसामुळे तेथील स्थिती ह बिघडली गेली आहे. अशा स्थितीत सरकारने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. खरंतर ग्रीन, यल्लो, ऑरेंज आणि रेड अलर्ट हे हवामान खात्याकडून दिले जातात. मात्र ग्रीन अलर्ट जारी केला जात नाही. परंतु तुम्हाला या विविध रंगांच्या अलर्टचा नेमका अर्थ माहितेय का?

यल्लो अलर्ट कधी दिला जातो?
जेव्हा एखाद्या राज्यात काही ठिकाणी खुप पाऊस पडण्याची शक्यता असते तेव्हा सरकार यल्लो अलर्ट जारी करतो. येल्लो अलर्टमध्ये ६४.५ ते ११.५५ मिमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यल्लो अलर्ट म्हमजे पावसासंबंधिक सुचना आणि अपडेट घेत राहणे. हवामान विभागाकडून यल्लो अलर्ट जारी करणे म्हणजे कोणताही धोका नाही. मात्र स्थिती कधीही बदलू शकते. त्यामुळे लोकांनी त्यानुसार तयार राहिले पाहिजे. यामागील उद्देश ऐवढाच असतो की, पावसाळ्याच्या स्थिती प्रति सतर्क रहावे, यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता २ तास असेल असा अंदाज लावला जातो. त्याचसोबत पुर येण्याची सुद्धा शक्यता असते.

ऑरेंज अलर्ट
ऑरेंज अलर्ट तेव्हा जारी केला जातो जेव्हा ११५.६ मिमी ते २०४.४ मिमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असते. खरंतर ऑरेंज अलर्ट म्हणजे यावेळी खुप पाऊस पडण्याची शक्यता असते. याचा थेट अर्थ असा होतो की, ऋतूची स्थिती बिघडली जाणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नये. जर घराबाहेर अत्यंत महत्त्वाचे काम असेल तर सावधगिरी बाळगावी. चक्रीवादळादरम्यान हवेचा वेग ६५ ते ७५ कमी प्रति तास असण्याची शक्यता असते. ऑरेंज अलर्ट दरम्यान पुर येण्याची शक्यता ही वाढते.(Monsoon Alert)

हेही वाचा- पौर्णिमेला आपले मन विचलित होण्यामागे ‘हे’ आहे कारण

रेड अलर्ट
जेव्हा एखाद्या परिसरात किंवा क्षेत्रात खुप तुफान पाऊस पडणार असेल तेव्हा रेड अलर्ट जारी केला जातो. याला अॅक्टिव्हली हैवी रेनफॉल असे म्हटले जाते. यामध्ये २०४.४ मिमी पेक्षा अधिक पावसाची शक्यता असते. ढगफुटी, नद्यांच्या पाण्याचा स्तर वाढल्यास रेड अलर्ट जारी केला जातो. या व्यतिरिक्त डोंगराळ भागात भूस्ख्खलन किंवा झाडं पडण्याची स्थिती निर्माण झाल्यास रेड अलर्ट जारी केला जातो. या दरम्यान स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जाते. रेड अलर्ट म्हणजे धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.

ग्रीन अलर्ट
याचा अर्थ असा होतो की, आता वातावरण ठीक आहे. जेव्हा ऋतू संबंधित कोणताही धोका नसतो तेव्हा ग्रीन अलर्ट दिला जातो. परंतु तो जारी केला जात नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.