Home » Makar Sankrant मकर संक्रांतीचे महत्व आणि माहिती

Makar Sankrant मकर संक्रांतीचे महत्व आणि माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Makar Sankrant
Share

इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण म्हणून मकर संक्रांत (Makar Sankrant) सणाला ओळखले जाते. मराठी महिन्यातल्या पौष महिन्यात मकर संक्रांत सण साजरा केला जातो. बहुतकरून हा सण दरवर्षी १४ जानेवारीलाच साजरा केला जातो. कधी कधी अपवादात्मक स्थितीमध्ये हा सण १५ जानेवारी किंवा १३ जानेवारीला देखील येतो. (Makar Sankrant)

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्याकडे कृषी अर्थात शेतीशी संबंधित अनेक सणवार साजरे केले जातात. यातलाच एक महत्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांत. या सणाचा सौर कालगणनेशी संबंध आहे. संक्रांतीचा सण तीन दिवस साजरा केला जातो. या दिवसांमध्ये शेतांत आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात. (Marathi Top News)

पौष महिन्यात जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण येते. या दिवसानंतर सूर्य हळूहळू उत्तरेकडे झुकत जातो. मकर संक्रांतीपासूनच ऋतू बदलण्यास सुरुवात होते. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त सकाळी ०९:०३ ते ०५:४६ पर्यंत आहे. मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी ०९:०३ ते १०:४८ पर्यंत आहे. महा पुण्यकाल १ तास ४५ मिनिटांपर्यंत आहे, तर पुण्यकाळ ८ तास ४२ मिनिटांपर्यंत आहे. (Makar Sankrant Muhurt)

Makar Sankrant

मकर संक्रांतीच्या दिवशी पुनर्वसु नक्षत्र आणि विश्वकुंभ योगाचा योगायोग तयार होतोय. १४ जानेवारीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. दरवर्षी सूर्य मकर राशीत २० मिनिटं उशिरा प्रवेश करतो. दर तीन वर्षांनी सूर्य एक तासांनंतर आणि दर ७२ वर्षांनी एका दिवसाच्या विलंबाने मकर राशीत प्रवेश करतो. या वर्षी अर्थात २०२५ साली सूर्य सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे. (Marathi News)

मकर संक्रातची कथा
मकर संक्रांतीबद्दल आपल्या पुराणांमध्ये अनेक कथा आहेत. मकरसंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व सामान्य लोकांना त्याच्या जाचातून मुक्त केले. देवीने हा वध केला त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले.

तर दुसरी अजून एक कथा अशी सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांची मस्तक मंदार पर्वतात पुरले. राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली. म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तीळगुळ देऊन गोड बोला असे म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात. मकर राशीचा स्वामी शनीदेव आहे. म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते. (Makar Sankrant Story)

मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्व आहे. मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान करणे खूप शुभ आहे. या दिवशी काळे तीळ दान केल्याने शनिदेवाच्या साडेसाती आणि साडेसातीपासून आराम मिळतो. संक्रांतीच्या दिवशी तीळ गुळाची पोळी आणि हलव्याला यांना मोठे महत्व असते.

Makar Sankrant

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा काळ्या तीळाने केली जाते. या दिवशी तुमच्या घरी कोणी भिकारी, साधू, वृद्ध किंवा असहाय व्यक्ती आल्यास त्याला कधीही रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी त्याला प्रसन्न करण्यासाठी सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा. या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करताना ‘ओम ह्रीं हरी सूर्याय नमः’ या विशेष मंत्राचा जप करावा.

मकर संक्रांतीचा सण भर हिवाळ्यात येतो. त्यामुळे आपल्या शरीराला आतून उष्णतेची आणि उबेची गर्क असते. म्हणूनच या सणाला तीळ आणि गुळ हे उष्ण पदार्थ खाल्ले जातात. या सोबतच हा सण थंडीचा दिवसात येत असल्याने या काळात ऊबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून संक्रातीला काळे कपडे परिधान करण्याची पद्दत आहे. (Makar Sankrant Special)

==========

हे देखील वाचा : Pongal जाणून घ्या दक्षिण भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या पोंगल सणाची माहिती

Bhogi 2025 जाणून घ्या भोगी सण म्हणजे काय आणि त्याचे महत्व

==========

नवीन बाळांसाठी आणि नववधूंसाठी मकर संक्रांत हा सण खूपच महत्वाचा असतो. मकर संक्राती या सणाला नवीन नवरीला आणि बाळांना हलव्याचे दागिने हलव्याचे दागिने घालून तयार केले जाते. शिवाय या दिवशी लहान मुलाचे बोरन्हाण देखील केले जाते. अनेक ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची देखील पद्धत आहे. खासकरून गुजरातमध्ये पतंगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.