Home » Career : १० वी नंतर काय करायचे…?

Career : १० वी नंतर काय करायचे…?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Career
Share

शाळेत जायला सुरुवात झाल्यापासूनच आई-वडिलांना आणि समजायला लागल्यावर विद्यार्थ्यांना देखील १० वीचे खूपच टेन्शन असते. १० वी बोर्डाची परीक्षा, शिवाय यानंतर मुलांना आपल्या आवडत्या क्षेत्रात करियर करण्याची संधी येते. म्हणूनच १० वी आपल्या करियरचा बेस समजला जातो. यासाठी रात्रंदिवस जागून मुलं १० वी चा अभ्यास करतात. १० वी चा निकाल लागणार म्ह्टल्यावरच सगळ्यांच्या मनात धडकी भरते. (Career)

पास होणार हे माहित असले तरी किती मार्क्स मिळणार? आपल्या आवडत्या क्षेत्रात आपल्याला ऍडमिशन मिळेल ना? काहींना तर मी पास होईल ना? हा पण प्रश्न पडतो. तर काही लोकांचे असते निकाल लागल्यानंतर मार्क्स पाहून ठरवू कोणत्या क्षेत्रात करियर करायचे. असे अनेक प्रश्न सगळ्यांना सतावत असतात. आज आम्ही तुमचे हेच काम थोडे सोपे करणार आहोत. १० वी नंतर कोणकोणते करियर ऑप्शन तुमच्यासमोर आहेत हे आज जाणून घेऊया. (Marathi News)

१० वी नंतर शैक्षणिक पर्याय
> इयत्ता अकरावी आणि बारावी
> डिप्लोमा कोर्सेस
> मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्सेस
> पॉलिटेक्निक कोर्सेस
> प्रोफेशनल कोर्सेस
> आयटीआय कोर्सेस

दहावीनंतर सायन्स, आर्टस्, कॉमर्स या तीन स्टीम्स पैकी एक घेऊन तुम्ही ११ वी १२ वी करू शकता. मात्र कोणत्या फिल्डमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तुमच्यासमोर कोणत्या संधी असतात जाणून घेऊया.(Social News)

विज्ञान (सायन्स) शाखेतील करिअर संधी आणि १२ वी नंतरचे पर्याय

> वैद्यकीय शाखा
> पॅरामेडिकल कोर्सेस
> अभियांत्रिकी
> तांत्रिक डिप्लोमा
> बीएससी हॉटेल मॅनेजमेंट
> बीएससी आयटी
> बीएससी बायोटेक्नॉलॉजी
> बीएससी
> बीएससी एग्रीकल्चर
> बीबीए
> बीसीएस

Career

कला (आर्टस्) शाखेतील करिअरच्या संधी आणि १२ वी नंतरचे पर्याय

> बीएस एलएलबी
> बीए
> आयटीआय
> तत्सम सर्टिफिकेट कोर्सेस

वाणिज्य (कॉमर्स) शाखेतील करिअर संधी आणि १२ वी नंतरचे पर्याय

> बीकॉम
> आयसीडब्ल्यूए
> सीएफए
> सीएफए

याशिवाय जर तुम्हाला १० वी नंतर पुढील शिक्षण न घेता थेट नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही १० वी नंतर अनेक चांगल्या क्षेत्रांमध्ये आपले उत्तम करियर घडवू शकता. केवळ १० झाली म्हणून करियर घडत नाही असा गैरसमज नका ठेऊ. मग १० वी नंतर तुम्ही कुठे जॉब करू शकता जाणून घ्या.

भारतीय सैन्यात नोकरी
तुम्ही भारतीय सैन्यात १० वी नंतर सैनिकासाठी अर्ज करू शकता, या पदासाठी तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे आणि शारीरिक निकष देखील पूर्ण करणे आवश्यक आहे. (Marathi Laetst News)

=======

हे देखील वाचा : Maharashtra : महाराष्ट्रातील असे गाव जिथे चक्क सापांना पाळले जाते

=======

रेल्वेत नोकरी
रेल्वेत नोकरी करायची असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. रेल्वेमध्ये १० वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काही पदे देखील असतात. या पदांसाठी वेळोवेळी भरती होते.

बँकेत नोकरी
बँकेत नोकरी करायची असेल, तर तेथे अधीनस्थ कर्मचाऱ्यांची भरती केली जाते, ज्यासाठी दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांची मागणी असते. यानुसार तुम्ही अर्ज करून बँकेत नोकरी करू शकता.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.