प्रयागराजचा महाकुंभ संपन्न झाल्यानंतर आता सर्वांचेच लक्ष लागले ते नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याकडे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. भारतात नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि प्रयागराज या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. नुकताच प्रयागराज येथे १४४ वर्षांनी येणारा महाकुंभ झाला. आता २०२७ साली नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नुकत्याच या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. (Nashik)
मागील बऱ्याच दिवसांपासून या कुंभमेळ्याची तयारी आणि बैठकी चालू आहेत. १ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक नाशिक येथे पार पडली. यामध्ये १३ आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे १० शैव आखाड्यांचे २० महंत तर ३ वैष्णव आखाड्यांचे ६ महंत देखील उपस्थित होते. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत. (Nashik Sinhastha Kumbhmela)
पवित्र सिंहस्थ महापर्वाची अधिकृत सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२६ शनिवारी दुपारी १२:०२ वाजता पंचवटीतील रामकुंड येथील साधुग्राम येथे ध्वजारोहणाने होईल. या मुख्य प्रसंगी, नगर प्रदक्षिणा आयोजित केली जाणार आहे. या कुंभमेळ्याच्या शाही स्नानांना ‘अमृत स्नान’ म्हणून संबोधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण कंभमेळ्यातील महत्त्वाचे उत्सव आणि शाही स्नानांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. (Marathi News)
त्र्यंबकेश्वर कुंभ अमृतस्नान तारखा
कुंभ ध्वजारोहण : ३१ ऑक्टोबर २०२६
पहिले अमृस्नान : २ ऑगस्ट २०२७
दुसरे अमृस्नान : ३१ ऑगस्ट २०२७
तिसरे अमृस्नान : १२ सप्टेंबर २०२७
नाशिक कुंभ अमृतस्नान तारखा
कुंभ ध्वजारोहण : ३१ ऑक्टोबर २०२६
पहिले अमृस्नान : २ ऑगस्ट २०२७
दुसरे अमृस्नान : ३१ ऑगस्ट २०२७
तिसरे अमृस्नान : ११ सप्टेंबर २०२७
प्रमुख सण आणि उत्सव
ऋषी पंचमी: ५ सप्टेंबर २०२७
भाद्रपद शुद्ध एकादशी: ११ सप्टेंबर २०२७
भाद्रपद पौर्णिमा: १५ सप्टेंबर २०२७
अश्विन शुद्ध एकादशी आणि पौर्णिमा: ११ आणि १५ ऑक्टोबर २०२७
कार्तिक शुद्ध एकादशी आणि पौर्णिमा: १० आणि १४ नोव्हेंबर २०२७
गंगा दसरा उत्सव: २५ मे ते २ जून २०२८
महाशिवरात्री: २७ फेब्रुवारी २०२८
वसंत पंचमी: १ फेब्रुवारी २०२८
मौनी अमावस्या : २६ जानेवारी २०२८
गंगा-गोदावरी उत्सव आणि समारोप
गंगा-गोदावरी उत्सव: 8 फेब्रुवारी 2028
सिंहस्थ समाप्ती: २० फेब्रुवारी २०२८ दुपारी ३:३६ वाजता
या बैठकीत नाशिक साधुग्रामसाठी कायमस्वरूपी १५०० एकर जागा अधिग्रहीत करण्यात यावी, या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. शिवाय गोदावरी प्रदुषणमुक्त आणि प्राधिकरण या विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे, नाशिकच्या २२ महिन्यांच्या या कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये एकूण ४२ ते ४५ पर्व स्नान होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदाचा हा सिंहस्थ कुंभमेळा त्रिखंडी कुंभमेळा आहे. कारण गुरू हा तीन वेळा सिंह राशीतून मार्गस्थ होऊन पुन्हा परतणार आहे. तर याच कालावधीत उज्जैन येथेही कुंभमेळा होणार असल्याची माहिती आहे. या महाकुंभ कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री सतीश शंकर शुक्ला, अध्यक्ष, श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ, नाशिक यांच्याकडे असेल. (Marathi Latest News)
नाशिकचा हा सिंहस्थ कुंभमेळा दर बारा वर्षानी एकदा येतो. ज्यामध्ये देश-विदेशातील लाखो भाविक स्नान, तपश्चर्या आणि ध्यानासाठी एकत्र येतात. या मेळ्यात गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या कुशावर्त त्र्यंबकेश्वर आणि रामकुंड नाशिक येथे विधीवत स्नान केले जाते. १७८९ पर्यंत, हा कुंभमेळा फक्त त्र्यंबक येथेच भरत असे, परंतु वैष्णव आणि शैव यांच्यातील संघर्षानंतर, मराठा पेशव्यांनी वैष्णवांना नाशिक शहरात कुंभमेळा घेण्यासाठी विनंती केली होती. राशींच्या स्थितीनुसार अचूक तारखा निश्चित केल्या जातात. जेव्हा गुरू सिंह राशीत असतो किंवा जेव्हा गुरू, सूर्य आणि चंद्र चंद्राच्या युतीत कर्क राशीत असतात तेव्हा हा कुंभमेळा भरतो. नाशिकमध्ये शेवटचा कुंभमेळा २०१५ मध्ये भरला होता. (top Marathi Headline)