Home » “ठेच”मधून उलगडणार प्रेमत्रिकोण!!

“ठेच”मधून उलगडणार प्रेमत्रिकोण!!

by Team Gajawaja
0 comment
'ठेच'
Share

लक्ष्मण सोपान थिटे दिग्दर्शित ‘ठेच’ या चित्रपटातून प्रेमत्रिकोणाची कथा पाहता येणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं असून १५ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत “ठेच” या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सईद मोईन सईद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.

किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आई वडील नसलेला शिवा मामाच्या घरी राहून आपलं दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो. तिथे त्याची मैत्री शामबालाशी होते.

====

हे देखील वाचा: “तिरसाट” चित्रपट २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

===

शामबालाची मैत्रीण पल्लवी ही शिवाला खूप आवडते. तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्न रंगवत असतो. पण शामबाला शिवाच्या प्रेमात पडते. शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबाला जवळ पल्लावीला प्रपोज करतो.पण हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचं हे प्लॅन करत असते. पण शिवाने पल्लवीला मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्नासाठी केलेला रोमांचक प्रवास ठेच या चित्रपटातून मांडला आहे.

प्रेमाचा त्रिकोण ही संकल्पना अजरामर आहे. ठेच या चित्रपटात प्रेमत्रिकोण ही संकल्पना नव्या दमाच्या कलाकारांसह नव्या पद्धतीनं हाताळण्यात आली आहे. त्यामुळे “ठेच” नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवेल यात शंका नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.