Home » जाणून घ्या महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल

जाणून घ्या महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mahesh Manjrekar
Share

मराठी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने नाव कमावलेले प्रतिभावान व्यक्तिमत्व म्हणजे महेश मांजरेकर. महेश यांनी त्यांच्या कलाकृतींच्या जोरावर या क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवला. महेश हे नेहमीच त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. मात्र ते त्यांच्या आधीच्या वैयक्तिक आयुष्यावर कधीही काहीच बोलताना दिसत नाही. महेश यांच्या चित्रपटांमध्ये त्यांची पत्नी अभिनेत्री मेधा मांजरेकर अगदी लहान का असेना एका भूमिकेमध्ये दिसत असते. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, मेधा मांजरेकर या महेश यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत.

महेश यांचे मेधा यांच्याशी दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न दीपा मेहता यांच्याशी झाले होते. फॅमिली मॅन अशी ओळख असलेल्या महेश यांनी फॅशन डिझायनर असलेल्या दीपा मेहता यांच्याशी लग्न केले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचे लग्न अर्ध्यातच मोडले आणि ते विभक्त झाले. मात्र कधीही ते त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल किंवा पहिल्या पत्नीबद्दल बोलताना दिसत नाही. आज आपण जाणून घेऊया त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल.

महेश मांजरेकर यांचे पहिले लग्न दीपा मेहता यांच्याशी झाले होते. दीपा मेहता या फॅशन डिझाइनर असून त्यांचा अभिनयाशी फारसा संबंध नाही. मात्र दीपा या ‘क्वीन ऑफ हार्टस’ या साड्यांचा ब्रँड चालवतात. त्यांचा हा साड्यांचा ब्रँड खूपच मोठा, लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. त्यांच्या साड्यांना सामान्य लोकांसोबतच मराठी मनोरंजन सृष्टीतून आणि एवढेच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. नावाजलेला आणि प्रतिष्ठित ब्रँड म्हंणून त्यांच्या साड्यांची मार्केटमध्ये ओळख आहे.

Mahesh Manjrekar

महेश आणि दीपा मेहता यांची मुलगी अश्वमी मांजरेकर या साड्यांच्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करते. अश्वमीला अभिनय क्षेत्रात करियर करायचे आहे. त्यामुळे अश्वमी सध्या अभिनयक्षेत्रात तिचे नशीब आजमवत आहे. दीपा मेहता यांच्यापासून महेश यांना सत्या मांजरेकर आणि अश्वमी मांजरेकर ही दोन मुले आहेत. विभक्त झाल्यानंतर दीपा आणि महेश यांची मुले अश्वमी-सत्या महेश मांजरेकर यांच्याकडेच राहतात.

दरम्यान दीपा मेहता या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट त्यांच्या अतिशय सुरेख आणि आकर्षक अशा साड्यांच्या फोटोनी भरलेले दिसते. सध्या अश्वमी आणि सत्या ही या दोघांची मुले त्यांच्या आईकडे राहत आहे. मात्र अनेकदा मेधा आणि महेश मांजरेकर हे देखील त्यांच्या सर्वच मुलांसोबत एकत्र दिसतात.

दीपा यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर महेश यांनी मेधा यांच्याशी लग्न केले. मेधा आणि महेश मांजरेकर दोघेही एकत्र काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मेधा मांजरेकर यांनी आई या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या महेश मांजरेकर यांनी मेधा यांना पाहताच त्यांची या चित्रपटासाठी निवड केली होती. त्यानंतर दोघेही एकत्र काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी लग्न केले. मेधा आणि महेश मांजरेकर यांना सई मांजरेकर ही एक मुलगी आहे. सई देखील एक अभिनेत्री असून, तिला बॉलिवूडच्या दबंग खानने अर्थात सलमान खाननेच लॉन्च केले होते. सई सलमान खानसोबत ‘दबंग ३’ सिनेमात झळकली होती. तिच्या भूमिकेलाही रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर सई साऊथ सिनेमात देखील दिसली.

दरम्यान महेश यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘नटसम्राट’, ‘मातीच्या चुली’, ‘शिक्षणाच्या आयचा घो!’, ‘लालबाग परळ’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘काकस्पर्श’, ‘कुटुंब’, ‘कोकणस्थ’ आदी अनेक दर्जेदार मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नुकताच त्यांचा ‘जुनं फर्निचर’ नावाचा सिनेमा आला जो तुफान गाजला होता.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.