ॲडॉल्फ हिटलर (Hitler) या नावाची दहशत जर्मनीमध्ये किती होती, याची प्रचिती आजही येत आहे. “नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी” म्हणजेच नाझी पक्षाचा नेता असलेल्या ॲडॉल्फ हिटलरनं १९३३ ते १९४५ या काळात जर्मनीमध्ये शासन केले. जगाला दुस-या महायुद्धात ढकलण्यासाठी ॲडॉल्फ हिटलरला जबाबदार धरण्यात येते. हिटलर आणि त्याच्या अधिका-यांनी या सर्वात जर्मनीवर सत्ता केली. लाखो ज्यू नागरिकांची हत्या केली. अनेक ज्यू नागरिकांना त्यांनी अटक करुन बंदीवासात टाकले होते. या सर्वांचे जीणे नरकसमान केले होते. ॲडॉल्फ हिटलरच्या (Hitler) अत्याचाराच्या कथा आजही जर्मनीमध्ये सांगितल्या जातात.
हिटलरच्या मृत्यूला ७९ वर्ष झाली तरीही त्याच्या नावाची दहशत या देशात आहे. हिटलर (Hitler) आणि त्यांच्या मंत्र्यांनी सर्वसामान्यांवर केलेल्या अत्याचारामुळे आजही त्यांच्याबद्दल घृणा व्यक्त होत आहे. त्यामुळेच हिटलरच्या एका मंत्र्यांचे घर कोणी फुकट तरी घ्या, अशा विनवण्या कराव्या लागत आहेत. हिटलरच्या मंत्र्याचे हे भव्य घर फुकट देण्यात येत आहे. मात्र ते घेण्यासाठी कुठलाही नागरिक पुढे येत नाही. हिटलरच्या काळातील जखमा जर्मनीवर अजूनही किती खोल आहेत, याचीच यातून कल्पना येते.
संपूर्ण जगाला दुस-या महायुद्धात टाकणा-या हिटलरच्या हिटलरशाहीचे आजही अनेक पुरावे जर्मनीमध्ये आहेत. हे बघताना अंगावर काटा उभा रहातो. हिटलरचे मंत्री आणि अधिका-यांनीही अनेक ज्यु नागरिकांवर अत्याचार केले आहेत. या नाझी अधिका-यांची घऱे अतिशय अलिशान असायची. एखाद्या राजवाड्यासारख्या या भव्य घरांमध्ये हिटलरचे (Hitler) अधिकारी राहत असत. यापैकीच एक भव्य घर बर्लिन व्हिला म्हणून ओळखले जाते. बर्लिनमधील हे हवेलीवजी घर ॲडॉल्फ हिटलरचे प्रचार मंत्री जोसेफ गोबेल्स यांचे आहे. आता जर्मन सरकारनं हा अलिशान व्हिला विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
बर्लिनमध्ये या व्हिलाला लेकसाइड व्हिला म्हणूनही ओळखले जाते. एरवी अशा व्हिलाला मोठी मागणी असते. भव्य राजवाड्यासारख्या या व्हिलामध्ये अत्यंत उंची लाकडी फर्निचरही आहे. शिवाय व्हिला लेकसाईड असल्यामुळे त्याची चांगली किंमत येऊ शकेल. पण हा व्हिला हिटलरच्या अत्यंत जवळ असलेल्या जोसेफ गोबेल्स यांचा आहे. त्यांच्याबाबतही जनमानसात द्वेषाची भावना आहे. हा व्हिला जर्मन राजधानीच्या उत्तरेकडील ग्रामीण भागात आहे. या व्हिलाचा इतिहासही भीतीदायक असाच आहे.
नाझी जनसंपर्क प्रमुखाने बर्लिन बंकरमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली तरी एप्रिल १९४५ पर्यंत याच घरात त्यांचा छुप्या पद्धतीनं वावर होत्या, अशा अनेक अफवा जर्मनीमध्ये आहेत. इथे ते एका अभिनेत्रीसोबत रहात होते. १९३६ मध्ये बांधलेल्या या व्हिलामध्ये अनेक छुपे बंकर्स होते. त्याचा आजही शोध लावता आलेला नाही. त्यामुळेच या व्हिलाला कोणीही घ्यायला तयार नाही. या विशाल व्हिलामध्ये अजूनही लाकूड पॅनेलिंग, पर्केट फ्लोअर्स, फ्लोअर्स आणि झुंबर आहेत. हे सर्व सामान हिटलरच्या काळातील आहे. मात्र आता या व्हिलाला दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी लाखो युरो खर्च होतील असा अंदाज आहे.
या व्हिलाचा एक भाग संपूर्णपणे लाकडाचा आहे. यातील बरेचसे लाकूड खराब झाले आहे. तसेच व्हिलाच्या भींतीही पडण्याच्या स्थितीत आहेत. या व्हिलाचा असणारा काळा इतिहास आणि त्याच्यावर भविष्यात करावी लागणारी मोठी रक्कम यामुळेही हा व्हिला फुकट घेण्यासाठी कोणीही तयार नाही.
=============
हे देखील वाचा : सौदी अरेबियामधील महिला मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी
=============
ग्लोबल व्हिला हा १७ हेक्टर जागेवर उभा आहे. हिटलरही या व्हिलावर अनेकवेळा आल्याचे बोलले जाते. नाझी नेते, कलाकार आणि अभिनेते यांचे मनोरंजन करण्यासाठी आणि गोबेल्सच्या अनेक गुप्त गोष्टींसाठी या व्हिलाचा वापर होत असे. हिटरलरच्या (Hitler) मृत्यूनंतर नाझी पक्षाचा प्रचारक म्हणून काम करणा-या गोबेल्सनेही बंकरमध्ये जीवन संपवले. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलाचाही मृत्यू झाला. त्यामुळे हा ग्लोबल व्हिला बेवारस झाला. त्यानंतर या व्हिलाचा लष्करी रुग्णालय म्हणून वापर करण्यात आला. मात्र तेव्हाही या व्हिलाच्या खाली असलेल्या बंकर्स शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. या व्हिलाखाली आजही अनेक बंकर्स असल्याची चर्चा आहे. हिटलरच्या अत्याचाराच्या खुणा जपणारा हा व्हीला ताब्यात घेऊन त्याची देखभाल करा, असे आवाहन जर्मन सरकरानं नागरिकांना केले आहे.
सई बने