Home » हिमालयातील सोन्याला हवामानाचा फटका

हिमालयातील सोन्याला हवामानाचा फटका

by Team Gajawaja
0 comment
Himalaya
Share

जगातील सर्वात महाग औषध म्हणजे एक प्रकारची बुरशी आहे, आणि त्याचे नाव आहे, यार्सा गुंबा. यार्सा गुंबा ही महागडी औषधी हिमालयीन(Himalaya)  प्रदेशात मिळते. या भागात यार्सा गुंबाला सोन्याचं नाव देण्यात आलं आहे. कारण या भागातील अर्थव्यवस्था या औषधीच्या मिळण्यावर अवलंबून आहे. हिमालयातील (Himalaya) व्हायग्रा या नावानेही यार्सा गुंबाची ओळख आहे. ठराविक ऋतुंमध्ये द-याखो-यात सापडणारे हे अमुल्य औषध शोधण्यासाठी स्थानिक दिवसरात्र फिरत असतात. त्याच्या विक्रीतून अनेक कुटुंबांची उपजिविका चालते. मात्र आता हेच यार्सा गुंबा दुर्मिळ झाले आहे. यावर्षी या औषधीचे अल्प प्रमाण असल्याचे स्पष्ट झाले आहे. बदलत्या हवामानाचा फटका यार्सा गुंबाला बसला असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

यार्सा गुंबा हे औषधात वापरले जाणारे जगातील सर्वात महागडे औषध आहे. ही एक प्रकारची बुरशी आहे, जी एका सुरवंटांवर वाढते. मात्र ही बुरशी होण्याची प्रक्रीया पूर्ण झाल्यावर त्याच्यात अनेक औषधी मुल्य येतात. अनेक प्रकारच्या औषधामध्य त्याचा वापर करण्यात येतो. ते इतके मौल्यवान आहेत की स्थानिक लोक त्याला हिमालयाचे (Himalaya) सोने म्हणतात. शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठीही यार्सा गुंबाचा उपयोग होतो. म्हणूनच त्याला हिमालयातील (Himalaya) व्हायग्रा या नावानेही ओळखण्यात येते.

यार्सा गुंबा हे औषध भारत, चीन आणि नेपाळच्या हिमशिखरांच्या पायथ्याशी आढळते. ते शोधण्यासाठी या भागातील अनेक नागरिक अक्षरशः दिवसरात्र डोंगरद-यांमध्ये फिरत असतात. कारण या यार्सा गुंबाची आंतरराष्ट्रीय बाजारात एका किलोची किंमत 20 लाख रुपयांपर्यंत आहे. अवघे काही ग्राम यार्सा गुंबा मिळाले तरी येथील स्थानिक खुष होतात. त्यामुळेच या भागात ही औषधी गोळा करण्यासाठी कुटंबच्या कुटंब फिरत असल्याचे दृश्य दरवर्षी दिसते. मात्र यावर्षी हवामान बदलाचा फटका यार्सा गुंबाला बसला आहे. अत्यंत कमी प्रमाणात ही बुरशी तयार झाली आहे. हिमालयाच्या(Himalaya)  खो-यातही तपमानात वाढ झाल्यामुळे बुरशी होण्याची प्रक्रीया थांबल्याचे सांगितले गेले. त्याचा परिणाम असा झाला आहे की, लाखो स्थानिकांचे उत्पन्नही धोक्यात आले आहे.

यार्सा म्हणजे उन्हाळी कीटक आणि गुंबा म्हणजे उन्हाळी वनस्पती. ही बुरशी सुरवंटांवर वाढते, म्हणून त्याला वर्मवुड असेही म्हणतात. यार्सा गुम्बा हा तिबेटी भाषेतील शब्द आहे. ही औषधी वनस्पती गवतासारखी दिसते. यार्सा गुंबाची किंमत लाखोच्या घरात आहे. मात्र त्याआधी ती बुरशी कशी होते, हे जाणणे उत्सुकतेचे आहे. ही बुरशी जमिनीखाली राहणाऱ्या पतंगाच्या अळ्यांवर हल्ला करते. जेव्हा या भागात बर्फाची चादर असते तेव्हा ही बुरशी या किटकाच्या शरीराचा वापर करते. हा किटक सुरवंटासारखा असतो.

जवळपास वर्षभर या किड्याच्या केसांवर राहिल्यामुळे पुढच्या वर्षी उन्हाळ्यात ही बुरशी एखाद्या औषधी वनस्पती किंवा गवतासारखी उगवते. त्यामुळेच स्थानिक यार्सा गुंबाला हिवाळ्यातील किडा किंवा उन्हाळ्यातील गवत म्हणतात. ही बुरशी 57 प्रजातींच्या कीटकांवर हल्ला करते. मात्र सुरवंटांवर वाढणारी बुरशी सर्वात मौल्यवान असते. आणि त्याचीच किंमत लाखोंच्या घरात मिळते. ही सुरवंटावर आढळणारी बुरशी बहुगुणी औषधीसारखी असते. दमा, कर्करोग आणि यकृत, मूत्रपिंड आणि फुफ्फुसांचे आजार यामुळे बरे होतात. चीन, अमेरिका, ब्रिटन, जपान, थायलंड आणि मलेशियाच्या बाजारपेठेत यार्सा गुंबाला खूप मागणी आहे.

दरवर्षी यामुळे करोडोंची उलाढाल या भागात होते. मात्र यावर्षी ही सगळी उलाढाल थंडावली आहे. कारण यार्सा गुंबाचे अत्यंत कमी प्रमाण आले आहे. यार्सा गुंबाच्या वाढीसाठी थंड वातावरण आवश्यक आहे. परंतु वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ झाली आहे. परिणामी बुरशीचे प्रमाण अत्यल्प आले आहे.

==========

हे देखील पहा : पृथ्वीच्या अंतरंगात चाललंय काय…

==========

भारतातील सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये या यार्सा गुंबाची काळजीपूर्वकरित्या लावगड होते. रेशमाचे किडे जसे साठवले जातात, तशाच प्रकारे यार्सा गुंबाची निर्मिती करण्यात येते. त्याचे औषधी मुल्य पहाता, या लागवडीबाबत कडक नियमही आखून देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यापाऱ्यांना यार्सा गुंबाची किंमत 40 ते 50 लाख रुपये प्रतिकिलोपर्यंत मिळते. मोठी अर्थव्यवस्था या एका बुरशीमागे आहे. ती कायम रहावी असा प्रयत्न करण्यात येत आहे.
सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.