Home » दिल्लीतील ‘या’ हनुमान मंदिरात व्हिसा मिळण्याची इच्छा होते पूर्ण

दिल्लीतील ‘या’ हनुमान मंदिरात व्हिसा मिळण्याची इच्छा होते पूर्ण

यंदा हनुमान जयंती 23 एप्रिलला साजरी केली जाणार आहे. असे मानले जाते की, बजरंगबलीची पूजा केल्याने आयुष्यातील संकटे दूर होतात.

by Team Gajawaja
0 comment
Lord Hanuman
Share

Hanuman Jayanti 2024 : प्रत्येकालाच परदेशात फिरायला जायची इच्छा असते. पण काही वेळेस व्हिसा न मिळाल्याने परदेशात जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. पण तुम्हाला माहितेय का, दिल्लीतील असे एक हनुमान मंदिर आहे तेथे गेल्यानंतर रखडलेला व्हिसाचे काम पूर्ण होते.

खरंतर, 23 एप्रिलला हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. हनुमानाची वीरगाथा प्रत्येकालाच माहिती आहे. पण दिल्लीतील हनुमान मंदिरात गेल्यानंतर तुमची व्हिसाची इच्छा पूर्ण होते. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीतील हनुमान मंदिरात लोक दर्शनासाठी येतात.

दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिर
कनॉट प्लेसमध्ये असलेले हनुमानाचे मंदिर सर्वांमध्ये प्रसिद्ध आहे. खरंतर हनुमानाचे मंदिर फार प्राचीन आहे. या मंदिरासंबंधित काही धार्मिक मान्यताही आहेत. असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तीला परदेशात जायचे आहे आणि त्याला व्हिसासंबंधित समस्या येत असल्यास तो या हनुमानाच्या मंदिरात दर्शनासाठी येतो. या मंदिरात येण्यासाठी तुम्हाला ब्लू किंवा येलो लाइन मेट्रोच्या येथून राजीव चौक स्थानकात उतरावे लागते. येथून तुम्ही पायी हनुमान मंदिरापर्यंत येऊ शकता. (Hanuman Jayanti 2024)

नेय सरायमधीलही हनुमानाचे मंदिर
नवी दिल्लीतील नेब सराय येथील हनुमान मंदिराबद्दलही अशीच काहीशी मान्यता आहे. येथे येणारे लोक लाल रंगातील शाई किंवा पेनाने नोट लिहितात आणि देवासमोर प्रार्थना करतात. जर व्यक्तीची इच्छा पूर्ण झाल्यास पुन्हा दर्शनासाठी येतात.


आणखी वाचा :
राम मंदिरात पुन्हा सुरू झालीय ‘ही’ VVIP सुविधा, असा तयार करता येईल ऑनलाइन आणि ऑफलाइन पास
मक्का-मदिनाच्या वाळवंटाचे बदलते रुप
भक्तांना रामलल्लांच्या सूर्याभिषेकाची प्रतीक्षा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.