बुद्धी, समृद्धी, कला आणि सौभाग्याची देवता म्हणून श्री गणेशाची ओळख आहे. हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थी सणाला मोठे आणि अनन्यसाधारण महत्व. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाला अशी मान्यता आहे.
गणेशोत्सव आता अगदीच तोंडावर आला आहे. सगळीकडे गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी, आरास, नैवेद्याची तयारी, स्वागताची तयारी आदी सर्वच पूर्ण झाले आहे. आता सगळ्यांना आतुरता आहे ती फक्त बाप्पाच्या आगमनाची. वाजत गाजत मोठ्या जल्लोषात ७ सप्टेंबर रोजी बाप्पाचे घरोघरी आणि विविध मंडळांमध्ये आगमन होणार आहे.
यंदा गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर, शनिवारी रोजी साजरी होणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी सगळेच बाप्पाचे स्वागत करतात आणि थाटामाटात आपल्या घरी आणून मनोभावे पूजा करतात. संपूर्ण जगात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाची खरी मजा मात्र महाराष्ट्रात असते, महाराष्ट्रात गणेशोत्सवाची एक वेगळीच धूम आणि शोभा पाहण्याजोगी असते.
मान्यता आहे की, भगवान गणेशाचा जन्म दुपारच्या वेळी झाला होता, म्हणून मध्यान्हाची वेळ गणेशपूजेसाठी सर्वात योग्य मानली जाते. हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी ११ वाजून ०३ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३३ मिनिटापर्यंत असेल. पंचांगानुसार, चतुर्थी तिथी ०६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजून ०१ मिनिटे ते ०७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ५ वाजून ३७ मिनिटापर्यंत राहील.
पंचागानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा २ तास ३१ मिनिटांचा असणार आहे. परंतु, राहू काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल.
सकाळी ११. ५४ ते १२. ५४ अभिजित मुहूर्त
दुपारी १२. ३४ सर्वार्थ सिद्धी योग सुरु
९ वाजून १० ते १०. ३५ पूजा करु नये. हा काळा राहूकाळ असेल.
सकाळी ८ ते ९ वाजून ३३ मिनिटे- शुभ वेळ
८ से ९.१० शुभ चौघडिया स्थापना पूजा
दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांपासून २ वाजून ११ मिनिटांपर्यत चल आणि सामान्य काळ राहिल.
गणेश चतुर्थी २०२४ शुभ योग
यावर्षी गणेश चतुर्थीला एक दुर्मिळ योग्य देखील लाभला आहे. तो म्हणजे ब्रह्म आणि इंद्र योगासह अनेक शुभ योग या दिवशी तयार होत आहेत. ब्रह्मयोग रात्री 11.17 पर्यंत असून, यानंतर इंद्र योग तयार होत आहे. या दिवशी भाद्रवशीचाही योग आहे. गणेश चतुर्थीला भाद्र पाताळात राहील. याशिवाय गणेश चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोगही तयार होत आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी चार शुभ संयोग जुळून आले आहेत. यामध्ये बुधादित्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, शशराज योग आणि नवपंचम योगाचा शुभ संयोग आहे. या काळात श्रीगणेशाची विधिवत पूजा केल्याने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात.
======
हे देखील वाचा : हरितालिका पूजेची संपूर्ण माहिती आणि कथा
======
गणेश चतुर्थीच्या पूजेचे साहित्य –
वाती (समईसाठी तेलात भिजवलेल्या), फुलवाती (तुपात भिजवलेल्या), कापसाची वस्त्रमाळ आणि वस्त्र, जानवं, गणपतीसाठी सजावटीचे सामान, फुले, फुलांचे हार, दूर्वा, विड्याची पाने, पत्री, पेढे किंवा मिठाई, फळे, नारळ, पंचामृताचे साहित्य दही आणि दुध, गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर, चौरंगावर ठेवण्यासाठी आसन, रांगोळी, रांगोळीचे रंग, समई, समईसाठी वाती, निरांजन (२), निरांजनासाठी तुपात भिजवलेल्या फुलवाती, आरती करण्यासाठी पंचारती, आरतीसाठी तुपात भिजवलेल्या वाती, तांदूळ, घंटा, शंख, उदबत्तीचे घर/ स्टॅंन्ड, धूप लावण्यासाठी स्टॅंन्ड, विड्याची पाने – २५ नग, सुट्टे पैसे (नाणी १०), सुपाऱ्या, खारीक, बदाम, हळकुंड,फळे, खोबऱ्याचे तुकडे (प्रत्येकी ५ नग), नारळ, नैवेद्य दाखवण्यासाठी छोट्या वाट्या, आंब्यांचे डहाळी , पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, शेंदूर, हळद, कुंकू, अक्षदा, प्रसादाकरिता मोदक आणि इतर नैवेद्य, मिठाई.
गणेश विसर्जन २०२४
गणेश उत्सव किंवा गणेशोत्सव १० दिवस चालतो. काहीजण आपल्या परंपरेनुसार १, दीड, ३, ५, ७ दिवसही गणपती बसवतात. परंतू १० दिवसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होते. या दिवसाला गणेश विसर्जन म्हणतात. यावर्षी गणेश विसर्जन १७ सप्टेंबर २०२४ रोजी मंगळवारी आहे.