उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर झालेल्या महाकुंभनंतर तमाम भारतीयांना वेध लागले आहेत ते नाशिक येथे होणा-या महाकुंभचे. आता या महाकुंभच्या तारखा जाहीर झाल्या असून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणा-या प्रत्येक प्रमुख पूजाविधींचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. 2026 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली साधू-महंतांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये ध्वजारोहणानंतर, ऑक्टोबर 2026 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा सुरू होईल, हे जाहीर करण्यात आले. (Kumbh Mela)
यापूर्वी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 2015 साली कुंभमेळा भरला होता. दर 12 वर्षांनी जेव्हा गुरु, सिंह राशीत येतो तेव्हा हा कुंभमेळा होतो. 2015 मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात 80 लाख भाविक सहभागी झाल्याची माहिती आहे. मात्र प्रयागराज येथील भव्य अशा महाकुंभनंतर आता नाशिक येथेही मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक येथील या कुंभमेळ्यासाठी आत्तापासूनच प्रशासनानं मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेतली आहेत. ब्रह्मगिरी पर्वतरांगातून उगम पावणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावर असलेले त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. याच त्र्यंबकेश्वरमध्ये होणा-या महाकुंभसाठी देशभरातून आता लाखो भाविक येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या कुंभमेळ्याच्या तारखा कधी जाहीर होणार याची उत्सुकता होती. (Social News)
उत्तरप्रदेश, प्रयागराज येथे झालेल्या भव्यमहाकुंभनंतर जगभरातील हिंदूंचे लक्ष महाकुंभ सोहळ्याकडे वेधले गेले आहे. प्रयागराजनंतर या नाशिकमध्ये होणा-या महाकुंभसाठीही लाखो भाविकांची उपस्थिती रहाणार आहे. यासाठी आवश्यक अशी विकासकामे त्वरित सुरु करावीत अशी मागणी कऱण्यात येत होती. शिवाय महाकुंभ सोहळ्यातील महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्याचीही मागणी होत होती. आता या मागणीला अनुसरून नाशिक महाकुंभमधील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कुंभमेळ्याच्या या तारखा जाहीर करतांना 13 आखाड्यांचे प्रमुख आणि साधू-महंत उपस्थित होते. नाशिक कुंभमेळ्यात अमृत स्नान आणि ध्वजारोहणाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यामध्ये 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने कुंभ महोत्सवाची सुरुवात होईल. पहिले अमृतस्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी होईल. (Kumbh Mela)
दुसरे अमृतस्थान 31 ऑगस्ट 2027 रोजी होईल, तर तिसरे अमृतस्नान 11 सप्टेंबर 2027 रोजी होईल. त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अमृतस्नानाच्या तारखाही जाहीर कऱण्यात आल्या आहेत. 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने कुंभ महोत्सवाची सुरुवात होईल. यातील पहिले अमृतस्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी होईल, तर दुसरे अमृतस्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी होईल. तिसरे अमृतस्नान 12 सप्टेंबर 2027 मध्ये होणार आहे. श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुजारी संघटना, नाशिक, अखिल भारतीय वैष्णव आखाडा परिषद सिंहस्थ कुंभमेळा नाशिक यांच्या उपस्थितीत सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा होईल. यात 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12.02 रोजी सिंहस्थ ध्वजारोहण रामकुंड, पंचवटी येथे होणार आहे. तर हा ध्वज 24 जुलै 2028 रोजी दुपारी 1.36 वाजता उतरवण्यात येईल. या दरम्यानचा कालावधी हा महाकुंभ कालावधी असणार आहे. याशिवाय अन्य महत्त्वाच्या तारखाही ठरवण्यात आल्या आहेत. त्यात साधुग्राम ध्वजारोहणाचीह तारीखही जाहीर कऱण्यात आली आहे. शनिवार, 24 जुलै 2027 रिंगण ध्वजारोहण होईल. गुरुवार 29 जुलै 2027 रोजी शहर शाही दौरा होईल. (Social News)
नाशिक येथील या महाकुंभसाठीही मोठ्या संख्येनं भाविक सामिल होणार आहे. त्र्यंबकेशवर येथे होणा-या या महाकुंभमेळ्याची अनेक वैशिष्टे आहेत. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यात, वैष्णव आणि शैव आखाडे वेगवेगळे स्नान करतात. त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथांची समाधी आहे. त्यांना नाथ संप्रदायाचे संस्थापक मानले जाते. त्यामुळे नाथ संप्रदायाचे अनुयायीही या महाकुंभ सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी होतात. भगवान त्र्यंबकेश्वरांचा या नगरीत प्रत्यक्ष वास असल्याचे सांगण्यात येते त्यामुळे स्नान करुन देवाचे दर्शन घेण्यासाठी येथे भाविक गर्दी करतात. महाकुंभ काळात येणा-या अशा लाखो भाविकांचे नियोजन करणे हे आता प्रशासनाचे पहिले काम असणार आहे. (Kumbh Mela)
सई बने