Home » या आयआयटी इंजिनिअरने अभिनयासाठी सोडली आयटी कंपनीमधली भरमसाठ पगाराची नोकरी

या आयआयटी इंजिनिअरने अभिनयासाठी सोडली आयटी कंपनीमधली भरमसाठ पगाराची नोकरी

by Team Gajawaja
0 comment
Journey of Jitendra Kumar
Share

ओटीटी माध्यमांनी अनेक नवे चेहरे आपल्या परिचयाचे झाले. अगदी घरातील सदस्यांसारखे हे चेहरे कुटुंबात सामावले आहेत. त्यातील सर्वात पहिलं नाव आहे ते जितेंद्र कुमार या तरुण अभिनेत्याचे. जितेंद्र कुमार म्हणजे अमेझॉन प्राईमवरील पंचायत या वेबसिरीजमधील सचिवजी. (Journey of Jitendra Kumar)

कोटा फॅक्टरी या वेबसिरीजमध्ये जीतू भैय्या म्हणून जितेंद्र कुमार यांनी आपल्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली.  त्यानंतर पंचायत या सिरीज मधून जितेंद्र कुमार यांची सचिवजींची भूमिका सुपरहिट ठरली. आता या सिरीजचा दुसरा सिझन चालू आहे. त्यातही जितेंद्र कुमार यांच्या सहज सुंदर अभिनयाची प्रेक्षकांवर छाप पडली आहे. आयआयटी खडकपूरचा विद्यार्थी असलेल्या जितेंद्र कुमार यांचा आयआयटी ते अभिनय हा प्रवास रोचक आहे.  

अमेझॉन प्राईमवरील पंचायत सीजन 2 ही वेबसिरीज लोकप्रिय ठरली आहे. जितेंद्र कुमार त्यात प्रमुख भूमिकेत आहेत. अभिषेक सर,  म्हणजेच सचिवजी म्हणून काम करणाऱ्या जितेंद्र कुमार यांच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. त्यांना डिजीटल स्टार म्हणूनही ओळखण्यात येते. जितेंद्र कुमार यांचा हा अभिनयाचा प्रवास त्यांच्या अभिनयासारखा सहज, सोप्पा नव्हता.  (Journey of Jitendra Kumar)

जितेंद्र हे अभ्यासात हुशार होते. आयआयटी कोचिंगसाठी ते कोटा येथे होते. जेईई परीक्षेत उत्तम यश मिळाल्यावर आयआयटी खडगपूर येथे दाखल झाले. तिथून त्यांनी बीटेकची पदवी संपादन केली.  इंजिनिअरचे शिक्षण घेतानाच त्यांना आपल्यातल्या अभिनेत्याची ओळखही झाली. लहानपणापासून मिमिक्री करणारे जितेंद्र कुमार यांची आयआयटीमध्ये असतानाही अभिनयासोबत नाळ जुळली. 

TVF या युट्यूब चॅनेलवर एका वेबसिरीजसाठी अभिनेत्यांची गरज असल्याची माहिती जितेंद्र कुमार यांना मिळाली. त्यासाठी त्यांची निवडही झाली. TVF हे चॅनेल आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यावर ‘कोटा फॅक्टरी’ ही वेबसिरीज प्रदर्शित झाली. आयआयटीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज त्यांच्या अभ्यासक्रमासारखीच महत्त्वाची ठरली. त्यात जितेंद्र कुमार यांनी जितू भैया म्हणून ओळख मिळवली.  (Journey of Jitendra Kumar)

=====

हे देखील वाचा – आयुष्मान म्हणतोय ‘जागतिक सिनेमांआधी आपल्या चित्रपटांना जाणून घेणं गरजेचं’

=====

या दरम्यान जितेंद्र कुमार बंगलोरच्या आयटी कंपनीत नोकरीसाठी दाखल झाले. पण तिथे त्यांचे मन रमले नाही. मग त्यांनी NSD मध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा अर्ज रिजेक्ट झाला. तरीही जितेंद्र कुमार यांनी हार न मानता नोकरीला रामराम करत मुंबई गाठली. मुंबईत पहिल्यांदा आल्यावर जितेंद्र कुमार यांनी अनेक स्टुडीओंमध्ये चक्करा मारल्या.  

‘शुरुआत का इंटरवल’ नावाच्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली. गॉन केश, शुभमंगल या चित्रपाटानंतर जितेंद्र कुमार यांना पंचायत वेबसिरीजमध्ये अभिषेक सर, म्हणजेच सचिवजींची भूमिका मिळाली. या संधीचे त्यांनी सोनं केलं असून जितेंद्र कुमार यांची संपन्न अभिनेता म्हणून ओळख निर्माण झाली आहे.  फुलोरा गावच्या या सचिवजींनी अनेक पुरस्कारही मिळवले आहेत. ओटीटी माध्यमातील सर्वात लोकप्रिय अभिनेत म्हणूनही जितेंद्र कुमार यांना पुरस्कार मिळाला आहे. (Journey of Jitendra Kumar)

आयआयटी इंजिनिअर असलेले जितेंद्र कुमार आता अभिनयाच्या ट्रॅकवर स्थिरावत आहेत. पंचायत वेबसिरीजचा तिसरा सिजनही लवकरच ओटीटीवर येणार आहे. याशिवाय अन्य मोठे बॅनरही जितेंद्र कुमार यांच्याकडे प्रमुख भूमिका घेऊन येत आहेत. ओटीटीच्या विश्वात जितेंद्र कुमार यांचे भवितव्य उज्वल आहे यात शंकाच नाही. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.