प्रयागराज महाकुंभमध्ये करोडो भाविक रोज पवित्र संगम स्थानावर जात आहेत. गंगा, यमुना आणि अदृश्य रुपातील सरस्वती नदीच्या या संगमात महाकुंभमधील 45 दिवस स्नान करण्यासाठी देशविदेशातील करोडो भक्त प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. यासोबतच या ठिकाणी आखाड्यातील साधूंची संख्याही करोडोंच्या घरात आहे. महाकुंभ हा अध्यात्मिक मेळा असतो. यात भक्ताभावानं स्नान करण्याला जेवढं महत्व आहे, तेवढंच महत्व संसारीक मोह त्यागून संन्यास मार्गाला जाण्याला आहे. त्यामुळेच महाकुंभमेळ्यात साधू होण्यासाठी येणा-या भाविकांची संख्याही मोठी असते. (Prayagraj)
यात नागा साधू होण्यासाठी आलेल्यांचीही मोठी संख्या असते. अशा साधूंची परीक्षा आता महाकुंभमध्ये सुरु होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी कठोर नियम असतात. 24 तासांचा कडक उपवास असतो. शिवाय जे साधू बनणार आहेत, त्यांना त्रिवेणी संगम स्थळामध्ये 108 वेळा डुबकी मारावी लागते. ही सर्व प्रक्रिया आता महाकुंभमेळ्यात सुरु झाली असून यावेळी नागा साधू बनण्यासाठी हजारो हिंदू धर्मिय उपस्थित आहेत. या सर्वांचे कडक उपवास आणि साधना सुरु झाली आहे. महाकुंभाचा प्रत्येक दिवस या सर्वांसाठी एका परीक्षेचा असतो. मात्र त्यातही मौनी अमावस्येला शाही स्नानाच्या दिवशी या सर्वांची अंतिम परीक्षा घेण्यात येते आणि त्यांना नागा साधू म्हणून मान्यता दिली जाते. ही सर्व तपश्चर्या या महाकुंभमध्ये होणार आहे. (Social News)
प्रयागराज येथे होणा-या महाकुंभची प्रतीक्षा जशी सर्वसामान्य भाविकांना असते, तशीच प्रतीक्षा सांसारिक त्याग करुन अध्यात्मिक मार्गाची निवड करणा-यांनाही असते. कारण प्रयागराज येथे होणा-या महाकुंभमध्ये नागा साधू होणा-यांना दिक्षा दिली जाते. आता हिच प्रक्रिया येथे सुरु झाली आहे. प्रयागराजच्या पवित्र संगम स्थानावर नागा साधू होण्यासाठी हजारोंनी गर्दी केली आहे. येथील आखाड्यांमध्ये त्यासाठी नावनोंदणी सुरु झाली आहे. आत्तापर्यंत हजारोंनी नावनोंदणी केली असली तरी त्यातून फक्त 1800 लोकांची नागा साधू म्हणून निवड करण्यात येणार आहे. कारण यासाठी जी प्रक्रिया होते, ती क्लिष्ठ आणि मनुष्याच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी असते. नागा होण्यासाठी साधूंना कठीण परीक्षेतून जावे लागते. यासाठी काही दिवसाचा उपवास असतो. यात अन्न आणि पाणीही व्यर्ज असते. यासाठी सुरुवातीला सर्व आखाड्यांमध्ये एक नोट इच्छुक साधुंना देण्यात येते. मौनी अमावस्य़ेपर्यंत आता या साधूंसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा असणार आहे. (Prayagraj)
मौनी अमावस्येच्या आधी, दोन्ही उदासी आखाडे आणि सात शैव आखाडे हे या नागा साधुंची त्यांच्या कुटुंबात भरती करतील. मौनी अमावस्येपूर्वी जूना आखाडा व्यतिरिक्त, महानिर्वाणी, निरंजनी, अटल, अग्नि, आहवान आणि उदासीन आखाड्यांमध्ये नागा साधूंची प्रथम पूजा करण्यात येईल. त्यानंतर ज्यांना नागा साधू म्हणून मान्यता द्यायची आहे, त्यांना अमृत स्नानांसाठी पहिला मान देण्यात येईल. जुना आखाड्याचे महंत रमेश गिरी यांनी दिलेल्या माहितीतनुसार प्रथम या नागा साधूंच्या तपश्चर्येने धार्मिक विधी सुरू होतील. ही तपश्चर्या 24 तास अन्न आणि पाण्याशिवाय करावी लागते. यानंतर या 1800 साधूंना आखाडा कोतवालांसह गंगेच्या काठावर नेण्यात येते. तिथे त्रिवेणी संगमात त्यांना 108 वेळा डुबकी मारावी लागते. यावेळी मंत्रोच्चार करण्यात येतात. साधूंना मंत्र दिलेला असतो. त्या मंत्राचा उच्चार करतच त्यांना 108 वेळा डुबकी मारावी लागते. हे झाल्यावर त्या सर्वांचा मुंडन समारंभ आणि विजय हवन केला जातो. त्यांना पाच गुरु वेगवेगळ्या गोष्टी यावेळी देतात. (Social News)
=============
हे देखील वाचा : Mahakhumbh 2025 : गंगा नदी लुप्त होणार !
SaifAliKhan : आधी शाहरुखच्या घराची रेकी, मग सैफवर हल्ला आरोपीने प्लॅन करून गेम केलाय?
=============
या सर्वांना संन्यासाची दिक्षा आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर देतात. यानंतर मोठा हवन करण्यात येतो. 19 जानेवारी रोजी पुन्हा मग सर्व धार्मिक विधी करण्यात येतात. साधूंनी त्रिवणी संगमावर स्नान केल्यावर त्यांच्या कंबरेचा कपडा काढून त्यांना नागा साधू म्हणून मान्यता देण्यात येते. येथे या साधूंना कपडे घालण्याचा किंवा दिगंबर स्वरूपात राहण्याचा पर्याय देखील दिला जातो. या सर्व प्रक्रियेत जुना आखाडा हा प्रथम असतो. या आखाड्यात साधूंची आणि नागा साधूंची संख्या अधिक आहे. हे सर्व नागा साधू महाकुंभ संपेपर्यंत प्रयागराजमध्ये रहातील. महाकुंभच्या शेवटच्या दिवशी, 26 फेब्रुवारी रोजी शेवटचे अमृत स्नान आहे. हे स्नान केल्यावर हे सर्व नागा साधू जनतेपासून दूर जातील. त्यांना त्यांच्या आखाड्याच्या महंतानी एक दिशा आणि स्थळ दिलेले असते. तिथे जाऊन हे नागा साधू पुढचे काही वर्ष कठोर तपश्चर्या आणि आध्यात्मिक साधना करतात. (Prayagraj)
सई बने