Home » स्मोकी आईस्क्रीम खात असाल तर सावधान !

स्मोकी आईस्क्रीम खात असाल तर सावधान !

by Team Gajawaja
0 comment
Smokey ice cream
Share

आईस्क्रीम हा असा पदार्थ आहे, जो लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वानाच आवडतो. अलिकडे या आईस्क्रीमचे एवढे प्रकार आले आहेत की, ज्यांना आईस्क्रीम आवडत नाही, त्यांनाही त्याची भुरळ पडू लागली आहे.  त्यातच द्रव नायट्रोजन वापरुन तयार केलेले आईस्क्रीम खाण्याकडे अलीकडे लोकांचा कल वाढला आहे.  हॉटेलमध्ये गेल्यावर कॉकटेल आणि आईस्क्रीम सिझलर सारख्या पदार्थांमध्ये या द्रव नायट्रोजनचा सर्रास वापर करण्यात येतो.  यातून हे पदार्थ दिसायला आकर्षक दिसतात. (Smokey ice cream)

मात्र याच पदार्थांमध्ये द्रव नायट्रोजनच्या प्रमाणात थोडाही फेरफार झाला, तर ते खाणा-याच्या जीवावर बेतू शकते, हे आता स्पष्ट झाले आहे.  मध्यंतरी दिल्लीमधील एका स्टार हॉटेलमध्ये असेच द्रव नायट्रोजन घातलेले पान खाल्यामुळे एका कुटुंबाला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या.  हाच द्रव नायट्रोनजन वापरुन तयार केलेले आईस्क्रीमही आरोग्याला घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

द्रव नायट्रोजन अत्यंत थंड आहे.  त्याचे प्रमाण बिघडले तर गंभीर हिमबाधा किंवा क्रायोजेनिक बर्न्स होऊ शकतात.  असे आईस्क्रीम किंवा अन्य पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात ऑक्सिजनची कमी होऊन त्याचा फुफ्फुसाला त्रास होऊ शकतो.  त्यामुळेच स्मोकी आणि डिझायनर आईस्क्रीम शक्यतो खाण्याआधी त्यातील  द्रव नायट्रोजनचे प्रमाण जाणून घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. (Smokey ice cream)

दिल्लीमध्ये एका हॉटेलमध्ये पान खाल्यामुळे काही लोकांना रक्ताच्या उलट्या झाल्या.  तसेच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता.  त्यानंतर आईस्क्रीम खाल्यावरही असाच त्रास झाल्याचे लक्षात आले.  द्रव नायट्रोजनमुळे नागरिक आजारी पडल्याच्या अहवालानंतर, दिल्ली सरकारच्या अन्न सुरक्षा विभागाने यावर कारवाई सुरु केली आहे. (Social News)

तसेच यासंबंधी केलेल्या तपासात  द्रव नायट्रोजनच्या वापरामुळे अन्न आकर्षक दिसत असले तरी ते आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.  या द्रव नायट्रोजनचा वापर प्रथम काही कुकींग शो मध्ये करण्यात आला.  यामध्ये वेळेचे बंधन असते.  काही कमी वेळात आईस्क्रीम वा क्रीमचे अन्य पदार्थ तयार करावे लागतात. (Smokey ice cream)  

अशावेळी या स्पर्धकांनी द्रव नायट्रोजनची मदत घेतली. तसेच खाद्यपदार्थ आकर्षक सजवण्यासाठीही याच द्रव नायट्रोजनची मदत घेण्यात आली. यानंतर अनेक हॉटेलमध्ये या द्रव नायट्रोजनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागला आहे. काही ठिकाणी तर द्रव नायट्रोजनचा वापरुन अगदी समोरासमोर आईस्क्रीम करुन देण्यात येते.  हे सर्व बघण्यासाठी नवल असले तरी याचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याची नोंद घेतली पाहिजे.  

आहार क्षेत्रातील तज्ञांच्या मते खाद्यपदार्थांची सजावट करण्यासाठी द्रव नायट्रोजनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. यामुळेही लोकांना त्रास होऊ शकतो. आईस्क्रीम, कॉकटेल, मॉकटेल आणि बेकरी उत्पादने पटकन थंड करण्यासाठी या द्रव नायट्रोजनचा वापर होतो.  यातून वेळ वाचला जातो, शिवाय पदार्थही आकर्षक दिसतो. पण हे करतांना अतिरिक्त द्रव नायट्रोजन वापरले जाते.(Smokey ice cream)

दिल्ली पाठोपाठ  बेंगळुरूमध्ये एका 12 वर्षांच्या मुलीने द्रव नायट्रोजनयुक्त पान खाल्यानं तिच्या आतड्यांना छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले.  द्राव नायट्रोजन, थेट सेवन केल्यास तोंड, घसा, अन्ननलिका आणि पोटाला गंभीर इजा होऊ शकते.  याच द्रव नायट्रोजनचा वापर  अलिकडे स्मोकिंग बिस्किटे, मिठाईमध्येही मोठ्या प्रमाणात होऊ लागल्यानं अन्न प्राधिकारणानं काळजी व्यक्त केली आहे.  तसेच यासंबंधातील नियम जे डावलतील त्यांच्यावर कारवाई सुरु केली आहे.  

द्रव नायट्रोजनचा वापर आइस्क्रीम किंवा सरबत बनवण्यासाठी करण्यात येत आहे.  त्यामुळे काही सेकंदात आईस्क्रीम तयार होते.  द्रव नायट्रोनजमुळे आईस्क्रीममध्ये अगदी छोटे छोटे क्रीस्टल तयार होतात.  ते खातांना चांगले लागत असले तरी पोटात गेल्यावर त्यामुळे आरोग्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. (Smokey ice cream)

वास्तविक, काही प्रमाणात द्रव नायट्रोजनचा वापर केलेले अन्न खाल्याने लगेच शरीरावर परिणाम होत नाही.  परंतु द्रव नायट्रोजनचा अती वापर झाला असेल तर  खाणा-याला लगेच रुग्णालयात दाखल करावे लागते.  त्यामुळे यापुढे हॉटेलमध्ये गेल्यावर धुरामध्ये सजवलेले पदार्थ आल्यास पहिल्यांदा हा सर्व धूर संपेपर्यंत थांबा, पदार्थाची चव घेऊ नका, असेही आवाहन करण्यात आले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.