Home » वर्ल्ड हॅप्पीनेस डे का साजरा केला जातो?

वर्ल्ड हॅप्पीनेस डे का साजरा केला जातो?

by Team Gajawaja
0 comment
International Happiness Day
Share

प्रत्येक वर्षी २० मार्चला वर्ल्ड हॅप्पीनेस डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील असा उद्देश असा आहे की, आनंद साजरा करण्याचे नवे मार्ग तुमच्या आयुष्यात आणा. असे मानले जाते की, जो व्यक्ती समाजात आनंदित राहतो तोच समाजात सर्वाधिक प्रगती करतो. जो देश सर्वाधिक आनंदित तोच सर्वाधिक आर्थिक उन्नती ही करतो.(International Happiness Day)

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण साजरे करणे बहुतांश जण विसरले आहेत. यामुळे तणाव, चिडचिड अशा समस्या उद्भवत आहेत. अशातच बहुतांश लोक असे म्हणतात की, हसणे आयुष्यासाठी फायदेशीर आहे. कारण यामुळे अन्य समस्यांचा सुद्धा सामना करु शकतात. आनंदित राहिल्याने तुम्ही मानसिक आणि शारिरीकरित्या तणावमुक्त राहतात. अशातच आनंदित राहण्यासाठीच वर्ल्ड हॅप्पीनेस डे साजरा केला जातो.

खरंतर हा दिवस साजरा करण्याची सुरुवात २०१३ पासून झाली. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश हाच होता की, लोकांच्या आयुष्यात आनंदाचे महत्व वाढावे. वर्ल्ड हॅप्पीनेस डे प्रत्येक वर्षी साजरा करण्यासाठीचा निर्णय २० जुलै २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्राकडून मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर २०१३ मध्ये २० मार्चपासून तो प्रत्येक वर्षी साजरा करु जाऊ लागला. हा दिवस साजरा करण्याचे श्रेय हे प्रसिद्ध समाजसेवक जेमी इलियन यांना दिले जाते.

प्रसिद्ध समाजसेविका जेमी इलियन यांनी आयुष्यातील आनंदाच्या महत्वांवर खुप काम केले. त्यांच्यानुसार कोणताही व्यक्ती अथवा देश आयुष्यात आनंदीत असेल तरच तो वेगाने प्रगती करु शकतो आणि पुढे जातो. जेमी इलियन यांच्या याच विचाराने त्या काळातील युएन सेक्रेटरी जनरल बान की मून या खुप प्रभावित झाल्या. त्यानंतर त्याला युएन महासभेत १९३ देशांनी मत दिली आणि पाठिंबा ही मिळाला. त्यानंतरच प्रत्येक वर्षी २० मार्चला वर्ल्ड हॅप्पीनेस डे साजरा केला जाऊ लागला.(International Happiness Day)

हे देखील वाचा- गरजेपेक्षा अधिक दुसऱ्यांची मदत करत असाल तर ही सवय आजच बदला

यंदाच्या वर्षी वर्ल्ड हॅप्पीनेस डे ची थीम ही Keep Calm, Stay Wise and Be Kind अशी आहे. याचा अर्थ आहे की, आयुष्यात जसा ही काळ असो व्यक्तीला नेहमीच शांत आणि समजूतदारपणे वागावे. यामुळे तो आयुष्यात प्रगतीच्या मार्गाने चालत राहतो. त्याचसोबत दुसऱ्यांसाठी दयेची भावना नेहमीच लक्षात राहते. यामुळे ही लोक आयुष्यात नेहमीच पुढे जात राहतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.