देशाच्या स्वातंत्र्यासाठी जेव्हा-जेव्हा आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांबद्दल चर्चा होते तेव्हा चंद्रशेखर आजाद यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आज त्यांची पुण्यतिथी आहे. २७ फेब्रुवारी १९३ रोजी ते इंग्रजांशी लढताना ते शहीद झाले होते. चंद्रशेखर आजाद जेव्हा १५ वर्षाचे होते तेव्हा गाधींजींची प्रेरणा घेत असहयोग आंदोलनात सहभागी झाले होते. या दरम्यान, त्यांना अटक ही केली होती. जेव्हा त्यांना न्यायाधीशांनी त्यांचे नाव विचारले तेव्हा आपले नाव आजाद, वडिलांचे नाव स्वातंत्र्य आणि घराचा पत्ता तुरुंग असल्याचे सांगितले होते. (Chandra Shekhar Azad Death Anniversary)
कुठे झाला जन्म?
चंद्रशेखर आजाद यांचा जन्म २३ जुलै २९०६ रोजी मध्य प्रदेशातील अलीराजपुरातील भाबरा गावात झाला होता. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर तिवारी होते. असे म्हटले जाते की, त्यांनी आपल्या बालपणातच आदिवासी लोकांकडून धनुष्य बाण चालवण्यास शिकले होते. त्यांचा निशाणा खुप अचूक होता.
क्रांतीच्या मार्गावर गांधीजींची प्रेरणा
चेंद्रशेखर आजाद जेव्हा १५ वर्षाचे होते तेव्हा ते गांधीजींच्या असहयोग आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र जेव्हा गांधीजींनी हे आंदोलन बंद केले तेव्हा आजाद निराश झाले. त्यानंतर ते तरुण क्रांतिकारी मन्मथनाथ गुप्ता यांना भेटले. गुप्ता यांनी आजाद यांची भेट रामप्रसाद बिस्मिल यांच्याशी करुन दिली. त्यानंतर आजाद हे बिस्लिम यांच्या हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन मध्ये सहभागी झाले आणि क्रांतिकारी योजना बनवू लागले.
असे सांगितले जाते की, चंद्रशेखऱ आजाद ओरछा जवळील जंगलात लोकांना नेमबाजी शिकवायचे. पंडित हरिशंकर ब्रम्हचारी असे नाव वापरत काम करायचे. आजाद यांना एका प्रमुख क्रांतिकारी कार्यासाठी पैसे जमा करायचे होते आणि ते देणगी जमा करण्यात फार हुशार होते. (Chandra Shekhar Azad Death Anniversary)
काकोरी कांडची योजना आणि आजाद बचावले
९ ऑगस्ट १९२५ रोजी क्रांतिकाऱ्यांनी काकोरी मध्ये चालती ट्रेन थांबवत ब्रिटिश खजिना लूटण्याचा प्लॅन केला होता. ही लूट केल्यानंतर इंग्रजांच्या पायाखालची जमीन सरकली गेली. इंग्रजांनी या कांडात सहभागी असलेल्या क्रांतिकाऱ्यांना पडकण्यासाठी प्लॅन केला होता. पण ते कधीच इंग्रजांच्या हाती लागले नाही. जेव्हा सांडर्स यांच्या हत्येची प्लॅनिंग केला तेव्हा चंद्रशेखर आजाद यांना भगत सिंह यांची साथ दिली. त्यांचे कामात आपल्या साथीदारांना मदत करायचे. ते मृत्यूपर्यंत इंग्रजांच्या हाती लागले नाहीत.
हे देखील वाचा- स्वातंत्र्याच्या लढाईत महिलांच्या प्रतिनिधी राहिलेल्या ‘सरोजिनी नायडू’
अल्फ्रेड पार्क मध्ये लढताना झाले शहीद
२७ फेब्रुवारी १९३३ रोजी जेव्हा चंद्रशेखर आजाद अल्फ्रेड पार्कात सुखदेव राज यांच्यासोबत बसले होते. गुप्तहेरांच्या सुचनेवर सीआयडीचे सुपरिटेंडेट ऑफ पोलीस नॉट बाबर शिपायांसह तेथे पोहचले. त्यांच्या मागोमाग मोठ्या संख्येने कर्नलगंज पोलीस स्थानकातून ही पोलिस आले. नॉट बाबर यांनी चंद्रशेखर आजाद यांना चहूबाजूंनी घेरले. तेव्हा चंद्रशेखर आजाद यांच्यावर गोळीबार झाला.
अशातच एका झाडामागून ते गोळीबार करत होते. आजाद यांच्या अचूक निशाण्यामुळे तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. काही इंग्रज त्यामध्ये जखमी झाले. मात्र अखेर त्यांच्याकडे गोळ्या कमी राहिल्या, अशातच एक वेळ अशी आली तेव्हा त्यांच्याकडे केवळ एकच गोळी होती. तेव्हा आजाद यांनी आपल्या वचनानुसार स्वत:ला स्वतंत्र असल्याचे दाखवण्यासाठी स्वत:वर गोळीबार केला आणि शहीद झाले.