पाकिस्तानचे राष्ट्रकवि इकबाल (Muhammad Iqbal) यांनी भारताचे ‘सारे जहां से अच्छा’ हे गीत लिहिले आणि पाकिस्तानसाठी ‘लब पे आती है दुआ बनके’ लिहिले. १८७७ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये जन्मलेल्या इकबाल यांच्या आधीची पीढी कश्मीरी पंडित होती. ज्यांनी इस्लाम कुबूल केला होता. एक असा काळ होता जेव्हा दोन देशांच्या संस्कृतींचे संगम उभे होते. भारत आणि पाकिस्तान संदर्भातील त्यांचा दृष्टीकोन एकसमान होता. मात्र काळानुसार त्यांचा दृष्टीकोन बदलला गेला.
अलाहाबाद मध्ये २९ डिसेंबर १९३० रोजी मुस्लिम लीगच्या अधिवेशनात इकबाल यांनी जे भाषण दिले त्यानंतर खुप काही बदलले गेले. इकबाल यांच्या त्या भाषणाला आयडिया ऑफ पाकिस्तान असे म्हटले गेले. पाकिस्तानच्या शाळेत सुद्धा याच नावाने ते शिकवले जाते.
ज्या भाषणाला आयडिया ऑफ पाकिस्तान म्हटले गेले…
मुस्लिम लीगच्या अधिवेशमध्ये इकबाल यांनी असे म्हटले की, मी पंजाब, सिंध, बलूचिस्तान आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटियर यांना एका संयुक्त राज्याच्या रुपात पाहू इच्छित आहे. ब्रिटिश राजमध्ये किंवा त्यांच्या शिवाय, एक खुद-मुख्तार नॉर्थ वेस्ट भातीय मुस्लिम राज्यच मुस्लिमाचे अखेरचे मुस्तकबिल आहे. इकबाल यांनी आपल्या भाषणात थेट मुस्लिमांसाठी एका वेगळ्या देशाची मागणी केली होती. असे म्हटले जाते की, मुस्लिमांवर या भाषणाचा खुप प्रभाव पडला. त्यामुळेच त्याला आयडिया ऑफ पाकिस्तान असे म्हटले गेले.
द प्रिंटच्या रिपोर्ट्सनुसार, इकबाल यांच्या मनात भीती होती कीस भारतातील हिंदू-बहुसंख्यंक लोकसंख्या मुस्लिम विरासत, संस्कृती आणि राजकीय प्रभाव संपुष्टात आणेल. इकबाल यांना हा सल्ला दिला होता की, तो पर्यंत देशात शांति येणार नाही जो पर्यंत मुस्लिमांसाठी एक वेगळा राष्ट्र नसेल.
मुलाने सांगितला होता अर्थ
इकबाल यांच्या भाषणातून जो मेसेज जनतेमध्ये गेला त्याचा विरोध नेहमीच पाकिस्तानातील कोर्टात न्यायाधीश राहिलेला मुलगा जावेद इकबाल यांनी विरोध केला. त्यांनी असे म्हटले होते की, इलाहाबादच्या अधिवेशनात त्यांनी भाषणात हे जरुर म्हटले होते की, सिंध, पंजाब, बलूचिस्तान आणि उत्तर-पश्चिम सीमांत प्रांत एक करुन देश बनवावा. मात्र मुस्लिम राज्याचा विचार करुन हा मुद्दाम किंवा अजाणपणे एक स्वप्न बनवले. (Muhammad Iqbal)
हे देखील वाचा- होमी भाभांचा अपघात झाला नसता तर भारताकडे असती हजारो परमाणू हत्यारे
न्यायाधीश जावेद यांनी असे म्हटले होते की, १९३१ मध्ये वडीलांच्या मुस्लिमांसाठी एका वेगळ्या राष्ट्राच्या मागणी विरोधात इंग्रज सरकारला एक पत्र लिहिले होते. ते पत्र ऑक्टोंबर १९३१ मध्ये टाइम मॅगजिन मध्ये सुद्धा प्रकाशित केले गेले होते. त्या पत्रात असे म्हटले होते की, मी ब्रिटिश इंडियाच्या बाहेर वेगळ्या मुस्लिम राज्याची मागणी केलेली नाही. मी सांप्रदायिक आधारावर पंजाबच्या विभागणीच्या विरोधात आहे. तसेच साइमन कमीशनच्या रिपोर्ट आणि जवाहरलाल नेहरु यांच्या समुदायांच्या संख्येच्या आधारावक जे एक नवं राज्य बनवण्याची मागमी केली आहे. मी त्याच अंतर्गत मुस्लिम बहुल्य देशाबद्दल बोलत आहे.