Home » ख-या सूर्यासारख्या खोट्या सूर्याची निर्मिती ?

ख-या सूर्यासारख्या खोट्या सूर्याची निर्मिती ?

by Team Gajawaja
0 comment
Fake Sun
Share

पृथ्वीवरील सर्व जीवन ज्याच्यावर अवलंबून आहे, तो म्हणजे सूर्य. सूर्यमालेच्या मध्यभागी असलेल्या या ता-याभोवती पृथ्वी आणि सौर मंडळाचे इतर घटक फिरतात. सूर्याला ऊर्जेचे भांडार म्हटले जाते. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेचा फक्त एक छोटासा भाग पृथ्वीवर पोहोचतो.  त्याच्यावरच पृथ्वीवरील सजीवांचे जीवन संपन्न होत आहे. (Fake Sun) 

हाच सूर्य नसेल तर काय, ही कल्पनाही करता येणार नाही.  कारण सूर्यच अस्तित्वात नसेल तेव्हा मानवाचे अस्तित्वही संपूष्ठात आलेले असेल. अब्जो वर्षानंतर सूर्याचे अस्तित्व नष्ट होणार आहे, असे काही संशोधक सांगत असले तरी, आता याच सूर्यमालेतील एकमेव सूर्याला एक पर्याय आला आहे. कारण अगदी ख-या सूर्यासारख्या खोट्या सूर्याची निर्मिती करण्यात आली आहे. 

वास्तविक ही घटना खगोलशास्त्रासाठी मोठी देणगी देणारी ठरली आहे.  या खोट्या सूर्याची निर्मिती केली आहे ती दक्षिण कोरिया.  या खोट्या सूर्यापासून 100 दशलक्ष डिग्री सेल्सिअस उष्णता निर्माण झाली आहे.  त्यामुळेच जर सूर्य नसता तर, हा विचार ज्यांच्या मनात येत होता, त्यांना दिलासा मिळाला आहेच. शिवाय पृथ्वीवर अनेक पद्धतीनं या सूर्यापासून निघणा-या उर्जेचा वापर होणार आहे.  विज्ञानातील हा सर्वात मोठा प्रयोग म्हणून बघितले जात आहे.  (Fake Sun)

दक्षिण कोरियाने कृत्रिम सूर्य बनवण्यात यश मिळवले आहे.  गेल्या काही वर्षापासून दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांची एक टीम या कृत्रिम सूर्य बनवण्याच्या मोहीमेवर होती. आता त्यात त्यांना यश मिळाले आहे. या कृत्रिम सूर्याचे पहिले परिक्षण झाले, तेव्हा  ४६ सेकंदांसाठी आण्विक फ्यूजन दरम्यान १०० दशलक्ष अंश तापमान गाठले गेले. सौरमंडळात एक प्रखर सूर्य असतांना हा दुसरा कृत्रिम सूर्य कशाला हा प्रश्न या प्रयोगानंतर काहींनी व्यक्त केला. त्याचे उत्तरही हा प्रयोग यशस्वी करणा-या शास्त्रज्ञांनी दिला आहे.  हा कृत्रिम सूर्य भविष्यात स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करणार असल्याची दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.  

दक्षिण कोरियाच्या शास्त्रज्ञांचे हे न्यूक्लियर फ्यूजन तंत्रज्ञानात अभूतपूर्व यश मानले जात आहे. १०० दशलक्ष अंश सेल्सिअस तापमान हा नवा जागतिक विक्रम ठरला आहे. यापूर्वी २०२१ मध्ये ३० सेकंदांचा विक्रम झाला होता.  आता तो विक्रम तोडण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले.  हे तापमान आपल्या ख-या सूर्याच्या गाभ्यापेक्षा सातपट जास्त आहे.  भविष्यातील अतिरिक्त उर्जा स्त्रोताच्या दृष्टिकोनातून केलेला हा प्रयोग त्यामुळेच यशस्वी झाल्याचा दावाही या शास्त्रज्ञांनी केला आहे. (Fake Sun)

हा कृत्रिम सूर्याचा प्रयोग करण्यासाठी शास्त्रज्ञांनी कोरिया सुपरकंडक्टिंग टोकमाक ॲडव्हान्स्ड रिसर्च (KSTAR) उपकरण तयार केले.  त्यात सूर्यासारखे प्रखर तापमान प्रयोगांदरम्यान तयार करण्यात आले. हा प्रयोग डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४  दरम्यान करण्यात आला. यासंदर्भात माहिती देतांना शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की, न्यूक्लियर फ्यूजनमध्ये, दोन हलके अणू केंद्रके एकत्र होऊन जड अणू बनतात. यामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा सोडली जाते. सूर्यासारख्या ताऱ्यांनाही न्यूक्लियर फ्युजनमधून ऊर्जा आणि प्रकाश मिळतो. यामध्ये हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन हेलियम तयार करतात.  याच प्रक्रीयेतून झालेला हा प्रयोग यशस्वी झाल्यावर आता शास्त्रज्ञांनी त्यांचे पुढचे लक्ष निश्चित केले आहे.  त्यानुसार २०२६ पर्यंत ३०० सेकंदांसाठी १०० दशलक्ष अंशांचे प्लाझ्मा तापमान राखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. 

कोरियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्यूजन एनर्जी येथील केएसटीएआर संशोधन केंद्राचे संचालक सी-वू यून हे या सर्व प्रयोगाचे प्रमुख आहेत. पृथ्वीवर प्रभुत्व मिळवण्याचा हा प्रयोग आव्हानात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.  हा सगळा प्रयोग करण्यासाठी अब्जो रुपये खर्च करण्यात आले आहेत.  मुळात एका सूर्यापासून मिळणारी उर्जा पुरेशी असतांना अशा प्रकारच्या प्रयोगावर होणारा खर्च व्यर्थ असल्याची टिका या प्रयोगावर झाली.  मात्र सूर्यासारखा स्रोत पृथ्वीवर निर्माण झाल्यास जगातील ऊर्जेची समस्या संपुष्टात येईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होउ शकणार आहे.  तसेच ऊर्जेशी संबंधित भू-राजकीय तणावही कमी होईल, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.  याशिवाय अंतराळ संशोधनात फ्यूजन ऊर्जा महत्त्वाची ठरू शकते. (Fake Sun) 

============

हे देखील वाचा : राजेश खन्ना यांचा हा सिनेमा पाहिल्यानंतर एका वृद्ध दांपत्याने बदलले होते मृत्युपत्र, मुलांकडून हिरावले होते मालकी हक्क

============

मंगळ किंवा त्यापुढील मोहिमांसाठी ही ऊर्जा सहज उपलब्ध होईल, अशी आशाही शास्त्रज्ञांना आहे. या प्रयोगांमुळे आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक अणुभट्टी विकसित करण्यात मदत होणार आहे.  अर्थातच कुठलाही प्रयोग, तंत्रज्ञान हे कसे असते, यासोबत त्याचा वापर कशापद्धतीनं होतो यावर त्याचे यश अवलंबून असते.  आता या कृत्रिम सूर्यापासून मिळणा-या उर्जेचाही उपयोग मानवाच्या प्रगतीसाठी झाल्यास भविष्य़ात असेच प्रयोग अन्य देशातही होणार आहेत.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.