केरळ राज्याच्या मुखाशी, अरबी समुद्राच्या किनारी वसलेला आणि सुमारे अडीच लाख लोकसंख्या असलेला कन्नूर जिल्हा. कन्नूरमध्ये नारळाच्या झाडांपासून मोठ्या प्रमाणात ताडी काढली जाते. ताडी हा देशी दारूचा एक प्रकार आहे. स्थानिक कामगार प्लास्टिकचे डबे घेऊन उंच झाडांवर चढून ताडी काढतात. येथील लोकांसाठी ते रोजगाराचे साधन आहे. ते औषध नसून एक कृती मानतात.
ही १९४५ सालातील गोष्ट आहे. कन्नूरच्या पिनरायी गावात राहणारा ‘कुरानही’ ताडी उतरवण्याचे काम करत असे. पत्नी कल्याणी शेतात काम करायची. घरात १४ मुले होती. यापैकी ११ जणांचा बालपणात मृत्यू झाला. कुराण आणि कल्याणीच्या उरलेल्या ३ मुलांपैकी सर्वात लहान मुलाचे नाव होते विजयन. मुलांच्या नावात गावाचे नाव टाकण्याची जुनी प्रथा आहे. त्यामुळे पूर्ण नाव ‘पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan)’ होते.
कुटुंबाच्या बिकट परिस्थितीतही विजयन यांनी शिक्षण पूर्ण केले. तलासरीच्या शासकीय महाविद्यालयातून त्यांनी बीए-अर्थशास्त्राची पदवी संपादन केली. यानंतर मात्र ते हळूहळू स्थानिक राजकारणात सक्रिय होऊ लागले. विजयन हे कन्नूरच्या ओबीसी समाजातील एझावामधून आलेले आहेत. कन्नुरमध्ये एझावाची एकूण लोकसंख्या २२% आहे आणि ही लोकसंख्या थेट मत देते. या अर्थाने कन्नूरच्या जातीय समीकरणांनीही विजयन यांना साथ दिली.
सन १९६४ मध्ये कम्युनिस्ट पक्ष फुटला आणि त्याचे दोन भाग झाले – CPI आणि CPI (मार्क्सवादी). त्याच वर्षी पिनाराई विजयन भारतीय कम्युनिस्ट पक्षात सामील झाले. येथून त्यांचा राजकीय आलेख वाढला. केरळ स्टुडंट फेडरेशन (KSF) मध्ये ते जिल्हा सचिव झाले. नंतर KSF चे नाव बदलून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच SFI करण्यात आले. त्यानंतर विजयन केरळ राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले.
१९७० साली केरळमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. विजयन यांना कन्नूर जिल्ह्यातील ‘कुतुपरंबा’ मतदारसंघातून तिकीट मिळाले. निवडणुका झाल्या. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी विजयन आमदार झाले.
केरळमधील जनता विजयन यांना ‘मुंडू उदुथ मोदी’ असं म्हणते. ‘मुंडू उदुथ मोदी’ म्हणजे लुंगी घातलेले मोदी. लोकांमध्ये नरेंद्र मोदींची प्रतिमा का दिसते? हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं उत्तर म्हणजे मोदींची राजकीय शैली ‘पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्या राजकारणात आहे. विजयन यांची निर्णय घेण्याची क्षमता त्यांची काम करण्याची पद्धत ही पंतप्रधान मोंदीसारखी आहे, असं केरळमधील जनता सांगते. म्हणून विजयन यांना केरळ राज्यातील जनता ‘लुंगी वाला मोदी’ म्हणतात.
२६ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यावेळी केरळमध्ये सीपीआयच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडीचे सरकार होते. सी अच्युत मेनन हे मुख्यमंत्री होते. ‘पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) हे सीपीआयचे आमदार होते. ते स्वतः आणि त्यांच्यासोबत इतर अनेक नेते सतत सरकारच्या विरोधात आवाज उठवत होते.
२८ सप्टेंबर १९७५ रोजी रात्री पोलीस आमदार ‘पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्या घरी पोहोचले. यामध्ये विजयन यांच्या विधानसभेचे सर्कल इन्स्पेक्टर बलरामन यांचाही सहभाग होता. बलरामन विजयन यांना म्हणाले तुमच्या अटकेचा आदेश आहे. त्यानंतर त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आले.
पण त्यानंतर त्या रात्री जेलमध्ये काय घडले, हे विजयन यांनी दीड वर्षांनंतर केरळ विधानसभेत ३० मार्च १९७७ रोजी सांगितले. १९७७ सालच्या निवडणुकीत केरळमध्ये परत संयुक्त आघाडीचे सरकार आले. मात्र, विजयन जिंकल्यानंतर ते पुन्हा आमदार झाले. त्या दिवशी विधानसभेत त्यांच्या हातात रक्तात भिजलेला शर्ट होता. २८ सप्टेंबर १९७५ च्या रात्री त्यांना रक्त येईपर्यंत मारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या शर्टावर रक्ताचे जाड लाल डाग उमटले होते.
विधानसभेत ‘पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) सांगत होते, “२८ सप्टेंबरच्या रात्री मला जेलमध्ये बंद करून पोलीस निघून गेले. ते गेल्यानंतर अचानक जेलमधील लाईट बंद झाले. त्यांनतर काही लोक आत आले. हे बहुधा पोलीस खात्याचे नव्हते. त्यांनी नाव विचारले. मी सांगितलं, ‘पिनारायी विजयन’. त्यांनी माझ्यावर जोरदार हल्ला केला. रात्रभर अमानुषपणे मारहाण केली. त्यांनतर मी बेशुद्ध पडलो. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आलो तेव्हा अंगावर फक्त अंतर्वस्त्र होते. मला उभेही राहता येत नव्हते.”
हे ही वाचा: वादग्रस्त आयुष्यापलीकडील तत्ववेत्ते ओशो (Osho)
ऑपरेशन ब्लू स्टार: नक्की काय घडले त्या रात्री?
सभा सुन्न झाली होती. जे ‘पिनाराई विजयन (Pinarayi Vijayan) यांना जवळून ओळखत होते त्यांनीही त्यांना पहिल्यांदाच अशाप्रकारे गरजताना पाहिले होते. विजयन यांच्या या भाषणाने केरळमध्ये आणीबाणीच्या काळात पोलिसांच्या हिंसाचाराचा आणि सरकारने केलेल्या कथित प्रक्षोभाचा मोठा मुद्दा बनवला. याचा एवढा जबरदस्त परिणाम झाला की, २५ एप्रिल रोजी तत्कालीन मुख्यमंत्री करुणाकरन यांनी या मुद्द्यांवर राजीनामा द्यावा लागला.
– प्रशांत पाटील