Home » WhatsApp Vs Telegram: स्पर्धा फिचर्सची! तंत्रज्ञानाच्या विश्वात या दोन ॲप्समध्ये प्रचंड स्पर्धा

WhatsApp Vs Telegram: स्पर्धा फिचर्सची! तंत्रज्ञानाच्या विश्वात या दोन ॲप्समध्ये प्रचंड स्पर्धा

by Team Gajawaja
0 comment
Whatsapp vs Telegram
Share

WhatsApp Vs Telegram हा सध्याचा ट्रेंडिंग विषय आहे. खरंतर इन्स्टंट मेसेजिंगसाठी वापरण्यात येणारं ‘व्हाट्स ॲप (WhatsApp)’ हे सर्वात मोठे प्लॅटफाॅर्म आहे. पण जर सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असेल, तर वैशिष्ट्यांच्या बाबतीत ते सर्वात बेस्ट आहे का? तर नाही, कारण इतर काही इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी खूप उपयुक्त आहेत, परंतु ती वैशिष्ट्ये व्हाट्स ॲपवर उपलब्ध नाहीत. 

इन्स्टंट मेसेजिंगसाठी व्हाट्स ॲपव्यतिरिक्त अजून बरीच ॲप्स आहेत. उदा. टेलिग्राम, सिग्नल, इ. गेल्या काही वर्षांत टेलिग्रामची लोकप्रियता सर्वाधिक वाढली आहे. टेलिग्रामने कोणतीही कसर न ठेवता अनेक वैशिष्ट्ये आपल्या वापरकर्त्यांना  दिली आहेत. खरं पाहायला गेलं तर, तंत्रज्ञानाच्या विश्वात WhatsApp आणि Telegram या ॲप्समध्ये प्रचंड स्पर्धा आहे. अनेक वापरकर्तेही त्यामुळे ‘WhatsApp Vs Telegram गुगलवर सर्च करून या दोन्ही ॲप्सची तुलना करत असतात.

टेलिग्राम या ॲपची निर्मिती २०१३ साली झाली. हे व्हॉट्स अ‍ॅपच्या तोडीस तोड असे रिअल-टाइम मेसेजिंग अ‍ॅप आहे. शिवाय, या ॲपची फिचर्स भन्नाट आहेत. उदा. क्रॉस-प्लॅटफॉर्म कनेक्शन, प्रोग्राम करण्यायोग्य बॉट्स, आकर्षक थीम्स आणि इतरही सुविधा दिल्या आहेत. ही दोन्ही अ‍ॅप्स मेसेजिंग जगतातली मुख्य आणि लोकप्रिय अ‍ॅप्स आहेत. या दोन्ही ॲप्सच्या फिचर्सविषयी जाणून घेऊया.

Telegram Vs WhatsApp: Which Messenger To Use in 2019? | Beebom

व्हाट्स अ‍ॅपपेक्षा टेलिग्राम वेगळं कसं? (WhatsApp Vs Telegram)

टेलिग्राममध्ये स्लॅक किंवा मायक्रोसॉफ्ट टीम्ससारख्या अ‍ॅप्सवर असेलेले चॅनलचंही फिचर आहे. हजारो-लाखो लोक एका चॅनलशी कनेक्ट होऊन त्यांना एकाच वेळी मेसेज पाठवू शकता. त्या चॅनलमध्ये पाठवलेल्या सर्व फाइल्स किंवा चॅट क्लाऊडवर जतन केल्या जातात. त्यामुळे आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला सहजतेने मोठ्या फाइल्सही पाठवू शकतो. अशा फाइल्स आपल्या चॅटच्या दरम्यान पुन्हा अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

आवश्यक असल्यास फोन नंबर स्विच करणं आणि समोरच्या व्यक्तीला त्वरित तो नवीन नंबर देणं यासारख्या काही सुविधा टेलिग्रामने खूप आधीच द्यायला सुरूवात केली होती. टेलिग्राममध्ये फोनच्या मुख्य भाषेपेक्षा वेगळ्या असलेल्या भाषासुद्धा निवडू शकतो.

टेलिग्रामची वैशिष्ट्ये –

– आपल्या फाइल स्टोअर करण्यासाठी क्लाऊड स्टोरेज

– फोनमधील मेमरी वाचवण्यासाठी मीडिया कम्प्रेशन

– लाखो सदस्य असलेला ग्रुप बनविण्याची सोय

– नंबर सहजतेने बदलू शकता

– चॅनलची सुविधा

– विंडोज, अँड्रॉइड, आयओएस, विंडोज फोन, मॅक ओएस सर्व प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर वापरता येतं 

– गोपनीय चॅटिंगसाठी सीक्रेट चॅटचा पर्याय

– क्षणात प्रश्नांची उत्तर देणारे टेलिग्राममधील बॉट्स

– ड्राफ्टची सुविधा

हे ही वाचा: Roopkund: गुढ…रहस्यमी…तितकाच आव्हानात्मक रुपकुंड ट्रेक!

चीनमुळे कर्जबाजारी झालेल्या ‘या’ देशाला भारत देतोय मदतीचा हात

थोडक्यात सांगायचं झालं तर व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप व्हिडीओ कॉल, मोठा युजर बेस, एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आहे. तरीही फाइल कनेक्टिंग आणि क्लाऊड स्टोरेजच्या बाबतीत बऱ्याच मर्यादा आहेत. दुसरीकडे टेलिग्राममध्ये विविध बॉट्स, फाइल शेअरिंग, प्लॅटफॉर्म्सची सुसंगतता आणि गोपनीयता अशा खूप सुविधा आहेत. पण, व्हिडीओ कॉल सपोर्ट आणि मर्यादित युजर बेस यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या एक पाऊल मागे आहे. WhatsApp Vs Telegram मधील सुविधांबाबत अशा अनेक विषयांवर आता वापरकर्ते चर्चा करत असतात.

– प्रशांत पाटील


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.