Home » ‘या’ बाप्पाची पूजा केली की पडतो पाऊस…

‘या’ बाप्पाची पूजा केली की पडतो पाऊस…

by Team Gajawaja
0 comment
Ganesh Temple
Share

राजस्थानमधील चित्तोड किल्ल्याला राजस्थानची शान आणि किल्ल्यांचा मुकुट म्हटले जाते. कारण हा  चित्तौडगड किल्ला भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे. मौर्य वंशातील महान सम्राट चित्रांगदा मौर्याने हा किल्ला बांधला.  या किल्ल्यावर अनेक काव्य स्थानिक भाषेत गायली जातात.  किल्ल्यावर अनेक मंदिरे असून ती बघण्यासाठीही पर्यटकांची गर्दी असते.  याच पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख स्थळ असलेल्या या किल्ल्यात गणेशाचे अनोखे मंदिर आहे. मुळात राजस्थान हा कमी पावसाचा प्रदेश आहे. जेव्हा दुष्काळसदृश परिस्थिती येते, तेव्हा या चित्तौडगढ किल्ल्यातील एका गणेशाच्या मंदिरात पुजा केली जाते.  यानंतर पाऊस येतोच आणि दुष्काळही दूर होतो, असे सांगितले जाते. 10 शतकातील या गणेशाच्या मंदिराला (Ganesh Temple) म्हणूनच बरखा गणेशजी का मंदिर असेही म्हटले जाते.   

देशभरात सर्वत्र गणपती बाप्पाच्या आगमनाचा महोत्सव साजरा होत आहे. अनंत चतुर्थीपर्यंत गणेशाची (Ganesh Temple) पुजा सर्वत्र करण्यात येत आहे.  देशभरात आणि विदेशातही गणपती बाप्पाची भक्तीभावानं पुजा करण्यात येत आहे.  याच गणेशाचे एक अनोखे मंदिर राजस्थानमधील प्रसिद्ध चित्तौडगढ किल्ल्यात आहे.  या मंदिरातही मोठा उत्सव साजरा होत आहे.  या मंदिरातील गणेशाची मुर्ती (Ganesh Temple) अत्यंत जागृत असून या गणेशाजवळ पाऊस पडावा अशी प्रार्थना केली, तर परिसरात जोरदार पावसाचे आगमन होते, असे भाविक सांगतात. चितौडगढ किल्ल्यावर गणेशाच्या अनेक प्राचीन मुर्ती आहे. 

त्यातील बरखा गणेश हे मंदिर (Ganesh Temple) किल्ल्याच्या उभारणीबरोबर बांधल्याचे सांगण्यात येते. या मंदिरातील गणेशाची मुर्ती अत्यंत प्राचीन असून आठव्या ते दहाव्या शतकादरम्यान ही मुर्ती तयार झाल्याचे अभ्यासक सांगतात.  चितौडगढ किल्ल्यात असलेल्या अन्य मंदिरांपेक्षा हे गणेशाचे मंदिर लहान असले, तरी त्यातील कलाकुसर आकर्षक आहे. पूर्व दिशेला असणा-या मंदिरात गणेशाची चतुर्भुज मुर्ती आहे. श्री गणेशाच्या हातात अनेक प्रकारची शस्त्रे आहेत, तसेच सापही आहे. 

मंदिरात गणेशजी (Ganesh Temple) आपल्या दोन पत्नी,  रिद्धी-सिद्धीसोबत बसलेले आहेत.  येथेच रिद्धी आणि सिद्धी यांच्यावर शिलालेख आहे.  यामध्ये गणेशाची आणि रिद्धी, सिद्धी यांची पूजा कशी करायची याची माहितीही असल्याचे सांगण्यात येते. मात्र हे शिलालेख तोडलेल्या अवस्थेत आहेत.  या किल्ल्यातील अनेक मंदिरे ही आक्रमणादरम्यान पाडण्यात आली. तेव्हा यातील शिलालेखांचेही नुकसान करण्यात आले. त्यातच या मंदिरालाही झळ बसली.  या मंदिराच्या स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठीही अभ्यासकांची गर्दी असते.  मंदिरातील खांब हे अतिशय कलाकुसरीचे आहेत.  मंदिराची ओळख ही त्याच्यावर असलेल्या कळसामुळे होते.  मात्र या बरखा गणेशाच्या मंदिरावरील कळस हा आक्रमणादरम्यान तोडण्यात आला आहे.  

चित्तौडगडावर असलेला मोती बाजार आणि नगीना बाजार प्रसिद्ध होता.  या बाजाराचे जेव्हा बांधकाम झाले, त्याचवेळी मंदिराचेही बांधकाम झाले. या बाजारातील व्यापारी मंदिरात पुजा करीत असत.  तसेच व्यापार चांगला होण्यासाठी गणेशाची प्रार्थना करीत असत.  बाजारात धान्य मुख्य असायचे.  धान्य भरपूर येण्यासाठी पावसाची गरज असते.  त्यामुळे बाजारातील व्यापारी या मंदिरात गणेशाला (Ganesh Temple) भरपूर पाऊस पडू दे, अशी प्रार्थना करत असत.  पावसासाठी मंदिरात भव्य पूजा होत असत.  पावसासाठी पूजा झाल्यावर चांगला पाऊस पडायला लागला.  तेव्हापासून येथे परिसरातील व्यापारी आणि शेतक-यांचीही गर्दी होऊ लागली.  पाऊस कमी झाल्यावर येथील शेतकरी या मंदिरात हवन आणि पूजा करतात.  त्यानंतर हमखास पाऊस पडतो, असे सांगण्यात येते.  त्यामुळेच या गणेशाचे नाव बरखा गणेश असे पडले.   

=========

हे देखील वाचा : चामुंडा माता मंदिराच्या यात्रेसाठी तयारी सुरु 

========

 

याव्यतिरिक्तही चितौडगढ किल्ल्यात अनेक गणेशाची मंदिरे (Ganesh Temple) आहेत. या किल्ल्याचा चौथा दरवाजा गणपतीला समर्पित आहे. गणेश पोळ असे त्याचे नाव आहे.  या दरवाज्याजवळ गणपतीचे एक प्राचीन छोटेसे मंदिरही आहे. किल्ल्यातील कुकडेश्वर कुंडाजवळील महादेवरा येथे गणेशाची उभी मूर्ती आहे. ही मूर्ती दुर्मिळ असल्याचे सांगितले जाते. अष्टभूजा विनायक असेही या गणेशाला म्हटले जाते.  या सर्वात किल्ल्यातील बरखा गणेशाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते.  या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे, मंदिरात सर्वधर्मिय गणेशाची आराधना करतात.  

सई बने 

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.