Home » तुमचे WhatsApp Chat Leak होऊ शकतात का?

तुमचे WhatsApp Chat Leak होऊ शकतात का?

by Team Gajawaja
0 comment
WhatsApp Tips
Share

व्हॉट्सअॅप चॅट लीक सारखे टर्म आपण बहुतांश वेळा ऐकतो. खासकरुन जेव्हा ही टर्म आपल्याला वाचायला मिळते. मात्र आता प्रश्न असा उपस्थितीत राहतो की, व्हॉट्सअॅपचे चॅट्स नक्की लीक कसे होतात? कारण अॅपकडून दावा केला जातो की, व्हॉट्सअॅप चॅट्स एंड-टू-एंट एन्क्पि्टेड असतात. व्हॉट्सअॅपने काही वर्षांपूर्वी आपल्या प्लॅटफॉर्मवर चॅट एन्किप्शनचे फिचर आणले होते. तरी सुद्धा लोकांचे चॅट्स कसे लीक व्हायचे? एंड-टू-एंड एन्क्रिप्शनचा अर्थ असा आहे की, व्हॉट्सअॅप चॅट फक्त सेंडर किंवा रिडरच वाचू शकतो. त्यामध्ये तिसरा कोणताही व्यक्ती हा डेटा एक्सेस करु शकत नाही.(WhatsApp Chat Leak)

त्याचसोबत व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक सुद्धा युजर्सचे मेसेज वाचू शकत नाही. तर असे सगळे आहे तरीही चॅट्स लीक कसे होतात. जाणून घेऊयात व्हॉट्सअॅप चॅट्स लीक कसे होतात.

कसे लीक होतात व्हॉट्सअॅप चॅट्स?
कोणतेही व्हॉट्सअॅप चॅट लीक होण्याच्या काही संभावना आहेत. सर्वात प्रथम असे की, एखादा तुमचा फोन एक्सेस करु शकतो आणि चॅट्स तेथून लीक करु शकतात. याची संभावना अधिक असू शकते. असे समजा की, तुमचा फोन एखाद्याला मिळतो आणि तो अनलॉक सुद्धा करु शकतो. त्यानंतर तुमचे चॅट्सचे स्क्रिनशॉट काढून शेअर केला जाऊ शकतो.

असे समजूयात तुम्ही एखाद्या गुन्ह्याच्या प्रकरणात अडकला आहात आणि तुमचा फोन पोलिसांच्या हाती लागला आहे. अशातच फोन अनलॉक करण्यासाठी पोलीस फॉरेंसिक टीमची मदत घेऊ शकते. या व्यतिरिक्त तुमचे चॅट्स व्हॉट्सअॅवर तर एन्क्रिप्टेड होतात. पण चॅट बॅकअप गुगल ड्राइव्ह किंवा आयक्लाउड वर एन्क्रिप्ड होत नव्हते. दरम्यान, काही काळापूर्वी कंपनीने बॅकअपमध्ये एंड टू एंड एन्क्रिप्शन देणे सुरु केले आहे.

WhatsApp Chat Leak
WhatsApp Chat Leak

त्यामुळेच आता बहुतांश व्हॉट्सअॅप चॅट्स लीक प्रकरणात ते क्लाउडमधून होत असल्याचे सांगितलेजाते. आता सुद्धा जे जुन्या बॅकअप क्लाउडवर ठेवले आहे जेथून चॅट्स लीक होण्याची शक्यता असते. पोलीस तेथून सुद्धा तुमचा डेटा मिळवू शकतात. या व्यतिरिक्त शासकीय एजेंसी गुगल आणि अॅप्पल सारख्या कंपन्यांना कोर्ट ऑर्डर करुन सांगू शकते. या काही शक्यता आहेत जेव्हा तुमचा डेटा लीक होऊ शकतो.

काही प्रकरणांमध्ये तुमचे व्हॉट्सअॅप वेब वर्जन सुद्धा एक्सेस करुन चॅट्स लीक केले जाऊ शकतात. कारण आता व्हॉट्सअॅप वेबसाठी नेहमीच तुमच्या फोनमध्ये डेचा असणे गरजेचे आहे. प्लॅटफॉर्मवर मल्टी डिवाइस सपोर्ट मिळत आहे.(WhatsApp Chat Leak)

हे देखील वाचा- भारतात स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या कारणं

व्हॉट्सअॅप तुमचे चॅट्स सरकारला देते?
असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, तुमचा व्हॉट्सअॅप डेटा सरकार सोबत शेअर करते? असे तर होत नाही. या मुद्द्यावरुन सरकार आणि व्हॉट्सअॅप सुद्धा कोर्टात पोहचले आहेत. खासकरुन ग्रुपमध्ये वेगाने शेअर केले जाणारे मेसेज संदर्भात. व्हॉट्सअॅप आणि सरकारसाठी फेक न्यूज आणि दिशाभूल करणारी माहिती व्हायरल होण्यापासून थांबवणे हे एक आव्हान आहे. कारण एंड-टू-एंड एन्क्रिप्शनच्या कारणामुळे फर्स्ट सेंडरचा शोध घेणे कठीण होऊन जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.