Home » देशातील सर्वाधिक लांब ट्रेन

देशातील सर्वाधिक लांब ट्रेन

आपण सर्वचजण भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कधी ना कधी प्रवास करतो.  भारतीय रेल्वेकडून देशभरात १२००० पेक्षा अधिक ट्रेन चालवल्या जातात.

by Team Gajawaja
0 comment
Vivek Express
Share

आपण सर्वचजण भारतीय रेल्वेच्या माध्यमातून कधी ना कधी प्रवास करतो.  भारतीय रेल्वेकडून देशभरात १२००० पेक्षा अधिक ट्रेन चालवल्या जातात. यापैकी काही ट्रेन कमी अंतरामध्ये तर काही खुप अंतरामध्ये चालतात. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या ट्रेनमध्ये राजधानी, सुपरफास्ट आणि एक्सप्रेसचा समावेश आहे. मात्र तुम्हाला हे ऐकून हैराण व्हाल की, देशात चालणारी एक ट्रेन आपल्या संपूर्ण प्रवासात दिल्ली ते सिंगापुर मध्ये जेवढे अंतर आहे तेवढे अंतर कापते. हे अंतर कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या अंतरापेक्षा (४००० किमी) अधिक आहे. (Vivek Express)

देशातील सर्वाधिक लांब अंतर कापणारी ट्रेन राजधानी, दूरंतो नव्हे तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. जी पुर्वोत्तरेकडून दक्षिण भारतातील अखेरच्या स्टेशन पर्यंत चालवली जाते. ही ट्रेन २२५०४ आणि २२५०३ विवेक एक्सप्रेस आहे. आसाम मधील डिब्रुगढ वरुन निघते ती तमिळनाडू मधील कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास करते. एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत पोहचण्यासाठी ट्रेन ४१५३ किमी पर्यंतचा प्रवास करते. तर दिल्ली ते सिंगापूर मधील अंतर ४१५५ किमी आहे. हे अंतर विमान मार्गावरील आहे.

Vivek Express

Vivek Express

या ट्रेनच्या संपूर्ण प्रवासादरम्यान ५९ स्थानकांपर्यंत थांबते. जर प्रत्येक स्थानकात दोन-दोन मिनिटे थांबत असेल तर ट्रेन प्रवासादरम्यान दोन तास थांबेल. दरम्यान काही स्थानकातील थांबा दीर्घकाळ असेल.ट्रेन संपूर्ण अंतर ७४ तासापर्यंत पूर्ण करते. रेल्वे ही ज्या दिवशी निघते त्याच्या चार दिवसांनी ती आपल्या गंतव्य स्थानकापर्यंत पोहचते. (Vivek Express)

सात राज्यांतून जाते ट्रेन
ही ट्रेन सात राज्य, असम, नागालैंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळमधून जाते. यामध्ये तिनसुकिया, दीमापुर, गुवाहाटी, बोंगाईगांव, अलीपुरद्वार, सिलीगुड़ी, किशनगंज, मालदा, रामपुरहाट, पाकुड़, दुर्गापुर, आसनसोल, खड़गपुर, बालासोर, कटक, भुवनेश्‍वर, खोरधा, ब्रह्मपुर, श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापत्तनम, समालकोट, राजमुंदरी, एलुरु, विजयवाड़ा, ओंगोल, नेल्लोर, रेनिगुंटा, वेल्लोर, सेलम, इरोड, कोयंबटूर, पलक्कड़, त्रिशूर, अलुवा, एर्नाकुलम, कोट्टायम, चेंगन्नूर, कोल्लम, तिरुवनंतपुरम आणि नागरकोइल सारख्या प्रमुख शहरांमध्ये थांबते.

हेही वाचा- रेल्वे स्थानकात ठेवलेल्या काळ्या रंगांच्या डब्ब्यांचा ‘हा’ आहे अर्थ

खरंतर विवेक एक्सप्रेस ही स्वामी विवेकानंद यांच्या १०५ व्या जयंती निमित्त सुरु करण्यात आली होती. विवेक एक्सप्रेस ट्रेनची घोषणा २०११-१२ दरम्यानच्या रेल्वे बजेटमध्ये केली होती. २०१३ पासून त्याचे संचालन सुरु झाले होते. ही ट्रेन आठवड्यातून चार दिवस चालवली जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.