Home » Unlock 4.0 च्या नव्या गाईडलाईन्स जारी

Unlock 4.0 च्या नव्या गाईडलाईन्स जारी

by Correspondent
0 comment
Share

Coronavirus मुळे लागू करण्यात आलेले निर्बंध (Lockdown) आता आणखी शिथिल होणार आहेत. Unlock 4.0 संदर्भात नवीन नियम केंद्र सरकारने (Unlock 4.0 guidelines) जारी केले आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाऊनचे नियम आणखी शिथिल होतील. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता मुभा असेल.

तसंच राज्यांतर्गत प्रवासासाठीही वेगळी परवानगीची आवश्यकता नाही, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स सांगतात. या नव्या नियमांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच राहतील, असं सांगण्यात आलं आहे. मेट्रो मात्र 7 सप्टेंबरपासून सुरू करता येऊ शकेल, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.

शाळा बंद असल्या तरी अनलॉक 4.0 मध्ये नववीच्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल तेव्हा शाळेत जायची परवानगी देण्यात आली आहे.एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता E pass किंवा परवानगीची आवश्यकता नाही.

असे आहेत नवे नियम

– थिएटर, मनोरंजन केंद्र, स्विमिंग पूल राहणार बंद

– शाळा बंदच, पण एका वेळी 50 टक्क्याहून कमी शिक्षकांना शाळेत बोलवायला परवानगी

– ऑनलाईन शिक्षणासंदर्भात कामासाठी निम्मे शिक्षक शाळेत जाऊ शकतात.

– नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी.

– शिक्षकांकडून मार्गदर्शन, पुस्तकं किंवा इतर साहित्य घेण्यासाठी माध्यमिक – शाळेतले विद्यार्थी पालकांच्या परवानगीने शाळेत शिक्षकांना भेटायला जाऊ शकतात.

– वय वर्षं 65 आणि त्यापुढच्या व्यक्तींनी ज्यांना काही आजार आहेत अशांनी आणि 10 वर्षांच्या आतल्या मुलांनी घरातच राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. गरोदर स्त्रियांनीही गरज असल्याखेरीज घराबाहेर पडू नये.

– सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक किंवा राजकीय संमेलनांना परवानगी नाही. पण 21 सप्टेंबरपासून नियम होणार शिथिल

– कुठल्याही प्रकरच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 100 जणांनी एकत्र यायला 21 सप्टेंबरनंतर परवानही. पण प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर वापरणं बंधनकारक. प्रत्येकाच्या शरीराचं तापमान मोजूनच संमेलनाला जायची परवानगी

– 21 सप्टेंबरपासून ओपन एअर थिएटर उघडायला परवागनी. एसी सिनिमा हॉल बंदच राहणार

– राज्यांतर्गत किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायला परवानगीची आवश्यकता नाही


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.