उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे, यांची सून वैष्णवी हगवणे(Vaishnavi Hagawane) हिने आत्महत्या केल्याचं प्रकरण काही दिवसांपूर्वीच समोर आलं. यात असं कळलं की, सासरची मंडळीं हुंड्यासाठी आणि इतर कारणांमुळे तिला मारहाण करत होते, तिचा मानसिक छळ करत होते. या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा या तिघांना अटक तर झालीच पण तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघे अजूनही फरार आहेत. तिने आत्महत्या केल्यावर तिला हॉस्पिटलला नेलं खरं, पण त्याआधीच तिने जीव सोडला होता.(Vaishnavi Hagawane Death)
पोस्टमार्टम रिपोर्ट जेव्हा बाहेर आला तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली. तिच्या शरीरावर बऱ्याच जखमा आढळल्या, ज्यावरून शक्यता बांधली गेली की, तिने आत्महत्या केली नाही तर तिचा खून झाला असावा. पण अजूनही हे स्पष्ट झालं नाही. राजेंद्र हगवणे (Rajendra Hagavane) राष्ट्रवादी पक्षाचे आणि पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष, त्यामुळे या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या तपासात बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतोय, त्यात तिचे मैत्रिणी सोबतचे कॉल्ससुद्धा समोर आलेत. आज आपण तिच्या लग्नापासून अगदी आतापर्यंत काय काय घडलं, तिचे मैत्रिणीसोबतचे कॉल्स, पक्षाचं या प्रकरणावर मत हे सगळं जाणून घेऊ. (Latest Marathi News)
तर एप्रिल २०२३ मध्ये वैष्णवी कस्पटे आणि शशांक हगवणे (Shashank Hagwane) यांचं लग्न झालं. त्यांनी लव मॅरेज केलं होतं. वैष्णवी आणि शशांक यांची भेट एका लग्नात झाली होती, आणि त्यानंतर इंस्टाग्रामवर त्यांचं बोलणं सुरू झालं. जेव्हा तिने त्यांच्या लग्नाबद्दल बोलणी सुरू केली तेव्हा वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांचा या लग्नाला विरोध होता. पण मुलीच्या प्रेमाखातर त्यांनी लग्नाला संमती दिली. लग्नावेळी राजेंद्र हगवणे यांनी वैष्णवीच्या कुटुंबाकडून ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी आणि आलिशान समारंभाची मागणी केली. वैष्णवीच्या वडिलांनी ती मागणी मान्य केली आणि सांगितला तेवढा हुंडा दिला. तरीही तीची सासरची मंडळी नाराज होतीच. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी किरकोळ कारणांवरून सासरच्यांनी भांडणं सुरू केली. इथून जे पहिलं भांडण सुरू झालं ते पुढे बरंच काळ सुरू राहिलं.
काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट २०२३ मध्ये वैष्णवी गरोदर राहिली. ती खूप खुश होती. तिने ही आनंदाची बातमी शशांकला दिली. पण शशांक आनंदी झाला तर नाहीच तर त्याने उलट तिच्यावरच संशय घेतला आणि म्हणायला लागला, “हे मूल माझं नाही.” आणि त्याने तिला मारहाण केली. ज्यात तीची सासरची मंडळी सुद्धा सामील होती. सासू, नणंद, सासरे आणि दीर यांनी मिळून वैष्णवीला वाईट साईट बोलले, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली.(Vaishnavi Hagawane Death)
तिला ते सारखाच त्रास द्यायला लागले. त्यांच्या या सततच्या छळाला कंटाळून वैष्णवीने २७ नोव्हेंबेर २०२३ ला रॅट पॉयजन खाऊन पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केल होता. पण ती त्याच्यातून वाचली. या घटनेनंतर ती तिच्या माहेरी गेली आणि तिच्यासोबत जो छळ होतोय त्याबद्दल आई वडिलांना सांगितलं. त्यांनी लगेचच तिच्या सासरच्यांविरुद्ध पोलिस कम्पलेंट केली. पण या वर कोणतीच ठोस कारवाई झालीच नाही. “आता सासरच्या मंडळींसोबत राहणं शक्य नाही आणि मी घटस्फोट घेण्याचा विचार करत आहे.” असं तिने तिच्या वडिलांना सांगितलं. त्यातच शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडे जमीन खरेदीसाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण झाली नाही म्हणून तिला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली. (Social News / Updates)
मार्च २०२५ मध्ये तिची सासू आणि नणंद, या दोघींनी छोट्या कारणावरून वाद सुरू केला, शिवीगाळ केली, तिच्या तोंडावर ते थुंकले आणि गाडीत बसवून तिला वाकडला नेलं आणि वाटेत त्यांनी तिला मारहाण केली. त्यावर वैष्णवीने “मी उडी मारेन” असं सांगितल्यानंतर मारहाण थांबली. या घटनेनंतर ती पूर्णपणे खचली. तिच्या माहेरचे सासरच्यांवर आरोप करत म्हणाले, “सासरे राजेंद्र हगवणे यांनीही वैष्णवीला अक्षरशः कपडे फाटेपर्यंत मारहाण केली.”
१६ मे २०२५ ला दुपारी साडेचारच्या आसपास तिने भुकूम इथल्या राहत्या घरात बेडरूमचा दरवाजा लावला. शशांक जेव्हा बेडरूम जवळ आला तेव्हा दार आतून लॉक होतं म्हणून तो दरवाजा ठोकायला लागला. बराच वेळ झाला वैष्णवी दरवाजा उघडत नाहीये म्हणून त्याने दरवाजा तोडला. त्याने बेडरूम मध्ये पहिलं तर तिने गळफास लावून स्वतःचं आयुष्य संपवलेलं होतं. लगेचच तिला पिंपळे सौदागर मधल्या प्रायवेट हॉस्पिटलला नेलं पण त्या आधीच तिने जीव सोडला होता. ससून हॉस्पिटल मधून तिचा पोस्टमार्टम् चा रिपोर्ट आला. त्यात असं कळलं की, तिच्या अंगावर बऱ्याच जखमा आढळल्या. त्यामुळे ही हत्या आहे का असे प्रश्न उभे राहिले. पण याबाबतीत अजून स्पष्ट पुरावे मिळाले नाहीत..(Vaishnavi Hagawane Death)
===============
हे देखील वाचा : या 5 अँटी-एजिंग ड्रिंक्सचा करा डाइटमध्ये समावेश, चाळीशीतही दिसाल तरुणी
===============
तिच्या मृत्यूनंतर तपासात तिचे मैत्रिणीसोबतचे कॉल बाहेर आले. त्यात ती म्हणते, “मला मारताना तुझे दाजी बघत होते. त्यानंतर त्यांनीही माझ्यावर हात उचलला. हे त्यानाही खरं वाटलेलं आहे. त्यामुळे मी आता ठरवलेलं आहे की, मी त्या माणसाला डिव्होस देणार. मी पप्पांना सांगितलं आहे. पप्पा म्हणाले की, आपण त्यावर विचार करुया.”“माझा नवरा माझ्याबाजूने नाही या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. मी त्या घरात गेली, सगळ्यांचा विरोध करुन गेले,ही माझी मोठी चूक झाली.” “सगळं बोलण्याच्या आणि समजण्याच्या पलीकडे गेलं आहे. तुला ही छोटी गोष्ट वाटते का? असा मी माझ्या आयुष्यात कधी विचारही केला नव्हता.”
वैष्णवीच्या वडिलांनी १७ मे ला बावधन पोलिस ठाण्यात तिच्या सासरच्यांविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार शशांक, लता आणि करिश्मा या तिघांना अटक झाली, पण तिचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील दोघेही फरार आहेत. त्यांचा शोध अजूनही सुरूच आहे. या प्रकरणानंतर राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केलं. त्यावर पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सांगितलं की, “अजित पवारांनी पुणे सीपींना दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.”
तपासात अजूनही तीची हत्या की आत्महत्या हे अजूनही स्पष्ट झाली नाही. पण पोस्टमार्टं रिपोर्ट, मैत्रिणीसोबतचे कॉल्स यामुळे या प्रकरणाला काय वळण मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या प्रकरणावर तुमच मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.