भारतामध्ये प्रवासाच्या साधनामध्ये रेल्वे हे प्रत्येक भारतीयांचे आवडते साधन आहे. रेल्वेने प्रवास करण्याचे अनेक फायदे आहेत. रेल्वेचा प्रवास जलद होतो, सर्वसामान्यांना रेल्वेचा प्रवास परवडतो आणि या प्रवासाची एक गंमतचा वेगळी आहे. त्यामुळे आपण जर पाहिले तर भारतात बहुसंख्य लोकं रेल्वेनेच प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र रेल्वाने प्रवास करायचा तर, वेळेत प्रवास होईल ही अपेक्षा ठेऊ नये. कारण अनेकदा भारतीय रेल्वे ह्या अनेक तास उशिराने धावत असतात. त्यामुळे प्रवाशांना स्टेशनला ट्रेन येते तोपर्यंत वाट पाहावी लागते. अशा वेळेस त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. (Railway)
स्टेशनवर नीट बसण्याच्या सुविधा नसतात, वॉशरूम नसतात, जे जॉब करणारे असतात त्यांना देखील या वेळेचा सदुपयोग करत काम करता येत नाही. स्टेशनवर रेल्वेचे वेटिंग रुम देखील असते मात्र तिथे देखील अनेक समस्या असतात, शिवाय ते विशिष्ट लोकांनाच उपलब्ध होतात. अशा सर्व गोष्टींचा विचार करून भारतीय रेल्वेने या सुंदर कल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. (Marathi News)
भारतात रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करतात. दळणवळणाचे एक महत्वाचे साधन म्हणून रेल्वेला ओळखले जाते. बदलणाऱ्या काळासोबतच रेल्वेचे जाळे देखील वाढू लागले आहे. दिवसेंदिवस रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढतच आहे. यासाठी रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या आरामासाठी रेल्वे लाउंज सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबईतील एक मोठ्या रेल्वे स्थानकाची निवड करण्यात आली आहे. (Marathi Top News)
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत लवकरच रेल्वेचे लाऊंज सुरु होणार आहे. पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल स्थानकावर भारतातील पहिले डिजिटल लाउंज अर्थात विश्रामगृह उभारण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना आता विमातळावर मिळणारी सुविधा रेल्वे स्टेशनवर अनुभवता येणार आहे. मुख्य म्हणजे हे डिजिटल लाऊंज केवळ प्रवाशांसाठीच नव्हे, तर इतर नागरिकांसाठीही हे खुले असणार आहे. भारतीय रेल्वे स्थानकात पश्चिम रेल्वेवर हा पहिलाच प्रकल्प तयार होत आहे. या आधी पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल स्थानकात पॉड हॉटेलची उभारणी झाली होती. (Marathi Latest News)
रेल्वेला उशीर झाल्यानंतर प्रवाशांना रेल्वेच्या प्रतिक्षालयात अर्थात वेटिंग रूम बसून अनेक वाट पाहावी लागते. अनेकदा तर त्यांना जादाचे पैसे देऊन एक्झिक्युटिव्ह लाऊंजमध्ये जाऊन आराम करावा लागतो किंवा काम करावे लागते. मात्र असे कुठे बसून ऑफिसचे काम होणे शक्य नसते. अशावेळेस प्रवाशांना हा वेळ टाइमपास करत घालवावा लागतो. मात्र ही सुविधा आता या नवीन होणाऱ्या डिजिटल लाऊंजद्वारे प्रवाशांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. या डिजिटल लाऊंजमध्ये प्रवाशांसाठी अनेक आधुनिक सुविधा असणार आहेत. (Marathi Trending News)
पश्चिम रेल्वेचा पायलट प्रकल्प म्हणून मुंबई सेंट्रल येथे हे देशातील पहिले डिजिटल लाऊंज उभारले जात आहे. या प्रकल्पासाठी तब्बल २.७१ कोटी रुपये खर्च येणार आहे. १७१२ चौ.फु. जागेत ही सुविधा उभारली जात आहे. या डिजिटल लाऊंजमध्ये प्रवाशांसाठी अनेक हायटेक सुविधा देण्यात यांत आहे. इथे वायफाय, प्लग पॉइंट, चार्जिंग सॉकेट्स, टेबल, सोफा, कॅफे, मोफत वीज, साउंड प्रूफ झोन अशा सोयीसुविधा पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना विना व्यत्यय आपल्या ऑफिसचे काम रेल्वे स्टेशनच्या आवारात करता येणे शक्य होणार आहे. आजच्या काळात अनेक लोकं फ्रिलान्सर म्हणून काम करत असतात. अशा लोकांना ही डिजिटल लाऊंज म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे. (Social News)
=========
हे देखील वाचा : Indian Spy : शत्रूने कापले होते ज्यांचे स्तन अशा भारताच्या पहिल्या महिला गुप्तहेर नीरा आर्य
=========
मुंबई सेंट्रल येथील उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या डिजिटल लाऊंजमुळे रेल्वेला दरवर्षी ५० लाखांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. ही सुविधा फक्त प्रवाशांसाठी नाही, तर शहरातील फ्रीलान्सर्स आणि व्यावसायिकांसाठीही देखील खुली असणार आहे. रेल्वे स्थानकावर सुलभ दरात ही सेवा मिळणं ही मुंबईकरांसाठी एक आनंदाची बाब ठरणार आहे. मुंबई सेंट्रलनंतर वांद्रे टर्मिनस, वडोदरा, अहमदाबाद येथेही अशी सुविधा उभारण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. रेल्वे स्थानक आता केवळ प्रवासाचे नव्हे, तर येथे अनेक सोयी सविधांचे केंद्र ठरणार आहे. (Top Stories)