अखेर छगन भुजबळांचा काल राजभवनात शपथविधी झाला आणि भुजबळ कॅबिनेट मंत्री झाले.
अचानक भुजबळांचा एकट्याचा शपथविधी झाल्याने राजकीय वर्तुळातही भुवया उंचावल्यात. महत्वाचं म्हणजे जहा नही चैना वहॉ नही रेहना असं म्हणणारे भुजबळ आता ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं असं म्हणताहेत. महायुतीच सरकार आल्यानंतर भुजबळांचा पत्ता कट झाला. त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आणि थेट अजित पवारांवरही टीकेचे बाण सोडले जात होते. दरम्यानच्या काळात फडणवीसांच्या दोनदा भेटीगाठीही झाल्या. भुजबळ पक्ष सोडून भाजपात जाणार का? याबाबत चर्चाही झाल्या पण अखेर अजित पवारांनीच (Ajit Pawar) त्यांना मंत्रीपद दिलं. मात्र भुजबळ यांना मंत्रिपद का देण्यात आलं? मंत्रिपद देण्यामागे अजितदादा आणि भाजप या दोघांची नेमकी कोणती चाल आहे ? भुजबळांची अशी अचानक एंट्री होण्यामागे कोणती कारणं आहेत? जाणून घेऊ, (Chhagan Bhujbal)
तर छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिपद (Ministerial post) मिळालं आहे. धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेतल्यानंतर जे मंत्रिपद रिकामं होतं ते आता त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून मिळालं आहे. भुजबळ यांची अशी एंट्री होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे अजितदादांना आपला ओबीसी गड संभाळायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांपासूनच मराठा पक्ष अशी ओळख असली तरी पवारांनी छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे अशा नेत्यांच्या माध्यमातून ओबीसी मोट देखील मांडली होती. अजित दादांनाही ही लीगसी कायम ठेवायची आहे. सुरुवातीला भुजबळ डोईजड होऊ नये म्हणून अजित दादांनी धनंजय मुंडे यांना ओबीसी नेता म्हणून बळ दिले. मात्र संतोष देशमुख (Santosh Deshmukh) प्रकरणात मुंडे अडकल्याने त्यांना राजीनामा देऊन बॅकफूटवर जावे लागलं.(Political News)
अशावेळी मग मुंडेंच्या तोडीचा किंवा त्यांच्यापेक्षा अनुभवी असा भुजबळ हा एकच ऑप्शन दादांकडे होता. त्यामुळे मग अजित दादांनी सोप्पा ऑप्शन निवडत पुन्हा भुजबळांना मंत्रीपदावर आणलं. भुजबळांना पुन्हा मंत्री करण्यामागे दुसरा महत्वाचा अर्थ म्हणजे ओबीसींची सर्व स्पेस भाजप व्यापण्याची शक्यता. ओबीसी (OBC)आतापर्यंत अनेक पक्षांत विभागाला गेला होता. बाळासाहेब ठाकरेंनी जात ना पाहता तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी दिल्याने कोकणातील आणि मराठवाड्यातील ओबीसी मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे होता. त्यानंतर आधीच सांगितल्याप्रमाणे शरद पवारांनीही मोठे ओबीसी नेते उभे केल्याने ओबीसींचा एक मोठा शेयर राष्ट्रवादीलाही मिळत होता. सोबतच माधव फॉर्मुल्याने भाजपनेही ओबीसींना आपली पारंपरिक वोटबँक बनवण्याचा घाट घातला होता. (Politics Top Headlines)
पण आता २०२५ मध्ये परिस्थिती काय आहे? तर ओबीसी समाज सर्वात जास्त भाजपच्या मागे आहे. भाजपने ओबीसी नेत्यांना दिलेली संधी, मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण तयार झालं असताना भाजपने ओबीसींच्या पारड्यात टाकलेलं वजन यामुळे भाजपचा ओबीसी पाठिंबा वाढतच चालला आहे. अशावेळी ओबींसीचा सर्वात मोठा नेता आपल्याकडे असतानाही ओबीसी आपल्याकडे राहतील का? अशी परिस्थिती राष्ट्रवादीच्या बाबतीत निर्माण झाली होती. लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर अशी मंडळी ओबीसींचा आवज म्हणून पुढे येत असताना हे नवे नेतृत्व भुजबळांसारख्या जुन्या नेत्यांना रिप्लेस करणार का? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जरी भाजपबरोबर सत्तेत असले तरी राष्ट्रवादीला आपला वोट शेयर राखणं क्रमप्राप्तच आहे. त्यामुळेच मग अजित दादांनी मग मित्रपक्षाशी स्पर्धा असताना आपलं ओबीसी कार्ड बाहेर काडलं आहे. (Chhagan Bhujbal)
भुजबळांना मंत्रिपद देण्यामागचं तिसरं कारण समोर येतं ते म्हणजे स्थानिक स्वराज संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणूका. तीन वर्षे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संथांमध्ये प्रशासक राज राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा 2022 च्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात होत्या. त्याच पद्धतीने म्हणजे ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राज्यात डिसेम्बरपर्यंत विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजणार आहे. अशावेळी या २७ टक्के जागांचं एक मोठं मूल्य असणार आहे. त्यामुळे एक स्ट्रॉंग ओबीसी नेत्याला बळ देणं अजित दादांसाठी गरजेचं होतं. त्यामुळेच मग भुजबळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागल्याचं दिसतं. (Chhagan Bhujbal)
=============
हे देखील वाचा : Ruchi Gujjar : मोदींच्या फोटोचा नेकलेस घालून कान्समध्ये एन्ट्री घेणारी रुची गुज्जर आहे तरी कोण?
=============
भुजबळांना बळ देण्यामागे चौथा महत्वाचा फॅक्टर म्हणजे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आंदोलन. मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत आंदोलन घेणार असल्याची घोषणा केली आहे. महत्वाचं म्हणजे त्यांचा सूर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यावर असणार हे हि फिक्स झालं आहे. अशावेळी फडणवीसांनीही जरांगे पाटील यांच्याशी तितक्याच ताकदीने भिडेल असं सहकारी हवाच असणार. त्यामुळे मग पहिलंच नाव आपसूक समोर येतं ते म्हणजे छगन भुजबळ. छगन भुजबळ जरांगे पाटलांना थेट भिडण्याची क्षमता ठेवतात. आताही त्यांनी शपथ घेताच जरांगेना प्रत्युत्तर दिलं आहे. “मनोज जरांगेने चुका नाही तर खिळे केले आहेत. महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाजाचं प्रचंड नुकसान केलं आहे. गावागावांमध्ये त्यामुळे मराठा समाजालाही निश्चितपणे त्रास झाला. मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून महाराष्ट्रात राहतो, पण ह्या जरांगेच्या कर्तृत्वामुळेच निश्चितपणे मराठा समाजालाच त्रास झाला आहे.” अशा शब्दात भुजबळ यांनी आपली भूमिका काय असेल याची झलक दिली आहे. (Chhagan Bhujbal)
त्यामुळेच भाजपच्याच भ्रष्टचाराच्या आरोपांमुळे कधीकाळी अडचणीत आलेल्या भुजबळांना आता भाजपनेच ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे मधल्या काळात फडणवीस आणि भुजबळ यांची जी जवळीक वाढली होती त्या इक्वेशनचाही भुजबळ यांना फायदा झाल्याचं बोललं जात आहे. थोडक्यात काय तर भुजबळ यांची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री झाली आहे. आता या एंट्रीचे पडसाद नेमके कसे असणार हे येत्या काही दिवसांतच कळेल.