Home » भारतातील ‘या’ तुरुंगात टुरिस्ट देऊ शकतात भेट

भारतातील ‘या’ तुरुंगात टुरिस्ट देऊ शकतात भेट

एखादा गुन्हा केल्यानंतर तुरुंगात जाणे वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय की, तुरुंगाची सफर तुम्हाला करता आली तर? भारतात काही असे तुरुंग आहेत जेथे टुरिस्ट भेट देऊ शकतात.

by Team Gajawaja
0 comment
Tourist Jail In India 
Share

Tourist Jail In India : भारतात असे काही तुरुंग आहेत जेथे तुम्हाला चक्क फिरण्यासाठी परवानगी दिली जाते. या ठिकाणांबद्दलच्या काही अनोख्या कथा आणि इतिहास जाणून घेऊयात. येथे काही स्वांत्र्यासाठी लढा देणाऱ्यांच्या कथाही तुम्हाला ऐकायला मिळतात.

सेल्यूलर जेल, पोर्ट ब्लेअर
या तुरुंगाला काला पानी नावानेही ओखळले जाते. खरंतर या तुरुंगाला प्राचीन इतिहास लाभलेला आहे. येथे तुम्हाला स्वातंत्र्य सेनानी बटुकेश्वर दत्त आणि वीर सावरकरांच्या वीरतेबद्दल माहिती मिळेल. याशिवाय पर्यटकांना सेल्यूलर जेलमध्ये फिरण्याचीही परवानगी दिली जाते. ऐवढेच नव्हे येथे दररोज संध्याकाळी लाइट आणि म्युझिक शो चे आयोजन केले जाते. तुम्ही सोमवार ते शुक्रवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत येथे फिरू शकता.

येरवडा तुरुंग, पुणे
साउथ एशियातील सर्वाधिक मोठ्या येरवडा तुरुंगाला भारताच्या इतिहासात फार महत्त्व आहे. सन 1831 मध्ये येरवडा तुरुंग ब्रिटिश शासकांनी तयार केला होता. यामध्ये काही स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या आयुष्यातील संघर्षात्मक क्षण घालवले होते. यामध्ये महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू आणि बाळ गंगाधर टिळक यांचा समावेश आहे.

तिहार तुरुंग, दिल्ली
दिल्लीतील तिहार तुरुंगात टुरिस्टला फिरण्यासाठी परवानगी आहे. याशिवाय तुरुंगात राहणारे काही कैदी तिहार ब्रॅण्डच्या नावाने काही प्रोडक्ट्सही तयार करतात, ज्यांची बाजारात विक्री केली जाते. पर्यटकांना तुरुंगातील कैदी काही काम करताना दिसून येतात. जसे की, शिलाई, विणकाम, रंगकाम करताना दिसतात. येथील कैद्यांना कामात व्यस्त ठेवण्यासाठी आणि त्यांचे आयुष्य सुधारण्यासाठीही प्रयत्न केले जातात.

सांगरेड्डी तुरुंग, हैदराबाद
220 वर्ष जुन्या असलेल्या हैदराबादमधील सांगरेड्डी तुरुंगाला आता एका संग्रहालयाचे रुप देण्यात आले आहे. या तुरुंगाचे बांधकाम 1976 मध्ये करण्यात आले होते. आता पर्यटकांच्या मनोरंजनासाठी संग्रहालयाच्या रुपात तुरुंग सुरू करण्यात आला आहे. येथे तुम्ही Feel The Jail योजनेअंतर्गत तुरुंगात फिरू शकता. याशिवाय तुरुंगात 24 तास राहू देखील शकतात. (Tourist Jail In India)

वाइपर द्वीप, अंदमान
वाइपर द्वीप सेल्यूलर जेल ऐवढे प्रसिद्ध नाही. पण भारत प्राचीन इतिहासात याच्याशी संबंधित काही कथा आहेत. त्यावेळी शासनकाळातील शासकाच्या विरोधात आवाज उठवायचा त्याला वाइपर द्विप तुरुंगात पाठवले जायचे. आता हे तुरुंग सर्वसामान्यांना फिरण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.


आणखी वाचा :
समुद्राच्या पोटात जाणा-या मंदिराची कथा..
माया संस्कृतीचे अवशेष
उत्तरप्रदेश प्रयागराज येथे 2025 मध्ये महाकुंभ होणार

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.