Home » ऑफिसमध्ये ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या, मूड ही राहिल फ्रेश

ऑफिसमध्ये ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या, मूड ही राहिल फ्रेश

by Team Gajawaja
0 comment
Tips for Working Women
Share

जर तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ८-९ तास काम करुन पुन्हा घरी येऊन घरातील मंडळींसाठी काम करावे लागत असल्याने थकवा येतोच. त्याचसोबत कधीकधी चिडचिड ही होते आणि त्यामुळे ऑफिसमधील कामात ही लक्ष लागत नाही. अशातच मूड ही खराब होतो. परंतु कामाच्या ठिकाणी मूड फ्रेश रहावा यासाठी काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेणेकरुन तुम्ही कामाच्या ठिकाणी उत्तम परफॉर्मन्स करु शकता. ही गोष्ट फक्त महिलांसाठीच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होते. जेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणचे वातावरण आनंदित, स्वच्छ असेल तर तुम्हाला सुद्धा काम करण्यास आनंद वाटतो. अशातच तुम्ही घरासह ऑफिसमध्ये सुद्धा काम करत असाल तर वर्किंग अवर्स मध्ये आनंदित राहण्यासाठी फक्त पुढील काही टीप्स फॉलो करा. (Tips for Working Women)

-ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्या डेक्सजवळ गेल्यास तुमचा मूड ऑफ होतो का? तेथे बसण्याचे मन करत नाही किंवा कोणती तरी उत्तम स्पेस असावी असा विचार करणे सर्वसामान्य आहे. मात्र काही वेळेस ऑफिसमध्ये ऐवढी जागा नसते की, तुम्हाला आवडीनुसार बसण्याची जागा मिळेल. जर तुम्ही घरातून खुप काम करुन ऑफिसला आला असल तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर ही पडतो. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी काम करण्यासाठी बसता ती व्यवस्थितीत आणि स्वच्छ राहिल याकडे लक्ष द्या. जेणेकरुन तुमचा मूड ही फ्रेश राहिल आणि तुम्ही मनं लावून ही काम करु शकता.

Tips for Working Women
Tips for Working Women

-ऑफिसमधील वातावरण हे तुमचा मूड आणि तुम्ही किती उत्तम पद्धतीने काम करता याच्या क्षमतेवर परिणाम करते. वास्तवात, तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्ह व्यक्ती असतील तर तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह विचार करुनच काही गोष्टी कराल. आपल्या आजूबाजूचा परिसर, व्यक्ती या सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे फ्री वेळेत तुम्ही तुमच्या कलिगशी गप्पा मारु शकता.

-तुमच्या ऑफिसमध्ये डेस्कजवळच्या भींतीचा रंग अधिक डार्क असेल तर तेथे तुम्ही एखादे कॅलेंडर, कामासंदर्भातील चार्ट पेपर, काही एक्ससरीज वापरुन ते डेकोरेट करु शकता. असे केल्याने तुमच्या डोळ्यांना प्रसन्नता वाटेलच पण कामात ही मन लागेल. वारंवार तुमचे मनं डायवर्ट होणार नाही. (Tips for Working Women)

हे देखील वाचा- धावपळीच्या आयुष्यात महिलांनी अशा पद्धतीने दूर करा मानसिक थकवा

-बहुतांश लोक ऑफिसात काम करताना आपल्या बसण्याच्या पोस्चरवर लक्ष देत नाहीत. जर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर ही सवय बदला. तुमची खुर्ची किंवा डेस्क आरामदायी नसेल तर ती बदलून घ्या. घरातील काम केल्यानंतर बहुतांश महिलांची पाठ दुखते. अशातच ऑफिसमध्ये सुद्धा व्यवस्थित बसण्याची जागा न मिळाल्यास तुम्हाला काम करण्यास त्रास होईल. नेहमीच खुर्चीवर ताठ बसून काम करावे,.तुमचे खांदे पुढील बाजूस झुकलेले नसावेत. कंप्युटरची स्क्रिन आणि तुम्ही बसता त्यामध्ये काही अंतर असावे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.