Home » कोरोनाचा सर्वात घातक परिणाम….

कोरोनाचा सर्वात घातक परिणाम….

by Team Gajawaja
0 comment
Corona Effect
Share

कोरोना (Corona Effect) नावाची घातक महामारी येऊन दोन वर्ष केव्हाच झाली आहेत. आता काही काळ हा कोरोनाचा प्रकोप थांबला असला तरी पुन्हा सर्वत्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनामुळे जगभरात लाखो नागरिकांचा बळी गेला आहे. मात्र जे कोरोनातून बरे झाले आहेत, अशांनाही अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.  मुख्य म्हणजे कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे आढळून आले आहे. आता करोना झालेल्या रुग्णांची पुन्हा पाहणी करण्यात येत आहे. अशाच एका पाहणीत एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. कोरोनाचा हा सर्वाधिक घातक परिणाम असल्याची नोंद झाली आहे. हा परिणाम म्हणजे, ज्यांना कोरोना एकापेक्षा अधिक वेळा झाला आहे, त्या व्यक्तींमध्ये विसरण्याची सवय वाढली आहे. या वक्ती आपल्या घरातील, कुटुंबातील, नेहमी भेटणा-यापैंकी अनेकांचे चेहरेच विसरत चालल्याचे पाहणीत आढळून आले आहे. हा अहवाल आल्यावर शास्त्रज्ञांनीही हा आतापर्यंतचा कोरोनाचा सर्वात घातक परिणाम (Corona Effect) असल्याचे जाहीर केले आहे.  

कोरोना काळात अनेकांना दोन किंवा तिनवेळाही COVID-19 चा संसर्ग झाला आहे. या मंडळींमध्ये प्रोसोपॅग्नोसिया नावाची स्थिती झाल्याचे आढळून आले आहे. त्याला “चेहरा अंधत्व” असे म्हटले जाते. अशा व्यक्ती आपल्या परिचयातील सर्वांचे चेहरेही ओळखू शकत नाहीत आणि काळजीची गोष्ट अशी की, या नव्य लक्षणावर अद्यापही काही औषध मिळालेलं नाही. कोरोना काळात अनेकांना या आजारामुळे दिर्घकाळ शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे. लांबलेली सर्दी, खोकला, अशक्तपणा, अंगदुखी, तोंडाची चव जाणे आदी लक्षणे अनेक दिवस या रुग्णांना सहन करावी  लागली होती. आता अशाच कोरोना झालेल्या व्यक्तींमध्ये हे “चेहरा अंधत्व” नावाचे लक्षण दिसून आले आहे. (Corona Effect)

वास्तविक कोरोना विषाणूने गेल्या काही वर्षांपासून इतका विनाश केला आहे की, जगभरात कोरोना म्हटले तरी अजूनही भीतीचे वातावरण आहे. कोरोनातून बरे झालेल्यांनाही अनेक अन्य आजारपणांना तोंड द्यावे लागले. आतापर्यंत दीर्घकाळापर्यंत ज्यांना कोरोना झाला होता त्यांना थकवा, मेंदूशी संबंधित तक्रारी, धाप लागणे, बीपी आणि हृदयविकाराच्या तक्रारी होत्या. तसेच काहींना मधुमेहही झाल्याचे स्पष्ट झाले आहे.   मात्र आता या सर्वांपेक्षा घातक लक्षणं (Corona Effect) दिसल्यानं शास्त्रज्ञांची झोप उडाली आहे. एका नवीन अभ्यासानुसार, दीर्घकाळापर्यंत कोविड-19 हा संसर्ग ज्यांना झाला होता त्यांच्यामध्ये प्रोसोपॅग्नोसिया नावाची स्थिती आली आहे. त्याला शास्त्रीय भाषेत “चेहरा अंधत्व” म्हणतात. या स्थितीमुळे व्यक्तींना त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या, नेहमीच्या परिचयाच्या व्यक्तींनाही ओळखण्यात अडचणी येतात. ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची चेहरा ओळखण्याची आणि त्यात फरक करण्याची क्षमता कमी होते.  हा विकार असलेल्या व्यक्तींना परिचित चेहरे ओळखण्यात अडचण येऊ शकते. अशा व्यक्तींच्या घरी अचानक ओळखीचे पाहुणे आले तर त्यांना ओखण्यात अडचण येते.  काहीवेळा आवाजाच्या आधारे ओळख पटते. पण तोपर्यंत अशा व्यक्ती कोणालाही ओळखण्यास असमर्थ असतात.

========

हे देखील वाचा : दात दुखणे आणि कॅविटीमुळे त्रस्त असाल तर ‘या’ घरगुती उपायांनी दूर करा समस्या

========  

यासंदर्भात कॉर्टेक्स जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात अॅनी नावाच्या महिलेचा अहवाल देण्यात आला आहे. अॅनी या 28 वर्षीय महिलेला 2020 मध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता.  अॅनीवर काही दिवस उपचार करण्यात आले होते. आता तिला चेहरा अंधत्व येत असल्याचे सांगण्यात आले. कोविड होण्यापूर्वी अॅनी चेहेरे ओळखू शकत होती. पण कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर दोन महिन्यांनंतर तिला तिच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांनाही ओळखण्यात अडचण येत आहे. अॅनीला आता बाहेर वावरतांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.  बाहेर पडल्यावर कार कुठे पार्क केली आहे, हे सुद्धा तिला आठवण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. अॅनीने कोरोनानंतर अशी तक्रार केल्यावर संशोधकांनी अॅनीसह 54 सहभागींकडून माहिती गोळा केली. यातील काहींना आसपासच्या व्यक्तींचा चेहरा ओळखण्यास अडचण येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात आत्तापर्यंत जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी फक्त मोजक्याच व्यक्तींमध्ये ही लक्षणे दिसून आली आहेत.  वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, कोरोना संसर्ग मेंदूच्या भागात विकृती निर्माण करण्याचे काम करतो. त्यामुळेच व्यक्तीच्या आठवणी पुसट होतात आणि त्यातून असा नवा रोग होऊ शकतो. (Corona Effect) आताही कोरोना नावाचे संकट आपल्या भोवती आहे.  कोरोनाचा हा प्रभाव बघता, कोरोनाचा संपूर्ण नाश झाला तरी त्याच्यापासून झालेले दुष्परिणाम दिर्घकाळ सोसावे लागणार हे स्पष्ट आहे.  


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.