Home » तवांग मठाची कथा, ज्याने १९६२ मध्ये भारताची दिली साथ पण आता चीनला दिलाय इशारा

तवांग मठाची कथा, ज्याने १९६२ मध्ये भारताची दिली साथ पण आता चीनला दिलाय इशारा

by Team Gajawaja
0 comment
Tawang Monastery History
Share

अरुणाचल प्रदेशात भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर तवांग मठाने चीनला इशारा दिला आहे. मठातील भिक्षु लामा येशी खावो यांनी असे म्हटले आहे की, चीनने कधीच विसरु नये की तो १९६२ चा नव्हे तर २०२२ चा आहे. ही मोदी सरकारचा काळ आहे. चीनी सरकार नेहमीच दुसऱ्या देशांच्या जमिनींवर लक्ष ठेवतात, पण हे चुकीचे आहे. १९६२ मध्ये भारत आणि चीन मध्ये झालेल्या युद्धात तवांग मठाने भारताला पाठिंबा दिला होता. तवांग मठ हे जगातील सर्वात दुसरे मोठे मठ आहे. (Tawang Monastery History)

तवांग मठाची निर्मिती १६८० मध्ये मेराक लाला लोद्रे ग्यास्तो यांनी केली होती. सध्या येथे ५०० हून अधिक बौद्ध भिक्षु राहतात. या मठाला गालडेन नमग्याल लहात्से नावाने सुद्धा ओळखले जाते. येथील मुख्य आकर्षण म्हणजे भगवान बुद्धांची २८ फूट उंच मुर्ती आणि तीन मजली सदन.

असे पडले तवांग नाव
मठात लायब्रेरी सुद्धा आहे. जेथे प्राचीन पुस्तक आणि पांडुलिपिंचे संकलन आहे. असे म्हटले जाते की, पांडुलिपिया १७ व्या शतकातील आहेत. मान्यता आहे की, तवांग मठाची निर्मिती करणारे मेराक लामा यांना मठाची जागा निवडण्यास समस्या येत होती. एका काल्पनिक घोड्याने त्यांची मदत केली होती. ‘ता’ शब्दाचा अर्थ होतो घोडा आणि ‘वांग’ अर्थ होतो अशीर्वाद. त्या दिव्य घोड्याच्या आशीर्वादाने या ठिकाणाचे नाव तवांग असे पडले.

Tawang Monastery History
Tawang Monastery History

तवांगच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ही जागा ७ व्या शतकातील राजा कलावंगपो आणि खांड्रो ड्रोवा जांगमो यांच्या कथेशी संबंधित आहे. ज्यांना आरटीए नाग मंडल सांग नावाने ओळखले जायचे. सध्या तेथे ५०० हून अधिक भिक्षु राहतात. मठात बौद्ध दर्शनावेळी सामान्य शिक्षण सुद्धा दिले जाते.(Tawang Monastery History)

जेव्हा चीनी सैन्यासाठी ताबा मिळवला
आंतरराष्ट्रीय मानचित्रांमध्ये सुद्धा अरुणाचल प्रदेशाला सुद्धा भारताचा हिस्सा सांगितले गेले आहे. मात्र चीन तिब्बेटसह अरुणाचल प्रदेशावर ही दावा करतो आणि त्याला दक्षिण तिब्बेट असे म्हणतो. हेच कारण आहे की, चीन अरुणाचल प्रदेशाचा उत्तर भाग तवांग संदर्भात दावा करत असतो. येथेच तवांग मठ आहे. नेहमीच चीन त्यावर ही आपला ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो.

हे देखील वाचा- १९७१: जेव्हा भरताने बदलला होता जगाचा नकाशा, पाकिस्ताचे दोन भाग… बांग्लादेशाचा उदय

१९६२ मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले होते. या युद्धात तवांगच्या भिक्षुकांनी भारतीय सैन्याची मदत केली होती. त्या दरम्यान स्थिती बिघडल्याने चीनी सैन्य हे मठात घुसले. दरम्यान, जेव्हा चीनने युद्धाच्या विरामाची घोषणा केली तेव्हा तेव्हा चीनी सैनिकांना माघार घ्यावा लागला होता. अशा प्रकारे चीनी सैन्याला मठातून जावे लागले होते. तर आता पुन्हा चीनी सरकार तवांगवर आपली नजर ठेवून आहे. नुकत्याच भारत आणि चीनी सैनिकांमध्ये तवांग मध्ये झटापट झाली. पण तेव्हा सुद्धा सैनिकांना परतावे लागले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.