Home » मुलांच्या ‘अशा’ वागण्यावरुन ओळखता येईल की मुलं भीतीपोटी खोटं बोलत आहेत का…

मुलांच्या ‘अशा’ वागण्यावरुन ओळखता येईल की मुलं भीतीपोटी खोटं बोलत आहेत का…

by Team Gajawaja
0 comment
Stress in children
Share

लहान मुलं जशी मोठी होऊ लागतात तसे त्यांचे विश्व ही वाढते. अशातच ते काही नव्या गोष्टींचा अनुभव घेतात.लहान मुलांना काही गोष्टी समजत नसल्या तरीही आपण काय चुका केल्या आहेत हे मात्र कळतं. त्यामुळे आपल्याला आई-वडिलांचा ओरडा मिळू नये म्हणून ते काही वेळेस अशा गोष्टी करतात ज्यामुळे आपण त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करतो. मात्र काही वेळेस असे ही होते की, आई-वडिलांनी काही गोष्टींसाठी नकार दिला असेल तरीही त्या गोष्टी लपून ते करतात. परंतु त्यांची ही सवय अधिक वाढल्यास तर त्यांना भविष्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पालकांनी अधिक सतर्कता बाळगणे अगदी गरजेचे आहे. त्यांच्या अशा वागण्यावर लक्ष ठेवून तुम्ही त्यांच्या वागण्यातला खोटेपणा पकडू शकता. अशातच आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही ते खोटं बोलत आहात हे लगेच पकडू शकता.(Signs of lying child)

मुलांच्या पुढील काही वागण्यावरुन खोटं बोलत असल्याचे पकडा

-प्रश्न आणि उत्तरामध्ये वेळ देणे
साइकोलॉजी टुडे यांच्या मते. जर तुम्ही मुलाला काही प्रश्न विचारले तर तो त्यांची लगेच उत्तर देत नसेल आणि विचार करुन सांगत असेल तर समजा तो तुमच्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करतोय. अशातच शांतपणे त्याच्याशी सकारात्मक पद्धतीने बोला.

Signs of lying child
Signs of lying child

-विषय बदलणे
जर तुम्ही मुलाला एखाद्या गोष्टीबद्दल किंवा विषयाला अनुसरुन काही विचारत असाल, पण तेव्हा तो वारंवार विषय बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर तो खोटं बोलतोय का हे तुम्हा कळेल. त्यावेळी तो अशा काही गोष्टी अधिकाधिक टाळण्याचा प्रयत्न करेल ज्या त्याने केल्या आहेत.

-उंच आवाजात बोलणे
काही वेळेस मुल आपण केलेली चुक कळू नये म्हणून भीती पोटी किंवा एंग्जायटीला लपवण्यासाठी आपल्या सामान्य आवाजापेक्षा अधिक उंच आवाजात बोलू लागतात. यावेळी सुद्धा तुम्हाला तो किती खरं-खोटं बोलतोय हे त्याच्या बोलण्यावरुन कळेल.

-वेगाने बोलणे
काही वेळेस मुलं भीतीपोटी आपल्या सामान्य बोलण्याच्या पद्धतीच्या तुलनेत अधिक वेगाने बोलतात. ऐवढेच नव्हे तर काही वेळेस ते थांबून-थांबून ही बोलतात.(Signs of lying child)

हे देखील वाचा- मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल जाणून घेण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर वाचा

-नजर मिळवण्यास घाबरतत
खोटं बोलतेवेळी मुलं तुमच्या नजरेला नजर मिळवण्यासाठी घाबरतात. त्यावेळी त्यांच्या मनात आपलं खोटं पकडलं जाणार याची भीती असते. काही वेळेस ते सामान्य बोलतो त्यापेक्षा आपल्या डोळ्यांची अधिकवेळा उघडझाप करतात आणि तुमच्याशी बोलतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.