Home » संस्कृत आणि परदेशातील विद्यापीठ

संस्कृत आणि परदेशातील विद्यापीठ

by Team Gajawaja
0 comment
Sanskrit language
Share

देवांची भाषा म्हणून ज्या भाषेचा गौरव केला जातो, त्या संस्कृत भाषेचा दिन श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हिंदू कालगणेनेनुसार येणा-या श्रावण महिन्यात राखी पौर्णिमा असते, याच दिवशी संस्कृत भाषा दिन जगभर साजरा होतो. संस्कृत ही भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही तर ती वेद, उपनिषद आणि इतर प्राचीन ग्रंथांचे स्त्रोत आहे. आश्चर्य असे की फक्त भारतातच नाही तर परदेशातही या भाषेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यात अनेक मान्यवर परदेशी नागरिकांचा समावेश आहे. संस्कृत ही जगातील सर्वात मोठी शब्दसंग्रह असलेली भाषा आहे. म्हणूनच या भाषेचा महिमा फक्त भारतापुरता मर्यादित न रहाता परदेशातही संस्कृतचे अनेक अभ्यासक आहेत. (Sanskrit language)

श्रावण महिन्यातील पौर्णिमा ही जागतिक संस्कृत भाषा दिन म्हणून साजरी होते. भारतात देवांची भाषा म्हणून संस्कृतचा गौरव केला जातो. या भाषेचा इतिहास नेमका किती वर्ष जुना आहे, हे सांगता येत नाही. किमान साडेतीन हजार वर्ष जुनी भाषा म्हणून संस्कृत ओळखली जाते. संस्कृत ही देवनागरी लिपीत तसेच विविध प्रादेशिक लिपींमध्ये लिहिली जाते. उत्तराखंड राज्याची अधिकृत भाषा म्हणून संस्कृतला मान्यता दिली आहे. शिवाय भारतीय राज्यघटनेत संस्कृत ही अभिजात भाषा आणि अधिकृत भाषा म्हणून ओळखली जाते. ज्या इंग्रजी भाषेला जागतिक भाषा म्हणून संबोधण्यात येते, त्या इंग्रजी भाषेतील अनेक शब्द संस्कृतमधून आले आहेत. भारतातील प्रत्येक शाळेत आणि गुरुकूलमध्ये संस्कृत भाषेतील वेद, पुराणांचा अभ्यास करण्यात येत असे. मात्र इंग्रजांची सत्ता आल्यापासून भारतीय शिक्षण पद्धतीवर इंग्रजी छाप पडली. (Sanskrit language)

इंग्रजांनी संस्कृत भाषेचे महत्त्व कमी करत इंग्रजीचा प्रचार केला. त्यामुळे भारतातील ही मुळ भाषा भारतीयांपासूनच वेगळी झाली. इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाल्यावर भारतामधील शिक्षण पद्धती काहीशी बदलली. त्यात संस्कृत भाषेला महत्त्व मिळाले. पुढे भारतीय शिक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार १९६९ मध्ये संस्कृत दिन पहिल्यांदा केंद्रीय आणि राज्य स्तरावर साजरा करण्यात आला. संस्कृत विद्यार्थी, कवी आणि लेखकांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषेबद्दलचे प्रेम वाढावे आणि भाषेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे यासाठी भारतीय शिक्षण मंत्रालय काम करते. याच उपक्रमातून सुरु झालेला हा दिवस आता जगभर मोठ्या प्रमाणात साजरा होतो. जगभरही या दिवसाचे महत्त्व आहे. संस्कृत भाषेचा प्रचार करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. परदेशातीलही अनेक विद्यापीठात संस्कृत भाषा शिकवली जाते. (Sanskrit language)

ऑक्सफर्ड विद्यापीठ, इंग्लड, डलबर्ग विद्यापीठ, जर्मनी, पॅरिस विद्यापीठ, फ्रान्स येथे संस्कृत भाषेच्या पदवीचे वर्ग आहेत. सर्वात आश्चर्य म्हणजे जर्मनीमध्ये एक-दोन नाही तर १४ विद्यापीठात संस्कृत भाषा शिकवली जाते. शिवाय अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठात संस्कृत भाषा शिकवली जाते. सोबतच टोकियो विद्यापीठ, जपान, सिंगापूर विद्यापीठात संस्कृत भाषा शिकवली जाते. भारत ही संस्कृत भाषेची जननी मानली जाते. त्यामुळे भारतातील अनेक विद्यापीठात संस्कृत भाषा पदवी, आणि त्यापुढीलही अभ्यासक्रम आहेत. यात केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, लखनौ, श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, संस्कृत महाविद्यालय आणि विद्यापीठ, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, उत्तराखंड संस्कृत विद्यापीठ यांचा समावेश आहे.

==================

हे देखील वाचा : जगातील सर्वात उंच बोगदा !

====================

संस्कृत भाषेत असे अनेक वेद आहेत, ज्यांची फोड अद्यापही करता आलेली नाही. संस्कृत भाषा शिकल्यावर त्यातून प्राचीन ग्रंथांचे जतन करणेही सोप्पे जाणार आहे, शिवाय त्यातील ज्ञान नवीन पिढीला देणे सुलभ ठरणार आहे. संस्कृत भाषेसंदर्भात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या नव्या पिढिला माहितही नाहीत. जसे सुधर्म हे जगातील पहिले आणि एकमेव संस्कृत वृत्तपत्र आहे जे १९७० पासून प्रकाशित होत आहे. अरब आक्रमणापूर्वी संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा होती. कर्नाटकातील मत्तूर गावातील लोक आजही त्यांची मुख्य भाषा म्हणून संस्कृत वापरतात. फोर्ब्स मासिकाच्या अभ्यासानुसार, संस्कृत ही सर्वात संगणक अनुकूल भाषांपैकी एक आहे. भारतातील नव्या पिढिला या दिवसाचे आणि संस्कृत भाषेचे मह्त्त्व समजावे म्हणून श्रावणी महिन्यातील पौर्णिमेला जागतिक संस्कृत दिवस साजरा होत आहे. (Sanskrit language)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.